MFOI 2024 Road Show
  1. पशुधन

पॉश स्पाइस गायीने बनवला जागतिक विक्रम; किंमत ऐकून व्हाल थक्क

देशात गायीच्या अनेक जाती आहेत. गाईंच्या या जाती जगात प्रसिद्ध आहेत. अशीच एक गाय आहे, ज्या गायीच्या लिलावाची चर्चा सर्व जगात होत आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

देशात गायीच्या अनेक जाती आहेत. गाईंच्या या जाती जगात प्रसिद्ध आहेत. अशीच एक गाय आहे, ज्या गायीच्या लिलावाची चर्चा सर्व जगात होत आहे.

दरम्यान मध्य इंग्लंडमध्ये या गायीला घेण्यासाठी तब्बल २.६१ कोटी रुपयांची बोली लागली.ही गाय डेविड बेकहमची पत्नी आणि १९९० च्या दशकातील पॉप ग्रुप  'स्पाइस गर्ल' चे गायक व्हिक्टोरिया बेकहमच्या नावाची गाय आहे.ज्याचे नाव 'पॉश स्पाइस' या गायीचे विक्रीने मागील सर्व रिकॉर्ड तोडले आहेत.

 

काय आहे  पॉश स्पाईस गायीचे वैशिष्ट्ये

ही चांगल्या प्रतीची गाय आहे. जी फार्म (Shropshire) मध्ये पैदा झाली होती. त्याची वय फक्त ४ महिने आहे. या गायीला विकणारे क्रिस्टीन विलियम्स यांनी लिलावातील विक्रम तोडणारी किंमत मिळवली आहे. ते म्हणाले की, आम्ही स्वप्नातही इतक्या मोठ्या रक्कमेचा विचार केला नव्हता. या लिलावामुळे आम्ही खूश आहेत.

 

२०१४ मध्ये  या जातीची गाय १,३१,२५० पाउंड मध्ये विकल्या गेली होती.पण आता या जातीच्या गायीला दुप्पट किंमत मिळाली आहे.यामुळे या जातीची गाय युके आणि युरोपमधील सर्वात महाग अशी गाय बनली आहे.यासह लिलावाविषयी बोलताना ब्रिटिश लिमोसिन कॅट्ल सोसायटीचे ब्रीड सेक्रेटरी विल केटली म्हणाले की, त्या सर्व खरेदीदारांना धन्यवाद. जे हे खरेदी करण्यास यशस्वी झाले.

English Summary: A world record set by Posh Spice Cows, find out what the features are Published on: 18 February 2021, 10:58 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters