भारतामध्ये शेतकरी शेतीला पूरक जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. पशुपालना मध्ये दूध व्यवसाय हा शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. दूध उत्पादनासाठी शेतकरी गाईला प्राधान्य देताना दिसतात.
शेतकरी पशुपालन हा मध्ये देशी जातींच्या तुलनेत जर्सी आणि एचएफ गाईंचे पालन करतात कारण या गाईंपासून एका वेताला अधिक दूध उत्पादन मिळते. संतु या गाई आपल्या स्थानिक वातावरणामध्ये कितपत तग धरतात किंवा त्यासाठी चारा व खाद्य यावर होणारा खर्च यामुळे अलीकडे आणि देशी गोपालन अधिक फायदेशीर असल्याचे सांगतात. अशा वेळी त्यांचे प्रति वेळेत दूध उत्पादन,होणारा खर्च आणि एकूण आर्थिक विश्लेषण करून योग्य तो निर्णय घेतला पाहिजे.
- देशीगाय- तिच्या पाठीवर वशिंड आणि गळ्याला पोळ आणि भारतीय असलेली गाय म्हणजे देशी गाय होय.
- विदेशी गाय- जर्सी व एचएफ या गाय जातींमध्ये पाठीवर वशिंड नसते तसेच गळ्याला पोळ नसलेल्या आणि पाश्चात्य देशातील गाई होय. सध्या ग्रामीण भागांमध्ये देशी गाईंच्या सोबत जर्सी गाई बऱ्याच ठिकाणी आढळून येतात. काही ठिकाणी देशी गायी पेक्षा जर्सी आणि एचएफ गाईंचे प्रमाण जास्त दिसते. यामागील प्रमुख कारण म्हणजे जर्सी आणि एचएफ गाईंचे वार्षिक दूध उत्पादन क्षमता जास्त आहे. देशी गाईच्या तुलनेत या गाईंच्या वार्षिक दूध उत्पादन क्षमता मध्ये खूप मोठा फरक आहे.
जर्सी आणि एचएफ तसेच देसी गाईंच्या दूध उत्पादनातील फरक
- देशी गाईंच्या तुलनेमध्ये जर्सी व एचएफ जातीच्या गाई मध्ये वार्षिक दूध उत्पादन क्षमता जास्त असते व फॅटचे प्रमाण देखील सारखेच आहे.
- महाराष्ट्रातील मुंबई व कोल्हापूर तसेच पुणे या ठिकाणी देशी गाईच्या दुधाचे दर जरी प्रतिलिटर 60 ते 70 रुपये आहेत. परंतु त्यांची प्रतिदिन दूर जाण्याची क्षमता फक्त पाच ते दहा लिटर एवढेच आहे. त्या तुलनेमध्ये जर्सी आणि एचएफ गाईंचे प्रतिदिन दूध देण्याची क्षमता सरासरी वीस लिटर आहे. या गाईच्या दुधाचे दर हे स्थानिक बाजारपेठ व फॅटनुसार बदलत असतात.खाद्य, संगोपन आणि अन्य देखभाल खर्च देशी गाई आणि जर्सी तसेच एचएफ गाई यांना सारखाच येतो.
- देशी गाईच्या तुलनेत जर्सी व एच एफ गाईपासून मिळणारे उत्पन्न जास्त आहे. शिवाय या गाईच्या दुधापासून आपण तूप, खवा, पनीर आणि दही यासारखे प्रक्रियायुक्त पदार्थ घरगुती पातळीवर बनवून स्थानिक बाजारपेठेत त्यांची विक्री करू शकतो. स्थानिक बाजारपेठेचा विचार केला तर गाईचे तूप साधारणता चारशे ते 850 रुपये प्रति किलो याप्रमाणे विकले जाते तर पनीर 250 ते 300 रुपये प्रति किलो दराने विकले जाऊ शकते.
Share your comments