काल पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये मेंढपाळासोबत एक दुःखद घटना घडली. येथील लोणीदेवकर (एमआयडीसी) परिसरात चारायला आणलेल्या कळपातील जवळपास 50 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. तर मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. यामध्ये मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये अजून ३० ते ४० मेंढ्या अत्यवस्थ आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार केले जात आहेत.
दरम्यान, या मेंढ्या दौंड तालुक्यातील गिरीम येथील मेंढपाळ भिवा रामा झिटे यांनी चरायला आणल्या होत्या. मात्र याठिकाणी आल्यानंतर ही घटना घडली आहे. या मेंढ्या कशामुळे दगावल्या याबाबत अजून माहिती समोर आली नाही. मेंढपाळ झिटे हे गेली पंधरा दिवसांपासून इंदापूर परिसरात मेंढ्यांचा कळप घेऊन आहेत. मात्र, मंगळवार पासून मेंढ्यांचे कान सुजणे, डोळे सुजने, ताप अशी लक्षणे मेंढ्यांमध्ये आढळू लागली. यामुळे त्यांनी डॉक्टरांना संपर्क केला.
असे असताना या मेंढ्यांचा मृत्यू झाला. पशुधन विकास अधिकारी डॉ. रामचंद्र शिंदे यांनी वैद्यकीय डॉक्टर व कर्मचाऱ्यांची टीम घटनास्थळी पाठवून इतर मेंढ्यांवर औषधोपचार सुरू केले आहेत. मात्र अजूनही मेंढ्या दगावण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी सदरील ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली. याबाबत आता चौकशी सुरु करण्यात आली आहे.
शेतपंप चोरणारांच्या मुसक्या वालचंदनगर पोलिसांनी आवळल्या, सणसरमधून चोरट्यांना अटक
याबाबत डॉ. शीतलकुमार मुकणे म्हणाले की, सदरील घटना समजताच स्थानिक वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर यांनी मेंढ्यांवर आवश्यक औषधोपचार सुरू केले आहेत. मेंढ्या कोणत्या कारणाने दगावल्या, हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर समजणार आहेत. मात्र यामध्ये या मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले आहे. आता आजारी असलेल्या मेंढ्यावर उपचार सुरु आहेत.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो काळजी घ्या, राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, आता याठिकाणी जोरदार पाऊस पडणार
शेणापाठोपाठ आता सरकार शेतकऱ्यांकडून खरेदी करणार गोमूत्र, शेतकऱ्यांचा होणार फायदा...
निवडणुक हरल्यानंतर उमेदवाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, राजकारणासाठी गेला जीव...
Share your comments