सध्या शेतीसह पशुपालनामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. यामुळे याचा शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होत आहे. आधुनिक पशुपालन आणि पशुपालन करताना शेतकऱ्यांना लागणाऱ्या अनेक गोष्टींचा विचार करून धेनू ॲप हे शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पशुपालन करणे खूपच सोपे आणि फायदेशीर झाले आहे.
अनेक शेतकरी धेनू ॲपमुळे निश्चिंत झाले आहेत. आता या ॲपचा वापर करून ज्या प्रयोगशील पशुपालकांनी आपल्या दुग्धव्यवसायात अतुलनीय क्रांती घडवली आहे, अशा पशुपालकांना शिर्डीच्या महापशुधन एक्सपोमधील नाविन्य जाणून घेण्यासाठी आमंत्रित करून धेनू ॲपशी केलेल्या कार्याची पोचपावती म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तमाम शंभर प्रयोगशील पशुपालकांना धेनू ॲपचा डिजिटल पशुपालक पुरस्कार देण्यात आला आहे.
हे प्रयोगशील पशुपालक दुग्धव्यवसायातील आधुनिक माहिती व तंत्रज्ञानासाठी दररोज धेनू ॲप मधील प्रश्न उत्तरे, पशु बाजार, पशु ज्ञान, पशु व्यवस्थापन, पशु सल्ला, बिझनेस पेज, प्रतिसाद अहवाल, धेनु वार्ता, ट्रेनिंग सेंटर, ताज्या घडामोडी, यशोगाथा इत्यादी विभागांचा व सेवा सुविधांचा लाभ घेतात. शेतकरी दुग्ध व्यवसायात आधुनिक व्हावा व दिनू ॲपच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे दूध उत्पादनाचा खर्च कमी होऊन आर्थिक उन्नतीत वाढ व्हावी यासाठी धेनू ॲपने शेतकऱ्यांना ही सेवा प्ले स्टोअरवर निशुल्क उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे कित्येक शेतकऱ्यांचे गोठे आधुनिक होऊन पशुपालक डिजिटल होताना दिसून येत आहे.
धेनू ॲपच्या मदतीने आधुनिक पशुपालनाची माहिती तर मिळतेच परंतु, पशु बाजाराचेही धडे देखील शेतकऱ्यांना समजायला लागले आहेत. पशूंचे-खरेदी विक्रीचे व्यवहार देखील अगदी कमी वेळेत आणि मनासारखे होत आहेत. यामुळे शेतकरी व पशुपालकांसाठी धेनू ॲप फायदेशीर ठरत आहे. अगदी ज्या गाईंचा व्यवहार करण्यासाठी दिवस खर्ची करावा लागत होता, तीच गाई आता एका तासात विकली जात असल्याची कित्येक उदाहरणे ही या ॲप मधून आपणास बघायला मिळतील.
पशूंच्या आरोग्याच्या तक्रारी, त्यावरचे उपाय, पशूंची जात, वय, वजनानुसार पशुखाद्य, वेगवेगळ्या प्रकारचे आजार, व पशु सल्ला मार्गदर्शन तसेच प्रशिक्षणासह व्यवस्थापनपर सर्व माहिती शेतकऱ्यांना यामध्ये उपलब्ध करून दिली जाते. यामुळे शेतकऱ्यांना कुठेही बाहेर जावे लागत नाही. यामुळे धेनू ॲप शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरत आहे. माहिती व तंत्रज्ञानामुळे शेती क्षेत्राचा तर विकास झालाच आहे परंतु, दुग्धव्यवसाय क्षेत्र ही यामध्ये मागे राहू नये म्हणून धेनू ॲपने ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांचा डिजिटली विकास करण्यासाठी खारीचा वाटा उचलला आहे. त्यामुळे तरुण बेरोजगारांना व पारंपारिक पद्धतीने दुग्धव्यवसाय करणाऱ्या पशुपालकांना सध्या चांगले दिवस आले आहेत.
काय सांगता! आता उसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी, जाणून घ्या..
धेनू ॲपने शेतकरी व पशुपालकांच्या नेमक्या गरजा लक्षात घेऊन भारतीय व अमेरिकन तज्ञांच्या सहाय्याने धेनू ॲप विकसित केले आहे. या धेनू ॲपच्या आधुनिक तंत्रज्ञानाचे सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. सध्या सुशिक्षित बेरोजगार तरुण हे दुग्धव्यवसायाकडे वळालेले आहेत. या सुशिक्षित तरुणांना दुग्धव्यवसायातील योग्य दिशा देण्याचे काम धेनू ॲप करत आहे.
दररोज कित्येक पशुपालक या धेनू ॲपच्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडले जात आहेत आणि आपल्या दुग्धव्यवसायाला डिजिटली करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचीच प्रचिती म्हणून महाराष्ट्रातील 100 प्रयोगशील पशुपालकांना गेल्या एक वर्षभर धेनू ॲप बरोबर केलेल्या कार्याचा गौरव म्हणून शिर्डीच्या महापशुधन एक्सपोमध्ये धेनू ॲपचा डिजिटल पशुपालक पुरस्कार देण्यात आले आहेत.
कांदा अनुदानासाठी 'या' तारखेपर्यंत मुदत, असा करा अर्ज..
त्यावेळी अनेक पशुपालकांनी धेनू ॲपमुळे आमच्या दुग्धव्यवसायात झालेले बदल व होणारे फायदे बोलून दाखवले त्यावेळी काही पशुपालकांसाठी हे तंत्रज्ञान नवे असल्याने या तंत्रज्ञानाचे फायदे थेट जुन्या पशुपालकांकडून जाणून घेतल्याने कित्तेक नवीन पशुपालक देखील धेनू ॲपशी जोडले गेल्यामुळे त्यांना देखील धेनु मित्र या नात्याने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी कंपनीचे संचालक श्री.संतोष खवळे व डिजिटल बिजनेस मॅनेजर श्री.नितीन पिसाळ व त्यांच्या धेनू टीमने यांनी पशुपालकांचे आभार मानून पुढील दुग्धव्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.
टीप- पशुपालन व दुग्धव्यवसायातील आधुनिक माहिती व तंत्रज्ञानासाठी आजच प्ले स्टोअरवरून धेनू ॲप डाऊनलोड करा
लिंक-https://play.google.com/store/apps/details?id=com.dhenoo.tech&referrer=4T2N8M
लेखक,
नितीन पिसाळ
डिजिटल बिजनेस मॅनेजर
धेनू टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड
शिर्डीच्या महापशुधन एक्सपो मध्ये पशुपालकांना मिळणार धेनू ॲपचे आधुनिक तंत्रज्ञान...
ईकोदीप निर्मिती उद्योग हा महिला सक्षमीकरणाचा महामार्ग- डॉ.लक्ष्मण प्रजापत
पुसा कृषी प्रदर्शनात धेनू ॲपचे आधुनिक तंत्रज्ञान ठरले पशुपालकांचे प्रमुख आकर्षण…
Share your comments