1. पशुधन

जगातील फायदेशीर पशुधन शेतीच्या दहा आयडिया

आपल्याला सर्वांना माहिती आहे की, शेती व्यवसायाबरोबर अनेकजण पशुपालनाचा व्यवसाय करतात. शिवाय पशुपालनाचा व्यवसाय हा अधिक नफा देणारा मार्ग आहे. ज्याच्याकडे जनावरे आहेत त्यांच्याकडे लक्ष्मी नांदते यात शंका नाही. यामुळे आपण बोलताना पशुधन म्हणत असतो. आज आपण अशाच काही पशुपालनाविषयी माहिती घेणार आहोत, ज्यांना प्रचंड मागणी आहे.

KJ Staff
KJ Staff


आपल्याला सर्वांना माहिती आहे की, शेती व्यवसायाबरोबर अनेकजण पशुपालनाचा व्यवसाय करतात.  शिवाय पशुपालनाचा व्यवसाय हा अधिक नफा देणारा मार्ग आहे.  ज्याच्याकडे जनावरे आहेत त्यांच्याकडे लक्ष्मी नांदते यात शंका नाही.  यामुळे आपण बोलताना पशुधन म्हणत असतो.  आज आपण अशाच काही  पशुपालनाविषयी  माहिती घेणार आहोत, ज्यांना प्रचंड मागणी आहे.  पशुपालन करताना आपल्याला दोन तीन गोष्टींची दक्षता घ्यावी लागते. एकतर जनावरांची निवड, दुसरी गोष्टी म्हणजे जागा या गोष्टींची दक्षता घ्यावी लागते.

(Top Livestock Farming Business Ideas) पशुधन शेती व्यवसायाच्या मुख्य कल्पना

(Poultry Farming)  पोल्ट्री - सध्या कोरोनामुळे आपल्याला या व्यवसायात नुकसान दिसत असेल पण पोल्ट्री असा व्यवसाय हा ज्यातून आपल्याला मोठा नफा मिळत असतो. यासाठी आपण योग्य चांगल्या गुणवत्ताधारक कंपनीशी करार करावा त्यांच्याकडील पिल्ले घ्यावी. पोल्ट्रीमधून आपण चिकन (मांस) आणि अंड्यामधून पैसा कमावू शकतो. मांसाची मागणी खूप आहे. आपण कमी -कमी प्रमाणात हा व्यवसाय सुरू करु शकतो.

(Goat Farming) शेळीपालन

शेळ्यांपासून आपण मांस आणि दूध मिळवत असतो. पशुपालन करणाऱ्यांना माहिती आहे, की शेळीपालनात किती फायदा असतो. शेळीपालनासाठी खर्च फार कमी येत असतो, मात्र नफा हा मोठा मिळत असतो. शिवाय हा व्यवसाय तुम्ही कमी जागेतही सुरू करु शकता.

(Dairy Farming )डेअरी व्यवसाय  - हा दुसऱ्या क्रमांकाचा अधिक उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. फक्त दूध विक्री नव्हे तर दुधापासून बनविण्यात येणारे पदार्थ तयार करुन आपण पैसा कमावू शकतो.

(Fish Farming) मत्स्य शेती - हा एक चांगला पर्याय आहे. जर आपल्याकडे शेत तळे असेल तर आपण मत्स्य शेती करुन पैसा कमावू शकतो. या तळ्यात आपण विविध जातीचे मात्स्य बीज टाकून उत्पन्न घेऊ शकतो. मासे पालन व्यवसाय सुरू करताना, स्थानिक मागणी समजून घेण्यासाठी बाजारपेठ करणे महत्वाचे आहे. आजकाल, सजावटीच्या मासे पालन देखील लोकप्रिय होत आहे.

(Pig Farming) वराह पालन शेती - काही वर्षांपासून वराह पालन शेती लोकप्रिय झालेली असून अंदाजानुसार, दरवर्षी जगभरात 1 अब्ज डुकरे कत्तल केले जाते.  सर्वाधिक वराहांची निर्यात करणाऱ्या देशांमध्ये युरोपियन संघ, युएस, आणि कॅनडा यांचा समावेश होतो. आपण वराह पालन म्हटलं की, याचा उपयोग मांससाठी केला जातो असे समजत असतो, परंतु मांस व्यतिरिक्त वराहाची त्वचा, चरबी आणि इतर साहित्य कपडे, सौंदर्यप्रसाधने, प्रक्रिया केलेले खाद्य पदार्थ आणि वैद्यकीय औषधांसाठी वापरली जातात.

 

(Crab Farming) खेकडा पालन

भारत, बांगलादेश आणि थायलंडसह आशियाई देशांमध्ये चिखल खेकडे चिखलात राहणारे खेकडे लोकप्रिय आहेत. या देशामध्ये मोठ्या प्रमाणात या खेकड्यांचे उत्पादन घेतले जाते. अंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये या खेकड्यांना खुप मागणी आहे.  फार कमी खर्चात आपण या खेकड्याची शेती सुरू करू शकतो.


(Quail Farming) बटेर पक्षीपालन - हा एक जंगली पक्षी आहे, पण मांसाहार खाणाऱ्यांसाठी  हा आवडीचा पक्षी आहे. बटेर पक्ष्याचे मांस रुचकर व स्वादिष्ट असते. त्यामुळे याची मागणी अधिक आहे. या पक्ष्याची किंमत ही ५५ ते ६० रुपये असते. या पक्ष्याचे अंडेही विकले जातात.

(Pearl Farming) मोतींची शेती - मोतींच्या शेतीला सध्याच्या घडीला फार महत्त्व आहे. आपण आता कृत्रिमरित्याही मोती बनवू शकतो. परंतु या व्यवसायासाठी दीर्घकालीन योजना आखावी लागते.

 


(Sheep Farming)मेंढीपालन - पशुधन शेतीतील हा उत्तम पर्याय आहे. कमी पैशात अधिक उत्पन्न मिळवण्याचा हा एक मार्ग आहे. परंतु मेंढीपालन करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते ती म्हणजे मेंढीची योग्य जात ओळखून आपण त्यांची निवड केली पाहिजे. आपल्याकडील वातावरणात कोणत्या मेंढ्या ह्या योग्य असतात त्यानुसार आपण मेंढ्या खरेदी केल्या पाहिजेत. भारत, चीन, ऑस्ट्रेलिया आणि इराणमध्ये मेंढ्यांचे मोठे उत्पादन होत असते. मेंढ्यापासून आपल्याला दूध, मांस, लोकर मिळत असते.

(Duck Farming) बदक पालन शेती

जर आपण कमी किमतीत पशुधन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करीत असाल तर आपण बदके पालन विचार करू शकता. योग्यरित्या केले तर बदक शेतीमधूनही आपण मुबलक पैसे कमावू शकतो. जगभरात याची शेती होत असते, बदकाचे मांस, अंडीपासून आपण पैसे कमावू शकतो. पाण्याशिवायसुद्धा वाढवता येतात. याव्यतिरिक्त बदके हे मजबूत पक्षी आहेत, त्यांना अतिरिक्त काळजी आणि व्यवस्थापनाची आवश्यकता नाही.

English Summary: 10 Most Demanding and Profitable Livestock Farming Business Ideas Worldwide Published on: 24 April 2020, 05:09 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters