सध्या पीक पद्धतीमध्ये वेगाने बदल होत असून भाजीपालावर्गीय पिकांमध्ये देशातील बरेच शेतकरी विदेशी भाजीपाला पिकांच्या लागवडीकडे वळले आहेत. उदाहरणच घ्यायचे झाले तर ड्रॅगन फ्रुटच्या बाबतीत मागच्या चार ते पाच वर्षांचा विचार केला तर भारतामध्ये एवढे परिचित नव्हते परंतु आता मोठ्या प्रमाणात भारतात ड्रॅगनफ्रुटची लागवड शेतकरी करताना दिसत आहेत.
एवढेच नाही तर बऱ्याच प्रकारच्या विदेशी भाजीपाल्याची देखील लागवड शेतकरी आता करत असून यामध्ये झुकिनी ही विदेशी भाजी खूप लोकप्रिय असून बाजारात विक्रीला चांगली मागणी असते. या भाजीचा विचार केला तर ती इटली या देशामधून प्रसार होऊन अमेरिका,मेक्सिको, चीन, ब्राझील आणि भारत या देशात मोठ्या प्रमाणात झाला. या लेखात या भाजीचे फायदे आणि अल्पशी माहिती घेऊ.
झुकिनी एक महत्त्वाचे भाजीपाला पीक
झुकिनी या पिकाला समर स्क्वॅश आणि विंटर स्क्वॅश या नावाने देखील ओळखले जाते. या दोन्ही प्रकारातील झाडे हे झुडूपवजा बुटकी असतात. या वनस्पतीच्या झाडावर नर व मादी अशा दोन्ही प्रकारची फुले येतात व नर फुलाचा आकार हा मादी फुलाच्या आकारापेक्षा लहान असतो व त्यांचा रंग पिवळा असतो.
काही देशांमध्ये खाण्यासाठी किंवा काही पदार्थ सजवण्यासाठी देखील झुकिनीच्या फुलांचा वापर केला जातो. या भाजीचा चवीचा विचार केला तर ज्याप्रकारे काकडी आणि दुधीभोपळाची चव लागते, अशा स्वरूपाची मिश्रित चव झुकिनीला असते व आकार एकंदरीत काकडी सारखा असतो.
नक्की वाचा:शेतकऱ्यांना सुवर्णसंधी! ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी मिळणार 70,000 अनुदान, असे मिळवा अनुदान...
झुकिनी आहे आरोग्यासाठी फायदेशीर म्हणून मिळते बाजारात चांगली मागणी
जर आपण झुकिनी भाजीचा विचार केला तर तिच्या मध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे, विविध खनिजे व तंतुमय पदार्थ तसेच स्निग्ध पदार्थ मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे तसेच झुकिनीच्या फळांच्या सालीमध्ये मोठ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे हृदयाचे ठोके देखील नियंत्रित राहतात. एवढेच नाही तर वाढलेला रक्तदाब कमी करण्यासाठी झुकिनी च्या फळांचा वापर करतात.
तसेच झुकिनीच्या फळांमध्ये पोटॅशियमचे प्रमाण देखील मुबलक असते व उच्च प्रकारचा रक्तदाबही याद्वारे नियंत्रित केला जातो. या सगळ्या गोष्टींमुळे बाजारपेठेत हळू हळू झुकिनी स्वतःचे स्थान निर्माण करत आहे व शेतकऱ्यांना त्यांच्या लागवडीतून चांगल्या प्रकारे आर्थिक फायदा देखील देण्याची क्षमता या विदेशी भाजीत आहे.
Share your comments