शेती करत असताना अनेक पिकांचे आपण उत्पन्न घेत असतो परंतु त्या पिकाचे उत्पन्न घेत असताना अनेक रोगांचा व किडींचा सामना आपल्याला करावा लागतो. आणि ते रोग व किडी आल्यानंतर आपण त्याच्यावर उपचार करण्याचे काम परंतु कीड किंवा रोग येण्याअगोदर हे आपल्याला समजले तर किती छान त्यासाठीच आजचा हा लेख, यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्या पिकावर रोग येणे आधी ते आपल्याला कसे समजतील.
पहिला मावा हा मोहरी, बडीशेप, करडई या पिकांवर येतो. त्यावरून ओळखायचे, आपल्या पिकात तो येणार.
शेपूचा शेंडा पांढरा पडला तर बुरशी येण्याचे संकेत. मेथीवर पांढरे डाग पडले तर बुरशी येण्याचे संकेत. मक्याची सिंगल लाइन करून त्याचे कंपाउंड केले व कांदा शेतातही लावल्यास थ्रिप्स कमी येतो. मक्याच्या पोंग्यात मित्रकीटक लवकर तयार होतात. मक्यावर पांढरा व पिवळा मावा लवकर आकर्षित होतो. तो कांद्यावर येत नाही. झेंडूची झाडे शेतात अधिक असली तर लाल कोळी आधी झेंडूला खातो. सूत्रकृमीलाही झेंडू अटकाव करतो.
गोमूत्र व मीठ फवारणीने काळा मावा नियंत्रणात येतो. करडईच्या ज्या पानांवर मावा आला ती गोळा करायची, मोठ्या भांड्यात पाणी, रॉकेल घेऊन त्यात पाने टाकायची. मावा मरतो.
हिरवी मिरची व लसूण व गरजेएवढे थोडे मीठ यांचे योग्य पद्धतीने व योग्य प्रमाणात द्रावण व काढा तयार करायचा. तोंडाला रुमाल बांधून फवारणी करायची, त्यामुळे अळीचे नियंत्रण होते. एका एकरात आठ तुळशी लावल्या तर त्याच्या वासाने शत्रुकीटक पिकाजवळ येत नाहीत.
रणदिवे यांच्याकडे तुळशीची सुमारे दोनशे झाडे आहेत. त्याच्या आजूबाजूला रोग-किडींचे प्रमाण नसल्याचा त्यांचा अनुभव आहे.
लिंबाच्या पाल्याची वा गवरीची जाळून राखुंडी तयार करून ती पिकावर धुरळल्यास नागअळी नियंत्रणात येते.रसशोषक किडींसाठी चिकट सापळे उपयुक्त ठरतात. फळमाशीसाठी गंध रसायन (ल्यूर) चिकट सापळ्याच्या ठिकाणी ठेवल्यास ती तेथे येऊन सापळ्याला चिकटते.
Share your comments