भारतात तीन हंगामात शेती केली जाते. सध्या रब्बी हंगामाची लगबग सुरु आहे. रब्बी हंगामात गव्हाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. रब्बी हंगामातील गव्हाची आगात लागवड हि 10 नोव्हेंबरपर्यंत केली जाते, तसेच पसात गव्हाची लागवड हि 25 नोव्हेंबरपासुन पुढे केली जाते. म्हणुन ज्या शेतकऱ्यांना आगात गहु लागवड करणे शक्य झाले नसेल ते शेतकरी आता पसात गव्हाची लागवड करू शकतात.
त्यामुळे आज आपण गव्हाच्या पसात जातीविषयी जाणुन घेणार आहोत. गहु रब्बी हंगामातील एक प्रमुख पिक आहे, याची लागवड करून अनेक शेतकरी चांगली मोठी कमाई करत आहेत. भारत हा जसा प्रमुख गहु उत्पादक देश आहे तसाच प्रमुख गहु कंज्युम करणारा देश देखील आहे. म्हणुन गव्हाची मागणी हि मोठ्या प्रमाणात असते. गव्हाची पसात लागवड करून देखील अनेक शेतकरी चांगली मोठी कमाई करत आहेत पण यासाठी चांगल्या सुधारित जातीच्या बियाण्याची निवड करणे आवश्यक आहे, नाहीतर पुढे चालून तापमान वाढेल आणि उत्पादन आणि क्वालिटी घटेल. चला तर मग वेळ न दवडता जाणुन घेऊया काही पसात गव्हाच्या जातीविषयी.
JWU 1202
शेतकरी मित्रांनो गव्हाची हि एक सुधारित जात आहे. ह्या जातीची लागवड हि रब्बी हंगामात पसात केली जाते. पसात पेरल्या जाणाऱ्या गव्हाच्या या जातीपासून या जातीपासून हेक्टरी 36 ते 48 क्विंटल पर्यंत उत्पादन घेतले जाऊ शकते. हि वाण पेरणी करणारे अनेक गहु उत्पादक शेतकरी दावा करतात की, ह्या जातीपासून हेक्टरी 60 ते 70 क्विंटल पर्यंत उत्पादन येते.
JWU 1203
गव्हाची हि अजून एक सुधारित जात आहे. ह्या जातीची पेरणी देखील पसात रब्बी हंगामात करण्याचा सल्ला दिला जातो. ह्या जातीची लागवड हि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. गव्हाच्या ह्या वाणातून हेक्टरी 36 ते 46 क्विंटल पर्यंत उत्पादन घेतले जाऊ शकते. त्यामुळे गव्हाची हि सुधारित जात देखील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे.
एमपी 3336
हि देखील गव्हाची एक सुधारित जात आहे. याची लागवड देखील पसात रब्बी हंगामात केली तर चांगले उत्पादन मिळू शकते. गव्हाच्या ह्या जातीला 4 ते 5 पाण्याची गरज भासते. ह्या जातीपासून जवळपास इतर जातीसारखेच उत्पादन हे मिळते. हेक्टरी 35 ते 45 क्विंटल उत्पादन मिळत असल्याचे गहु उत्पादक शेतकरी सांगतात.
Share your comments