1. कृषीपीडिया

Melon Cultivation: या तंत्रज्ञानाचा करा वापर आणि पिकवा बारमाही खरबूज, वाचा कसे…….

Melon Cultivation: विविध पिकांची लागवड आणि लागवडीकरिता वापरण्यात येणारे तंत्रज्ञान यांची योग्य सांगड घातल्यामुळे एक उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येते. यामध्ये संरक्षित शेतीचा विचार केला तर यामध्ये शेडनेट आणि पॉलिहाऊस तंत्रज्ञान खूप महत्त्वाचे आहे. जर आपण पॉलिहाऊस तंत्रज्ञान पाहिले तर यामध्ये नियंत्रित तापमानाचा वापर करून वर्षभर विविध पिकांची लागवड आपण करू शकतो व भरपूर उत्पादन मिळवू शकतो. तसेच कीड व रोग यापासून देखील प्रभावी संरक्षण आपल्याला करता येते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
melon cultivation

melon cultivation

Melon Cultivation:  विविध पिकांची लागवड आणि लागवडीकरिता वापरण्यात येणारे तंत्रज्ञान यांची योग्य सांगड घातल्यामुळे एक उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येते. यामध्ये संरक्षित शेतीचा विचार केला तर यामध्ये शेडनेट आणि पॉलिहाऊस तंत्रज्ञान खूप महत्त्वाचे आहे. जर आपण पॉलिहाऊस तंत्रज्ञान पाहिले तर यामध्ये नियंत्रित तापमानाचा वापर करून वर्षभर विविध पिकांची लागवड आपण करू शकतो व भरपूर उत्पादन मिळवू शकतो. तसेच कीड व रोग यापासून देखील प्रभावी संरक्षण आपल्याला करता येते.

या सगळ्या दृष्टिकोनातून पॉलिहाऊस तंत्रज्ञान हे पीक लागवडीसाठी खूप महत्त्वाचे आहे. याच पॉलिहाऊस तंत्रज्ञानाचा वापर करून महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पुसासरबती, हरा मधु व दुर्गापुरा मधू या खरबूज पिकाच्या वानांची लागवड करण्याची शिफारस केली आहे. या माध्यमातून खरबूज पीक वर्षभर लावता येऊ शकते व उत्पादन मिळवता येऊ शकते.

 पॉलीहाऊस मधील लागवडीची पद्धत

 पॉलिहाऊस मध्ये जर खरबूज लागवड करायची असेल तर नोन यु कंपनीने माधुरी दोन आणि मधुमती यासारख्या वानांची शिफारस केली असून याकरिता पॉलिहाऊस मध्ये उंच गादीवाफे तयार करून खरबूज लागवड करणे गरजेचे आहे.

गादीवाफे तयार करताना त्यामध्ये चार फुटाचे आणि दोन रोपातील अंतर दीड फूट ठेवणे गरजेचे असून वाफ्याची उंची ही साधारणपणे दीड फूट व रुंदी दोन फूट असणे गरजेचे आहे. दहागुंठ्याचे पॉलिहाऊस असेल तर या क्षेत्रामध्ये साधारणपणे रोपांची संख्या 2400 पर्यंत असणे गरजेचे आहे.

 भरघोस उत्पादनासाठी या गोष्टींची घ्या काळजी

 खरबूज लागवड केल्यानंतर जेव्हा मुख्य वेल असते तिला आजूबाजूला येणाऱ्या फांद्या असतात ते वेळोवेळी काढणे गरजेचे आहे. वेलीला पहिले जे काही सात किंवा दहा पाने येतात त्यानंतर पहिल्या फळांची फळधारणा करून घ्यावी.परागीभवनाची योग्य वेळ सकाळी 9 ते 11 व सायंकाळी चार ते सहा या कालावधीत करावी.

वेलीवर एका वेळी शक्य असेल तर एकच फळ ठेवणे गरजेचे आहे. परागीभवन करत असताना आद्रता ८० टक्के असणे गरजेचे असून परागीभवन झाल्यानंतर 50 ते 55 दिवसांमध्ये खरबूज काढणीस तयार होते. काढणी करण्यासाठी रिफ्रॅक्टमीटर च्या साह्याने फळातील साखरेचे प्रमाण तपासून घ्यावी व 14 ते 15 ब्रिक्स झाला तेव्हा त्याचे काढणी करावी. या पद्धतीने जर व्यवस्थापन कराल तर दीड ते दोन किलोपर्यंत फळाचे उत्पादन मिळू शकते.

 पॉलिहाऊस मधील खरबूज पिकासाठी पाणी व्यवस्थापनाची पद्धत

 या पिकाला पाण्याची व्यवस्थापन करताना खूप काळजी घ्यावी लागते. या पिकाला जास्त पाणी चालत नसल्यामुळे ठिबक सिंचन पद्धतीचा वापर हा महत्त्वाचा ठरतो. ठिबक संचाची निवड करताना चार लिटर प्रतितास क्षमता असणारी ड्रीप लाइन याकरिता निवडणे गरजेचे आहे. वातावरण तर ढगाळ असेल तर खूप कमी पाणी लागते. परंतु फळधारणा आणि फळ फुगवणीच्या वेळेमध्ये खूप पाण्याची आवश्यकता असते. साधारणपणे दोन ते तीन लिटर पाणी प्रती झाड प्रत्येक दिवशी असे नियोजन करणे गरजेचे आहे.

अशाप्रकारे करा खत व्यवस्थापन

 खरबूज पिकाला खत व्यवस्थापन करताना नत्राची मात्रा लागवड करताना आणि आणि वाढीच्या अवस्थेमध्ये द्यावे. फॉस्फरसच्या  पुरवठ्याकरिता सिंगल सुपर फॉस्फेट या खताचा वापर करावा तसेच पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या कालावधीत पोटॅश हा घटक देखील महत्त्वाचा ठरतो. या पद्धतीने खतांचे  नियोजन करावे. या मुख्य खतांसोबतच मायक्रो न्यूट्रिएंट आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा देखील संतुलित वापर करणे खूप गरजेचे आहे. बऱ्याचदा खरबूज फळाला छेद जातात. ही समस्या येऊ नये म्हणून अगदी सुरुवातीपासून कॅल्शियम व बोरॉन या अन्नद्रव्यांचा संतुलित वापर करावा.

 काढणी केल्यानंतर व्यवस्थापन

खरबूज पिक  काढणीस तयार होते तेव्हा काढणी झाल्यानंतर कोरोगेटेड बॉक्स मध्ये फोमनेटचा वापर करून फळे पॅकिंग करावीत व विक्रीसाठी पाठवावीत. प्रतिवेल दीड किलोपर्यंत फळे मिळतात.

 पॉलिहाऊस मधील खरबूज लागवडीचे प्रशिक्षण कुठे मिळेल?

 या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पॉलिहाऊस मधील खरबूज लागवड हे प्रामुख्याने कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी केली जाते. या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाची देखील सोय करण्यात आली आहे.

English Summary: you can take production in whole year by use of polyhouse technology Published on: 05 August 2023, 10:27 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters