एकात्मिक कीड व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती मध्ये चिकट सापळ्यांचा वापर करणे फायद्याचे ठरते.
संपूर्ण माहिती साठी संपर्क करा.चिकट सापळे पाहिजे असल्यास लवकरच आपणास उपलब्ध करून देऊ.तसेच घरपोच सुद्धा पाठविले जाणार.आजच संपर्क करा.
रस शोषक किडींचे प्रभावी व्यवस्थापन होण्यास मदत होत असल्यामुळे पिकांना विषानुजन्य रोगांचा जास्त धोका संभावत नाही.
रस शोषक किडीच्या पिल्ले व प्रौढ अवस्थांचे सुद्धा प्रभावी व्यवस्थापन करता येते.
पालेभाज्या, फळभाज्या व फळपिकांमध्ये रसायन विरहित कीड व्यवस्थापणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे तंत्रज्ञान आहे.
बहुतेक कीडनाशके ही किडींच्या अंडी किंवा पिल्ले अवस्थेपुरतेच परिणामकारक दिसतात व प्रौढ अवस्थांचे व्यवस्थापणाकरिता फायद्याचे ठरत नाहीत, परंतु चिकट सापळे प्रौढ अवस्थेमध्येच किडींचे व्यवस्थापन करून
त्यांची पिढील वेळीच अटकाव आणतात.
किडीमध्ये प्रतिकारक्षमता निर्माण होण्याची भीती नाही.
चिकट सापाळ्यांच्या वापरामुळे पिकांना व मानवाला विषबाधेचा धोका नाही.
रस शोषक किडी, भुंगेरावर्गीय, माशीवर्गीय, ढेकूनवर्गीय, पाकोळी व पतंगवर्गीय किडींचे प्रभावी व्यवस्थापन करण्याची क्षमता असलेले एकमेव तंत्रज्ञान म्हणजे चिकट सापळे.
रासायनिक कीडनाशकांच्या दोन ते तीन फवारण्या कमी करून पीक संरक्षणाचा खर्च कमी करण्यासाठी उपयुत.
Share your comments