सध्या शेतकरी (farmers) आपल्या शेतीमध्ये फळपिकांची लागवड करून चांगले उत्पादन घेत आहेत. मात्र फळपिकावरील फळमाशीचा प्रादुर्भावमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशातच यावर भन्नाट उपाय शिळ येथील शेतकऱ्याने शोधला आहे.
काकडी, पडवळ, दोडकी अशा फळपिकांवर मोठया प्रमाणात फळमाशीचा प्रार्दुभाव (Fruit fly infestation) झाला आहे. त्यामुळे ही फळे सडून शेतकर्याचे मोठे नुकसान होत आहे. यावर शिळ येथील तरूण शेतकरी सुनिल गोंडाळ यांनी यु टयुबच्या सहाय्याने यशस्वी उपाययोजना केली आहे.
पितृ पक्षा दरम्यान कावळ्यांना अन्न का दिले जाते? जाणून घ्या त्याचे महत्त्व आणि कथा
फळांवर पडणारी ही फळमाशी तयार झालेल्या फळांवर मोठ्या प्रमाणात अॅटक (attack) करते. यावेळी ही फळमाशी या फळातील रस शोषून घेऊन त्यात ती अळी घालते.
त्यामुळे या फळांना कीड सदृश्य लागण होऊन तयार फळे पूर्णत: बाधित होत आहेत. त्यावर गोंडाळ यांनी लूर गोळीचा वापर करत प्लास्टीक बाटल्यांच्या आधारे सापळा बनवत यावर प्रभावी उपाय शोधला आहे.
गोंडाळ हे छोट्या प्रमाणात आंबा व्यवसाय (Mango business) करतात. मात्र यावर काय उपाय योजना करावी याबाबत त्यानी यु टयुबच्या आधारे काही माहिती मिळविली आणि कृषी पदवीका मिळविलेल्या गावातील तरूण नामदेव गोंडाळ यांच्या मदतीने लूर नामक गोळीचा वापर करत सापळा बनविला.
'या' जिल्ह्यात हळद संशोधन केंद्र उभारले जाणार; सरकारकडून 100 कोटींचा निधी उपलब्ध
प्रयोग ठरला यशस्वी
प्लास्टीकच्या बाटलीत छोटे छोटे होल मारून अर्ध्यावर रंगीत पाणीभरले त्यावर लूरची गोळी टांगली. लूरच्या वासाने आणि रंगीत पाण्याकडे माशा आकर्षित होतात आणि बाटलीत शिरतात.
बाटलीमध्ये असलेल्या लूर गोळीच्या वासाने त्यांना गुंगी येते आणि आपसूक त्या खालच्या पाण्यात पडतात. अशा प्रकारे त्यांनी सापळे बनवून फळमाशीचा प्रार्दुभाव रोखला आहे.
महत्वाच्या बातम्या
गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! फक्त 417 रुपये गुंतवा आणि मिळवा 1 कोटी रुपये
शेतकऱ्यांनो मेथीच्या 'या' वाणांची शेती करा; 50 हजार रुपयांपर्यंत मिळेल उत्पन्न
शेतकऱ्यांनो येत्या 10 दिवसात जनावरांचा तातडीने विमा उतरवावा; राजू शेट्टींची मागणी
Share your comments