परंतु किती काळ महिला नायिकांची मिरवणूक मिरवीत राहणार, या बाजारपेठेच्या युगात आम्ही त्याचे अस्तित्व एक ब्रँड आणि उत्पादन म्हणून पाहीले जात आहे. आणि त्याच्या सृजनशील सहकार्याच्या स्वरूपाकडे दुर्लक्ष केले जात आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनी महिला सक्षमीकरणासाठी घोषणा देण्यात येत आहेत. पण अशी कोणती वृत्ती आहे जी आजही स्त्री मुळात कमकुवत असल्याचे दावा करते? आजच्या युगातील पुरुषांपेक्षा स्त्रियांना कमी जबाबदारी कमी पगार देण्याची ही वृत्ती वाढतआहे.
हे खरं आहे की स्त्रियांनी त्यांच्या क्षमतेच्या बळावर नवीन क्षेत्रात यशाचे शिखर गाठले असून . कधीकधी अशिक्षिततेच्या अंधारातून महिला आणि मुलींना शिक्षण आंदोलने करावी लागली. आणि आज शिक्षणात उत्तीर्ण होण्याची टक्केवारी आणि पदवी परीक्षांमध्ये सर्वाधिक गुण मिळविण्यामध्ये मुलांना मागे टाकले आहे. नोकरी मध्ये च्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये त्यांचे यश मिळवण्याचे प्रमाण मुला व पुरुषांपेक्षा बरेच जास्त आहे. महिला या पुरूषा पेक्षा कमी कोठेही नाही. मग स्त्री पुरुष समानता का दिसत नाही आपण स्त्रिया प्रती असलेली दुय्यम नैतिक मानसिकता कधी सोडण्यास सक्षम होऊ? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
स्त्रियांचे आरोग्य हे फक्त त्यांच्या पुनरुत्पादक आरोग्याच्या भूमिकेतच मर्यादित ठेवणे योग्य आहे का? कारण स्त्रिया आपल्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ हा गरोदरपणात आणि मुलाबाळांच्या संगोपनात घालवतात. त्या गरोदर असताना त्यांच्या आरोग्याकडे गांभीर्याने बघण्याचा दृष्टिकोन हाच नंतर त्या गरोदर नसताना त्यांच्या आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. कारण स्त्रियांना अशा काही रोगांना व आरोग्याच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते ज्यांचा संबंध त्यांच्या पुनरुत्पादक भूमिकेशी नसतो. सर्व क्षेत्रात यश मिळविणारी स्त्री घर, नोकरी, संसार या तिन्ही पातळ्यांवर जबाबदारी पेलत आहे. या जबाबदाऱ्या पेलताना त्यांची कसरत होत आहे. परंतु, या कसरतीमध्ये महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचे आता दिसून येत आहे. बदलती जीवनशैली, धकाधकीचे जीवन, नोकरीसाठी होणारी धावपळ, ताणतणाव, बैठे कामाच्या पद्धती, त्यामुळे खाण्याच्या चुकीच्या सवयी, वेळेचा अभाव असल्याने व्यायामाकडे होणारे दुर्लक्ष यासारख्या विविध कारणांनी ‘फॅमिली केअरटेकर’ बनलेल्या महिलांचे आरोग्य दुर्लक्षित होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.पूर्वीच्या आणि आताच्या महिलांच्या जीवनपद्धतीत फरक पडला आहे. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे महिलांमध्ये ‘हायपो थायरॉयडिझम’ची समस्या अधिक वाढते. महिलांमध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिनचे प्रमाण कमी जास्त होते. त्यामुळे ‘हायपो थायरॉयडिझम’चा आजार बळावतो. वजन वाढ होतेय. मानसिक ताणाखाली अनेकदा महिला राहत असल्याने हा आजार वाढण्यास मदत होते. धूम्रपान व मद्यसेवन करण्याचे त्यांच्यातील प्रमाण देखील वाढले आहे.
या कारणांमुळेच महिलांमध्ये रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, थायरॉइडचे आजार, अनियमित मासिक पाळी, स्तनांसह गर्भाशयांच्या तोंडाचा कॅन्सर, हाडांचे आजारदेखील वाढल्याची निरीक्षणे स्त्रीरोगतज्ज्ञ नोंदवित आहेत. देशात दुसऱ्या क्रमांकावर असलेला स्तनांचा कॅन्सर आता पहिल्या क्रमांकावर आहे. स्तनांचा कॅन्सर झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात त्या तक्रारी घेऊन येतात. त्यानंतर त्याचे निदान आणि उपचार करणे शक्य होत नाही.स्त्रियांना स्वतःच्या आरोग्याच्या गरजांचे प्रकटीकरण करता यावे यासाठी त्याबाबत अवकाश निर्माण केला जाणे महत्त्वाचे आहे. कारण स्त्रियांच्या आरोग्याला दुर्लक्षित करणारा कळीचा घटक म्हणजे पुरुषसत्ताक समाजव्यवस्था. कुटुंब आणि स्वतःला स्त्रिया सुद्धा आपल्या आरोग्याच्या गरजा केवळ पुनरुत्पादक चौकटीतच बघतात. त्यामुळे स्त्रियांच्या आरोग्य संदर्भात स्त्रियांना आपल्या गरजांकडे पुनरुत्पादक चौकटीच्या पलीकडे तसेच आपल्या सामाजिक पारंपरिक साचेबंद भूमिकांच्या पलीकडे जाऊन बघण्यासाठी सक्षम करणे हे सर्वात महत्त्वाचे ठरते. आपण ढोबळमानाने स्त्री-पुरुषांच्या स्थितीची आरोग्याच्या चौकटीतून तुलना केली तर स्पष्ट दिसते की, स्त्रियांची स्थिती ही जास्त बिकट आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रीयांचे आरोग्य सेवांचा वापर कमी करतात. बाह्यरुग्ण विभागातील सेवांचा वापर करणाऱ्या तीन पुरुष रुग्णांमागे एक स्त्री या सेवा वापरते. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाबतीत ही संख्या पाच पुरुषामागे एक स्त्री इतकी आहे. कारण स्त्रिया पारंपरिक घरगुती उपचारांचाच उपयोग जास्त प्रमाणात करतात.
अजून सर्वात गंभीर समस्या म्हणजे भारतातील माता मृत्यूदर खूप जास्त आहे. बाळंतपण अत्यंत कष्टप्रद आणि कधीकधी धोकादायक प्रक्रिया असते. क्वचित प्रसंगी त्यात मुली आणि माता दोघेही दगावू शकतात. याचे प्रमुख कारण म्हणजे बहुतेक स्त्रिया लहान वयातच गरोदर होतात. तसेच ‘उशीरा लग्न झाल्याने महिलांना उशीरा आई होण्याची संधी मिळते. त्यामध्ये अनेकदा गुंतागुंत होते. म्हणून स्त्रियांच्या मृत्यूची प्रमुख कारणे गर्भपात, गर्भाची स्थिती व्यवस्थित नसणे इत्यादी कारणे ठरतात. तसेच गर्भधारणा झाल्यावर तिच्या शरीरात इतक्या रासायनिक घडामोडी घडत असतात की त्याचा परिणाम तिच्या मज्जासंस्थेवर होतो. त्यामुळे मानसिक संतुलन बिघडणे, नैराश्य येते.तिच्या रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होते आणि मग अशक्तपणा येतो. परंतु या बाळंतपणानंतर जर दिला काही अपघात झाला किंवा मोठा आजार झाला तसेच पुरेशी विश्रांती आणि सकस आहार मिळाला नाही. किंवा ती थोडया -थोड्या अंतरावर वरचेवर गरोदर राहिली तर तिला अकाली वृद्धत्व येते. गरीब देशातील कष्टकरी महिला म्हणूनच अकाली वृद्ध दिसायला लागतात. अनेक स्त्रिया या पहिल्याच बाळतपणानंतर शरीराने खिळखिळ्या होतात. पाठदुखीसारख्या काही व्याधी त्यांना कायमच्या चिकटतात. मुलाला अंगावर पाजण्यामुळे सुद्धा आईला थकवा येतो. स्त्रीच्या त्रासाचे व कमकुवतपणाचे मूळ तिच्या पोटात असते अशा अर्थाचा एक वाक्यप्रचार आहे व तो काही अंशी खराही आहे कारण स्त्रीच्या पुनरुउत्पादनाशी संबंधित अवयवांचे कार्य बिघडले की, तिला अनेक आजारांना तोंड द्यावे लागते.माता म्हणून स्त्रियांच्या आरोग्य गरजा आहेत त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला स्त्रियांना श्रमिक म्हणून, उत्पादक व्यक्ती म्हणून कुठल्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे ते बघणे ही गरजेचे ठरते. स्त्रियांची कंबरदुखी, पाठदुखी यासारख्या तक्रारी ‘नेहमीच्याच’ व दुर्लक्षित बनतात. खरे तर कुठल्याही विशिष्ट प्रकारच्या कामामुळे नाही, तर ‘अतिकाम’ हा स्त्रियांच्या आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका आहे.
घरकामाच्या बरोबरीने स्त्रिया मोठ्या प्रमाणात नोकरीत, घरच्या शेतीत, कौटुंबिक धंद्यामध्ये, घरगुती उद्योगांमध्ये विनामोबदला श्रमिक म्हणून काम करतात. आता घरच्याच उद्योगांमध्ये मोबदल्यासाठी स्त्रियांचा सहभाग वाढला असला तरी घरगुती कामांची जबाबदारी ही अजूनही स्त्रीचीच मानली जाते. त्यामुळे या दुहेरी श्रमामुळे स्त्रिया शारीरिक दृष्ट्या थकतात. त्यात स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी शारीरिक आणि मानसिक असा दुहेरी त्रास सोसावा लागतो. वेळप्रसंगी सार्वजनिक स्वच्छतागृहांची उपलब्धता नसणे त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम हा मुद्दा आजही दुर्लक्षितच आहे.स्त्रिया आरोग्यसेवांचा कितपत अनुभव घेतात याकडे जरा खोलात जाऊन पाहिलं तर असंही चित्र दिसतं की, स्त्रिया काही आजाराच्या समस्या जाणवल्या की घरगुती उपचार करतात. जेव्हा एखादा आजार अगदी टोकाला जातो तेव्हाच ते डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतात. आरोग्याच्या छोट्या छोट्या तक्रारींकडे त्या दुर्लक्ष करतात. आता या मागील कारण वर्गीय स्तरांवरही अवलंबून असतात ती अशी की, सरकारी सेवांवरील नसलेल्या विश्वासामुळे खाजगी सेवांकडे वळायचे तर त्या महाग असतात त्यामुळे तेही टाळले जाते. आणखी अशी काही कारणे की अनेक वेळा आरोग्य सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसतात. दवाखाने लांब असतात, सेवा उपलब्ध देणारे नीट लक्ष देत नाहीत, आरोग्य केंद्रात जायचे तर मजुरी बुडवून चालणार नाही आणि त्या पेशंटला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी कुटुंबातील आणखी एका व्यक्तीची मजुरी बुडते जे की परवडत नाही अशी अनेक कारणे असतात.स्त्रीप्रजनन ते रजोनिवृत्ती या काळात स्त्रियांना बऱ्याच शारीरिक समस्या निर्माण होतात. जसे पीसीओडी, स्थूलता, उच्चरक्तदाब, मधुमेह, हाडे व सांध्याचे विकार, स्तनातील व गर्भाशयातील गाठी, स्तन व गर्भाशयाचा कॅन्सर, मासिक पाळीच्या तक्रारी, अॅनिमिया, थायरॉइड, मानसिक तणाव, डिप्रेशन आदी. या व्याधींच्या कारणांमधील एक महत्त्वाचे कारण म्हणजे पोषणयुक्त आहाराचा अभाव दिसून येते
कोरोना साथीच्या महामारीने अनेक ठिकाणीही महिलांचे अधिक शोषण झाले. अमेरिकेतही असे अहवाल प्रसिद्ध झाले आहेत की एका वर्षात तेवीस लाख महिला कामगार कक्षेच्या बाहेर झाले . महिलांना आपत्कालीन प्रसूती संरक्षण सुट्टीही मिळाली नाही. सुट्टीची मागणी केल्यास महिलांना काढून टाकले जाते. आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की दर तीनपैकी एका मुलासाठी स्त्रिया आपली नोकरी सोडली आहे . परंतु नोकरीवरून काढून टाकल्यानंतर महिलांनी तिथे त्यांच्या मालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. आतापर्यंत अमेरिकेत 58 महिलांनी मालकांविरूद्ध समान गुन्हे दाखल केले आहेत.
हेच चित्र काही प्रमाणात भारतातही दाखवले गेले आहे. कोरोना साथीच्या आजारांमधे, स्त्रियांमध्ये सर्वाधिक नोकर्या गमावल्या गेल्या. आकडेवारी सांगते की या साथीच्या रोगात महिलांनी सर्वाधिक रोजगार गमावला. यापैकी बहुतेक आपापल्या कुटुंबातील उत्पन्नाचे एकमेव साधन होते. महिलांच्या पात्रतेविषयी, व्यवसायांमध्ये आणि सचोटीने काम करतात आहे,. भारताच्या अंतराळ विजयाचा अग्रदूत इस्रो महिलांच्या क्षमतेवर वर्चस्व गाजवतो. सध्या इस्रोने अंतराळात एकाच वेळी एकोणीस उपग्रह प्रक्षेपित आणि स्थापित केले. या कामगिरीमागे महिला वैज्ञानिकांच्या सतत कामात मोठा हात होता.
दिल्ली सीमेवरील सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात महिलांनी आपली लक्षणीय सहभाग नोंदवला आहे . जरी सर्वोच्च न्यायालयाने जानेवारीत म्हटलं होतं की, 'वृद्ध आणि स्त्रियांना आंदोलनाच्या जागेवरुन बाहेर जाण्यास सांगितले पण महीलांनी न्यायालयाचे म्हणणे मान्य केले नाही आणि पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या स्त्रियांनी एकजुटीने मंचावरून माघार घेण्यास नकार दिला. ऑक्सफॅमच्या मते, भारतातील 85 टक्के ग्रामीण स्त्रिया शेतीत गुंतल्या आहेत, तर त्यापैकी फक्त तेरा टक्के जमीन त्यांच्या मालकीची आहे. हा खूप वास्तविक विरोधाभास आहे. दील्ली सीमेवर शेतकरी आंदोलन शंभर दिवसांपासून सुरू आहे. वृद्ध महिला पुरुष शेतकऱ्यासोबत सह खांद्याला खांदा लावून समोर उभे आहेत . एके दिवशी, पुरुष नेत्यांना मागे टाकून, महिलांनी पुढे होऊन सीमेच्या तीन ठिकाणी आंदोलन केले.
शेतकरी महिलांनी ज्या प्रकारे आंदोलन केले, निदर्शने केली आणि मोर्चात भाग घेतला, त्यावरून देशातील शहरे आणि खेड्यांमध्ये उदयोन्मुख नवीन स्त्रीची प्रतिमा स्पष्टपणे दिसून येते. महीलाच्या अदम्य शक्ती ओळखण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय महिलांच्या दिवसांमध्ये या महिलेचे कौतुक करण्याऐवजी आणि यांचा सहभाग आणि सामर्थ्य ओळखून व्यापक दृष्टिकोन अवलबंविला पाहीजे.
Share your comments