आपल्या शेतजमिनीची उत्पादकता का घटत चालली

08 May 2021 02:57 PM By: KJ Maharashtra
शेतीचं उत्पन्न का येतयं कमी?

शेतीचं उत्पन्न का येतयं कमी?

आज आपण कोणतेही पिक लावले आणि ते सहजासहजी जोमदार वाढले असे सहसा होताना दिसत नाही. पिकामध्ये थोड़ीशी सुद्धा रोगप्रतिकारक शक्ति असत नाहीं म्हणजे पिकाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत काहीना काही रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. बुरशीनाशकांची प्रक्रिया केल्याशिवाय बियाणे उगवत नाहीं व रोपे जमिनीत तग धरत नाहित. आयसीयुमध्ये ऍडमिट केलेल्या पेशंटप्रमाणे आमची पिके जन्माच्या आधिपासुन औषधांचा वेळोवेळी डोस देऊन जगवावी लागतात.पेपर मल्चिंग केल्याशिवाय टोमॅटोसारखेआणि मिरचीसारखे पिक येतच नाही.

भाजीपाला,कडधान्य, डाळिंब,द्राक्ष,ऊस,कापूस,केळी, सारख्या पिकांमध्ये उत्पादनात सातत्य टिकवणे व नवनविन रोगांचा सामना करण्यात शेतकऱ्यांची दमछाक दिवसेंदिवस होतच चालली आहे. कारण आपल्या पुढील प्रमाणे काही गोष्टी चुकत आहेत.आपण एकमुखाने उत्तर द्याल,जमिनीचा कस कमी झाला आहे.अगदी बरोबर उत्तर आहे.पण आपण कधी विचार केलाय का? की जर शेतकरी प्रत्येक पिकाला सर्व खते, मायक्रोन्युट्रिएन्ट, औषधो व पोषके आवश्यक प्रमाणात टाकतोय तरीही जमिनीचा कस कमीच का होत आहे ? हा कस म्हणजे काय? कस म्हणजे काळी कसदार या शब्दातील कस होय.जमिनिला हा काळा रंग त्यात असलेल्या सेंद्रिय कर्बामुळे येतो व सेंद्रिय कर्ब म्हणजेच ह्युमस किंवा ओरगॅनिक कार्बन होय.संशोधनात असे आढळुन आलेले आहे की सजिवांचे (मानव, वनस्पति, प्राणी सर्वच ) संतुलित पोषण होण्यासाठी एकुण ७५ मुलद्रव्यांची गरज असते. ७५ पैकी १६ (१८) मुलद्रव्यांची सामान्यपणे गरज असते.मायक्रोन्युट्रिएन्ट ( कॅापर ,झिंक, बोरान,फेरस, मँगेनिज, मॅालीब्डेनम व क्लोरिन / निकेल / कोबाल्ट )
दुय्यम मूलद्रव्ये-( कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर )
मुख्य मुलद्रव्ये-(नायट्रोजन, फॅास्फोरस, पोटॅश ).
नैसर्गिक घटक -( कार्बन , ओक्सिजन व हायड्रोजन )

 

ज्याप्रमाणे साधे निर्जीव सिमेंट काँक्रीट करायचे म्हटले तरी वाळु,खडी प्रमाण घ्यावे लागते त्याप्रमाणे जिवंत वनस्पतिची सुदृढ़ वाढ करण्यासाठी या १६ मुलद्रव्यांचे पोषण ठराविक प्रमाणच लागत असते.म्हणजे आजचा शेतकरी आपला ८५ % खर्च या ६ % पोषणासाठी करतो आहे. आपल्या पुर्वजांनी शेकडो वर्ष शेती करुनहि जमिनिचा कस टिकवुन ठेवला. कारण त्यांचे १००% पोषण हे सेंद्रिय घटकांवर अवलंबुन होते*त्याद्वारे भरपूर ह्युमस उपलब्ध व्हायचा व नैसर्गिक घटकांचेच ( कार्बन ) मोठ्या प्रमाणात पुनर्भरण केले जायचे.आजचा शेतकरी हेच ९४ % चे पोषण निसर्गावर सोडुन देउन नशिबाला दोष देतो आहे.
हा जमिनितील सेंद्रिय कार्बन सुपिक मातितील जिवाणुंच्या उर्जेचा प्रमुख स्त्रोत आहे.

हेच जिवाणू पिकाच्या अपटेक सिस्टमचे प्रमुख शिलेदार आहेत.आपल्या पुर्वजांना हे रहस्य माहित होते. ते जमिनिचा कस ( सेंद्रिय कर्ब ) टिकवुन ठेवत आले व हजारों वर्ष समृद्ध व शाश्वत शेती करत आले.त्यांच्याकडे जमिनिचा कस टिकविण्याचा मार्ग होता तो म्हणजे देशी जनावरांचे वर्षभर साठवलेले कंपोष्ट खत पुर्ण कुजलेले व कसदार चारा खाउन तयार झालेले.आजच्या संकरीत जनावरांच्या शेणात ह्युमस खुप कमी आहे कारण ते जास्तीत जास्त कस शोषुन घेण्यासाठी तयार केलेले आहे त्यामुळे त्यांच्या शेणात चोथाच जास्त असतो.


जो जमिनित गेल्यावर कुजण्याऐवजी सडतोच जास्त, त्यामुळे उपयुक्त बॅक्टेरिया उत्पन्न होण्याऐवजी हानिकारक बुरशांची मोठ्या प्रमाणात वाढ होते .त्यामुळे आता आपल्याला देशी गाई सोबत घेऊन शेती करावी लागणार तेव्हाच शेती ही आपल्याला साथ देणार. आणि जमिनीची उत्पादकता वाढणार.

गोपाल उगले
कृषी महाविद्यालय अकोला
95035

farmland पीक शेतजमिनीची agriculture land शेतजमिनीची उत्पादकता productivity
English Summary: Why the productivity of our farmland is declining

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.