1. कृषीपीडिया

सोयाबीनची पाने का पडतात पिवळी, जाणून कारणे आणि त्यावरील उपाय

KJ Maharashtra
KJ Maharashtra
सोयाबीन

सोयाबीन

सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सोयाबीन हे राज्यातील कोरडवाहू क्षेत्रातील महत्वाचे नगदी पीक असून विदर्भ व मराठवाड्यातील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था प्रामुख्याने या पिकावर अवलंबून आहे.

मागील वर्षी सोयाबीन पिकावर अपारंपरिक विषाणूजन्य पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव पिकवाढीच्या कालावधीमध्ये आढ्ळून आला आहे. येत्या खरीप हंगामात या रोगांपासून पिकाचे होणारे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने त्यांच्या प्रादुर्भावाची कारणे, प्रसार, लक्षणे व व्यवस्थापनाबाबत शास्त्रीय माहिती घेणे आवश्यक आहे. यंदाही ब-याचशा शेतकरी बंधुंच्या शेतातील हळद, अद्रक व विशेषतः सोयाबीन पिकाचे पान पांढरे व नंतर पिवळे पडत शेवटी करपणे असा प्रकार होत आहे. हे कशामुळे होते याची काही निरीक्षणे.

1) ज्या जमिनी गावालग गढीची माती किंवा पांढरी माती अशा जमिनीत. लोह म्हणजे फेरसच्या कमतरतेमुळे सोयाबीन व इतर पिके सुरुवातीपासून पांढरट पिवळी पडतात.

2) चुनखडीचे प्रमाण असलेल्या जमिनीत काही ठिकाणी इतर जमिनित सुद्धा जास्त जोराचा पाऊस किंवा पाणी साचून मुळांना हवा न लागल्यामुळे अन्न द्रव्याची कमतरता विशेषतः लोह(फेरस),जस्त (झिंक ), नत्र व पालाशची कमतरता जानवते.

3) या वर्षी ब-याचशा शेतकरी बंधुनी हळद व अद्रक ट्रक्टर चलित पेरणी यंत्राने लागवड केली. या पेरणीमुळे हळद व अद्रक खुप खोल पडते जवळ पास 1 फुटापर्यंत. यावर जोराचा पाऊस पडल्यानतर जमीनपाक होते व खूप खोल पडल्यामुळे कोंबवर यायाला खूप ताकद आणि वेळ लागतो व तसेच मुळांना हवा न लागल्यामुळे परतवरील अन्न द्रव्याची कमतरता.

4) बरेच शेतकरी बंधु मागील हंगामात शिल्लक आसलेले सोयाबीन, हरबरा गव्हाचे कुटार शेतात पसरुन देतात अशा ठिकाणी किंवा काडी कचरा जास्त असलेल्या ठिकाणी किंवा अर्धवट कुजलेले शेणखत वापरलेल्या ठिकाणी झाडे सुरूवातीला पिवळी पडतात व नंतर बुडाजव स्केलोरोशिअम म्हणजे पांढऱ्या बुरशीची वाढ होते व उभळ लागते. हे एक कारण आहे.

5)काडी कचरा जास्त असलेल्या ठिकाणी म्हैस किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसतात. अशा ठिकाणी पिकाचा जमिनीखालील भाग ह्या किडीची अळी व म्हैस किडा कुरतडुन खातो व झाडाला इजा होते पीक मरत नाही पण पिवळे पडते व वाढ खुंटते.

6) ज्या जमिनीत मागील हंगामात उन्हाळ्यात शेवटपर्यंत ओलित केले गेले अशा ठिकाणी सुद्धा पिकामध्ये वरील अन्न द्रव्याची कमतरता येऊन पीक पांढरट पिवळे झाल्याचे दिसून येते.

7) ज्या जमिनी लालसर भुरकट हलक्या आहेत, अशा जमिनित पालाशाची व नत्राची कमतरता येते. पालाशाची कमतरता ओळखतांना झाडाची पाने पानाच्या कडेकडून सुरुवातीस पिवळसर व नंतर लालस करड्या किंवा तपकीरी होऊन वाळायला लागतात. अशाप्रकारे वेगवेगळी कारणे आहेत.

यासाठी खालील उपाय करावा

1) जेथे पांढऱ्या जमिनी आहेत किंबहुना सर्वच जमिनीत पेरते वेळेस एकरी 10 किलो झिंक सल्फेट + 5 किलो फेरस सल्फेट + 10 किलो गंधक व खत वापरताना पोट्याश असलेले खत जसे 10-26-26 , 12-32-16, 14-35-14 आशी खत वापरावी व बियाण्याला रायझोबीअम पीएसबी व केएम बी ची या द्रवरुप संवर्धकाची 10 मिली व ट्रायकोडर्मा 4 ग्रॕम प्रती किलो प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

2) पिक पिवळे दिसून आल्यास सुक्ष्म अन्नद्रव्याचे मिश्रण( जसे चिलमिक्स किंवा लिब्रेल ) 20 ग्रॅम
किंवा फेरस edta 15 ग्रॕम + झिंक edta 15 ग्रॕम व 19-19-19 70 ग्रॕम किंवा युरीया 2% प्रती पावरस्प्रे घ्यावे.

3) लालसर जमिनित पोट्याशची कमतरता दिसुन येते अशा जमिनित पोट्याशयुक्त खत पेरतेवेळेसच द्यावे व फवारणीत 13-0-45 किंवा 00-00-50 70 ग्रॕम घ्यावे व सोबात वरिल प्रमाणे सुक्ष्म अन्नद्रव्ये घ्यावे.

4) शक्यतो कुटार व शेणखत चांगले कुजल्याशिवाय वापरुच नाही. किंवा आशा ठिकाणी कार्बन नत्र( C:N) गुणोत्तर कायम ठेवण्यासाठी सुरुवातीलाच 20 दिवसाच्या आत थोडा युरीया फेकावा. कारण काडी कचरा, कुटार कुजतांना शेतावरील नत्र वापरल्या जाते व नत्राची कमतरता येते. तेथे गर्मी तयार होऊन झाडाला बुरशी लागते.

प्रतिनिधी गोपाल उगले
संदर्भ - इंटरनेट

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters