महाराष्ट्रातील कपाशी क्षेत्रात मोडणार्या जवळपास सर्वच जिल्ह्यातून प्रातिनिधिक स्वरूपात बर्याच शेतकरी मित्रांचे फोन आले. यावरूनच या किडीला आता आपण दुर्लक्षित करणार नाही हे पक्के झाले. करिता कपाशी लागवड केली असल्याने आता 'गुलाबी बोंड अळी' येवुच नये करिता कोणत्या चुका सद्या टाळाव्यात हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणून हा लेख लिहितो आहे.गुलाबी बोंड अळी'साठी कपाशी हेच एकमेव खाद्यपीक असल्याने या किडिंचा प्रादुर्भाव रोखने सहज शक्य आहे. या किडी साठी दुसरी यजमान वनस्पतीच नाही हे विशेष आहे. म्हणुनच या किडिचा जास्त धसका न घेता खालील सहज उपाययोजना स्वतः पुरत्या जरी केल्या तरी आपण बर्याच अंशी यश संपादन करू शकतो.हंगामपूर्व (एप्रिल-मे) तसेच हंगामा नंतर (डिसेंबर-जानेवारी) सुद्धा कापूस लागवड केल्याने किडींचा जीवनक्रम चालू राहतो.
करिता डिसेंबर नतर 'उपड पराटी, लाव गहू' चे प्रयोजन येणार्या हंगामात निश्चितच करावे.• ओलित कापूस लागवड क्षेत्रात 'गुलाबी बोंड अळी' चा प्रादुर्भाव कोरडवाहू क्षेत्रापेक्षा हमखास जास्त जाणवतो करिता ओलित करावयाची गरजच असेल तर संरक्षित ओलीत करणे महत्त्वाचे आहे.• ऑगस्ट महिन्यापासून पिकात कामगंध सापळे लावल्याने त्याद्वारे या आळीचे पतंग आकर्षित होऊन मरतात व त्याने अळीच्या उत्पत्तीस आळा बसतो.कीटनाशके, बुरशीनाशके, संजीवके, अन्नद्रव्ये (माइक्रो न्युट्रियंट व सोल्युबल फर्टिलायझर) यांचे मिश्रण किंवा खिचडी (मजुरी खर्चात बचत व्हावी म्हणून). या किडिंचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी कारणीभूत आहे. करिता अशी खिचडी टाळावी अन्यथा हिच खिचडी 'गुलाबी बोंड अळी' च्या वाढी करिता पाहुंणचार ठरतो.मोनोक्रोटोफॉस + अॅसिफेट या किटक नाशक मिश्रणाचा वापर फवारणीसाठी केल्या मुळे झाडावर नवीन पालवी फुटते अथवा पाते,
शेंडे व लव लुसलूशीत होते. त्यामुळे 'गुलाबी बोंड अळी' चे पतंग सहज अंडी देवू शकतील असें पोषक वातावरण तयार होते. या मिश्रणाचा वारंवार (2-3 वेळेस) वापर झाल्यास फुलोराअवस्था ते फळधारणा हा काळ लांबतो. यामुळे 'गुलाबी बोंड अळी' च्या वाढी करिता पोषक वेळ मिळतो.पिकाच्या सुरूवातीच्या ३महिन्यात शक्यतोवर रासायनिक औषधीचा वापर टाळल्यास योग्यच राहिल. त्या माध्यमातून नैसर्गिक मित्र किडिंचे प्रमाण योग्य राहील व किडिंचा प्रादुर्भाव कमी करता येईल. त्याकाळाता वनस्पतीजन्य कीटकनाशके, जैव कीटकनाशके व परोपजीवी मित्र किड्यांचा वापर केल्यास 'गुलाबी बोंड अळी' विरुद्ध उत्तम रिझल्ट .• कमीत कमी सुरूवातीच्या ३ महिन्यात तरी मोनोक्रोटोफॉस, अॅसिफेट, इमिडाक्लोप्रीड, थायोमेथोक्साम, अॅसिटामाप्रीड इत्यादी किटकनाशकांचा वापर शक्यतोवर टाळावा. ह्या कीटकनाशकामुळे वाढिची अवस्था लांबते. या कारणामुळे 'गुलाबी बोंड अळी'च्या जिवनचक्रांच्या संखे मध्ये वाढ होते.
• 'गुलाबी बोंड अळी'चा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जास्तीच्या नत्र खताचा वापर टाळावा. युरियाचा वापर सुरूवाती च्या ४५ दिवसांतच करने योग्य राहील.भविष्यात कोणत्या चुका टाळाव्यात :- • देशी जातींच्या तुलनेने अमेरिकन जातींवर जास्त प्रादुर्भाव येतो करिता भेंडी सारखी पाने असणारी इतर संकरित जातीचा वापर केल्यास निश्चितच फायद्याचे ठरते. दिर्घकाळ वाढ्णा-या (लॉंग ड्युरेशन- १८० दिवसाच्या) संकरित वाणाची लागवड टाळावी. त्याद्वारे 'गुलाबी बोंड अळी' च्या वाढीसाठी सतत पोषक वातावरण निर्माण होते.कपाशीच्या वेगवेगळ्या संकरित वाणांचा एकाच क्षेत्रात उपयोग केल्यास फुले येण्याचा व बोंडे लागण्याचा काळ वेगवेगळा होत असल्याने किडींच्या वाढीसाठी सतत खाद्य पुरवठा होऊन जीवनक्रमांच्या (Life cycle) संख्येत वाढ होते.
संकलन - पंकज काळे (M.Sc. Agri), निसर्ग फाऊंडेशन, अमरावती
संपर्क क्र.- ९४०३४२६०९६, ७३५०५८०३११
जर कुणाला हा विषय समजला नसेल किंवा समजायला अवघड वाटत असल्यास नक्कीच वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.
Share your comments