रब्बी हंगामामध्ये गव्हाची लागवड सगळ्यात जास्त केली जाते. म्हणून खरीप पिकांच्या काढणीनंतर भारतामध्ये बरेच शेतकरी कामासाठी शेती तयार करणे सुरु करतात. गव्हाचे पीक हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक आहे. भारताने गहू उत्पादनात मागील चार दशकांमध्ये फार मोठे यश संपादित केले आहे.
जर आपण 1964- 65 या वर्षाचा विचार केला तर गव्हाचे उत्पादन 12.6 मिलियन टन होते. ते 2019 -20 या वर्षात 107.18 मिलियन टनांपर्यंत पोचले. या यशापर्यंत पोचण्यासाठी गव्हाच्या शेतीतील तंत्रज्ञान आणि प्रगत प्रजाती यांचे फार मोठे योगदान आहे. या लेखात आपण गव्हाच्या अशाच एका उन्नत जाती विषयी पाहणार आहोत.
करण श्रिया ( डी.बी.डब्ल्यू.-252)
शेतकरी कमी सिंचनाची व्यवस्था असेल तर वेळेत लागवडीसाठी करण श्रेया ही प्रजाती वापरू शकतात. म्हणजे जर गव्हाच्या या जातीची लागवड 25 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत करू शकतात.या जातीची लागवड पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिसा, पश्चिम बंगाल आणि पूर्वोत्तर राज्यातील शेतकरी करू शकतात.
करन श्रिया या जातीची वैशिष्ट्ये
या प्रजातीच्या अनेक वैशिष्ट्ये आहेत. या जातीची लागवड केल्यापासून गव्हाची उंबी यायचा कालावधी ते 83 दिवसांचा असतो. तसेच पीक पक्व होण्याचा कालावधी 125 ते 130 दिवसांचा आहे.
या प्रजातीच्या गव्हाच्या रोपांची उंची 97 ते 99 सेंटिमीटर असते.तसेचयाजातीच्यागव्हाच्या 100 दाण्यांचेवजन 44 ते 46ग्रॅमपर्यंतअसते.गव्हाच्याजातीचीखासवैशिष्ट्यआहेकीयामध्येलोहाचे प्रमाण 43.1 पीपीएम आहे. तसेच ही जात ब्लास्ट रोगाला प्रतिरोधक आहे.
या जातीपासून मिळणारे उत्पादन
तर शेतकऱ्यांनी या जातीच्या गव्हाच्या लागवड केली.दोस्तीत व्यवस्थापन केले तर प्रति हेक्टर 55 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी जर करण श्रिया त्याची लागवड केली सर्व उत्पादन चांगले येऊन नफा चांगला मिळू शकतो.
Share your comments