1. कृषीपीडिया

गहु उत्पादक शेतकरी 'ह्या' बम्पर उत्पादन देणाऱ्या जातीची करत आहेत पेरणी! जाणुन घ्या ह्या वाणीविषयी

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
wheat crop

wheat crop

नमस्कार शेतकरी बांधवांनो खरीपच्या पिकांची काढणी काही ठिकाणी आपटली तर काही ठिकाणी सुरु आहे आणि रब्बीच्या तयारीला शेतकरी बांधव कंबर बांधून लटकत आहे. रब्बी हंगामातील सर्वात महत्वाचं पिक म्हणजे गहु गव्हाची लागवड ही रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात केली जाते. भारतात गव्हाची मागणी ही वर्षभर बनलेली असते. भारतात गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते तसेच गव्हाचे consumption म्हणजेच उपभोग/वापर देखील भारतात मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे गहु उत्पादक शेतकऱ्यांना गव्हाच्या लागवडीतून चांगली कमाई होते. ग

गव्हाच्या यशस्वी उत्पादणासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गव्हाच्या योग्य वाणीची निवड. सद्ध्या देशात गहु पेरणी सुरु आहे आणि शेतकरी बांधव DBW-303, DBW-187 आणि DBW-222 वाणांची सर्वाधिक पेरणी करताना दिसत आहेत आणि ह्या बियाणाची मागणी देखील लक्षणीय वाढली आहे. आज आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी ह्या वाणांची माहिती घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणुन घेऊया गव्हाच्या DBW-303 ह्या पॉप्युलर जातींविषयी.

 DBW-303 ह्या जातींची मागणी अधिक

DBW-303 ह्या जातीला शेतकरी बांधव करण वैष्णवी ह्या नावाने देखील ओळखतात. भारतातील गहु उत्पादक शेतकरी ह्यावर्षी गव्हाची DBW-303 ह्या जातींची मागणी जास्त करत आहेत आणि त्यामुळे ह्या जातीच्या गव्हाची पेरणी अधिक होत आहे. शेतकऱ्यांच्या पसंतीस ही वाण खरी उतरताना दिसत आहे.

भारतीय गहू आणि बार्ली संशोधन संस्थेचे संचालक डॉ.ज्ञानेंद्र प्रताप सिंह म्हणाले की, देशभरातून सुमारे 17,000 शेतकऱ्यांनी गव्हाच्या बियाण्यांसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी सुमारे 80 टक्के शेतकऱ्यांना बियाणे पुरवले गेले आहे. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक मागणी ही DBW-303 ह्या गव्हाच्या वाणासाठी आहे. गव्हाच्या ह्या बियाण्याची एक विशेष गोष्ट अशी आहे की, शेतकरी पुढील हंगामासाठी गव्हाच्या ह्या जातीपासून बियाणे देखील बनवू शकतात. त्यामुळे त्यांना पुढील हंगामात चांगले बियाणे घरच्याघरीच उपलब्ध होऊ शकते.

 करण वैष्णवी उत्पादनात अव्वल!

ह्या गव्हाच्या जातीला सर्वात सुधारित जातींपैकी एक सांगितले जात आहे शिवाय वैज्ञानिक ह्याच्या पेरणीसाठी प्रोत्साहित करत आहेत.

ह्या जातीला ह्याच वर्षी विकसित केले गेले आहे आणि ह्यची मागणी ही अल्प कालावधीत लक्षणीय वाढली आहे. ह्या गव्हाच्या जातीपासून हेक्टरी 82 क्विंटल पर्यंत उत्पादन हे मिळू शकते त्यामुळे ह्या जातीच्या बियाण्याची मागणी ही अधिक आहे. ह्याची लागवड ऑक्टोबरच्या शेवटच्या हफ्त्यात करण्याचा सल्ला कृषी वैज्ञानिक देत आहेत. ह्या जातीच्या गव्हाचे पिक हे 145 दिवसात उत्पादन देण्यासाठी तयार होते.

 माहिती स्रोत टीव्ही9भारतवर्ष

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters