Wheat Farming : मित्रांनो आगामी काही दिवसात भारतात रब्बी हंगामाला (Rabi Season) सुरुवात होणार आहे. सध्या संपूर्ण भारतवर्षात खरीप हंगाम प्रगतीपथावर असून आता येत्या काही दिवसात खरीप हंगामातील पिकांची काढणी देखील सुरू होणार आहे.
खरीप हंगामातील पिकांना सध्या कोसळत असलेल्या पावसामुळे मोठा फटका बसत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना खरीप हंगामात तोटा सहन करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी रब्बी हंगामाकडे बारीक लक्ष ठेवून आहेत.
रब्बी हंगामात आपल्या राज्यात गव्हाची (Wheat Crop) मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. खरं पाहता आपला भारत देश हा प्रमुख गहू उत्पादक देश म्हणून ओळखला जातो. देशातील पंजाब आणि हरियाणा ही दोन राज्य गहू उत्पादनासाठी संपूर्ण जगात ओळखली जातात.
आपल्या महाराष्ट्रातील गहू लागवड (Wheat Cultivation) देखील विशेष उल्लेखनीय असून राज्यातील बहुतेक शेतकरी रब्बी हंगामात गव्हाच्या पिकाला पसंती दर्शवितात. अशा परिस्थितीत आज आपण गव्हाच्या तीन सुधारित जातींची (Wheat Variety) माहिती जाणून घेणार आहोत.
जाणकार लोकांच्या मते गहू लागवडीतून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी शेतकरी बांधवांनी कृषी तज्ञांच्या सल्ल्याने गव्हाच्या वाणाची निवड करायला पाहिजे. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया गव्हाच्या तीन सुधारित जाती.
पुसा यशस्वी
मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, गव्हाची ही एक सुधारित जात असून या जातीची लागवड काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये केली जाते. एकंदरीत ही थंड हवामानातील गव्हाची जात आहे.
या जातीचे सरासरी उत्पादन 57.5 ते 79. 60 क्विंटल प्रति हेक्टर आहे. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे ते बुरशी आणि कुज रोगास प्रतिरोधक आहे. या जातीच्या गव्हाच्या पेरणीसाठी योग्य वेळ 5 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर ही सर्वोत्तम आहे.
करण श्रिया
गव्हाची ही देखील एक सुधारित जात असल्याचा दावा केला जातो. गव्हाच्या या जातीची लागवड उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये केली जाते. या जातीचे पीक पक्व होण्यासाठी 127 दिवस लागतात. या जातीचे सरासरी उत्पादन हेक्टरी 55 क्विंटल आहे.
DDW 47 :-
गव्हाच्या या जातीची लागवड मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये केली जाते. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. लापशी आणि रवा सारख्या डिश या गव्हाच्या विविधतेने खूप चवदार बनवल्या जातात. या जातीचे सरासरी उत्पादन हेक्टरी 74 क्विंटल आहे. या जातीचे वैशिष्टय़ म्हणजे त्याची झाडे अनेक प्रकारच्या रोगांशी लढण्यास सक्षम आहेत.
Share your comments