Wheat Farming : सोयाबीन काढणीची वेळ जवळ आली आहे. या खरीप हंगामानंतर (Kharif Season) शेतकरी रब्बी पिकांची (Rabi Crops) पेरणी सुरू करतात. मित्रांनो रब्बी हंगामात शेतकरी बांधव (Farmer) वेगवेगळ्या प्रकारची शेती (Farming) करत असतात.
गहू (Wheat Crop) हे देखील रब्बी हंगामातील (Rabi Season) प्रमुख पीक आहे. या पिकाची लागवड संपूर्ण भारत वर्षात केली जाते. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की गहू उत्पादनात भारत सर्वाधिक गहू उत्पादन घेणाऱ्या देशांच्या यादीत येतो.
मित्रांनो आगामी काही दिवसात शेतकरी बांधव लागवडीला सुरुवात करणार आहेत. खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या काही दिवसात शेतकरी गव्हाच्या पेरणीसाठी काम सुरु करणार आहेत. मित्रांनो गव्हाची लागवड आपल्या राज्यात देखील विशेष उल्लेखनीय आहे.
राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधव रब्बी हंगामात गव्हाची शेती करत असतात. जाणकार लोकांच्या मते जर शेतकरी बांधवांनी गव्हाच्या सुधारित जातीची लागवड केली तर त्यांना गव्हाच्या शेतीतून चांगली कमाई होण्याची शक्यता निर्माण होते. अशा परिस्थितीत आज आपण गव्हाच्या सुधारित जातींची (Wheat Variety) माहिती जाणून घेणार आहोत.
GW 322 :- ही मध्य प्रदेश राज्यातील सर्वात मोठ्या प्रमाणावर पेरली जाणारी गव्हाची जात आहे, जी 115 ते 120 दिवसांत परिपक्व होते. GW 322 जातीच्या गव्हाची उत्पादन क्षमता 60-62 क्विंटल आहे. गव्हाच्या या जातीची भारतातील सर्व राज्यांमध्ये लागवड करता येते. ही जात 3 ते 4 पाण्यामध्ये परिपक्व होते.
HD 4728 (पुसा मलावी) :- हा गहू १२५-१३० दिवसांत पिकण्यास तयार होतो. एचडी ४७२८ (पुसा मलावी) गव्हाचे उत्पादन 55 क्विंटलपर्यंत आहे. HD 4728 (पुसा मलावी) गव्हाची लागवड भारतातील सर्व राज्यांमध्ये करता येते. गव्हाची ही जात 3 ते 4 पाण्यामध्ये परिपक्व होते.
पुसा तेजस 8759 :- मध्य प्रदेशात 2019 मध्ये गव्हाची पुसा तेजस 8759 ही जात विकसित करण्यात आली आहे. एमपीच्या जबलपूर कृषी विद्यापीठात एक हेक्टरमधून 70 क्विंटल पुसा तेजस गव्हाचे उत्पादन झाले. त्यानंतर या जातीबाबत शेतकऱ्यांची आवड वाढली. गव्हाची ही जात सुमारे 110 ते 115 दिवसांत पक्व होण्यास तयार होते. हे बी कमी पाण्यात उत्पादन देण्यास तयार होते.
Share your comments