वर्षातील प्रत्येक दिवस हा सारखाच असतो असे नाही. प्रत्येक दिवसाची काहींना काही खासीयत असतेच. मात्र खगोलशास्त्राच्या दृष्टीने वर्षातील चार दिवस हे महत्त्वाचे मानले जातात. असेच काहीसे वेगळेपण आजच्या दिवसाचे आहे. त्यामुळेच आज गुगलने याबाबत डुडलही बनवलं आहे. आजचा २१ डिसेंबर दिवस वर्षातील सर्वात छोटा दिवस असून त्याला 'विंटर सोलस्टाइस' म्हणूनही ओळखले जाते. तर हा दिवस हिवाळ्यात येत असल्याने 'हिवाळा अयन दिवस' असेसुद्धा म्हणतात.
आजच्या दिवशी पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशाने कललेला असल्याने सूर्य जास्त दक्षिणेकडे दिसतो. याचाच परिणाम म्हणून सूर्याच्या उत्तरायण व दक्षिणायणचा अनुभवसुद्धा येतो.
तसाच अनुभव ऋतुसुद्धा अक्षाच्या कलतीच्या स्थितीमुळे येतो. त्यामुळे दिवस फक्त १० तास ४७ मिनिटांचा राहणार असून रात्र मोठी असणार आहे. त्यामुळे दिवस व रात्रीचा कालावधी कमी अधिक होत असतो.
'सोलस्टाइस' का
तसेच 'सोलस्टाइस' हा शब्द सोल्सटाइन या लॅटीन शब्दापासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ ‘सूर्य स्थिर आहे’ असा होतो. पृथ्वीच्या आपल्या अंतरावरील आवर्तना दरम्यान वर्षातील एक दिवस असा येतो जेव्हा दक्षिण गोलार्धात सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर सर्वात जास्त असते. तर आपल्या देशाचे हवामान आणि ऋतूंचा आभ्यास केला असता
हिवाळ्यात रात्र मोठी तर दिवस लहान असतो. अशीच काहीशी स्थिती २१ डिसेंबर या दिवशी असते. त्यामुळेच २१ डिसेंबर हा दिवस सर्वात लहान असतो आणि रात्र सर्वात मोठी असते. म्हणूनच या दिवसाला विंटर सोलस्टाईस असे म्हटले जाते.
खगोलशास्त्राच्या दृष्टीने वर्षातील चार दिवस
२१ मार्च आणि २३ सप्टेंबर या दोन्ही दिवशी दिवस आणि रात्रीची वेळ समसमान
२१ जून हा वर्षातील असतो सर्वात मोठा दिवस. या दिवशी वर्षातील सर्वाधिकवेळ सूर्य दर्शन होते.
२१ डिसेंबर दिवस वर्षातील सर्वात छोटा दिवस.
Share your comments