सध्या कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. बऱ्याचशा कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. बर्याच जणांच्या पायावर बेरोजगारीची कुऱ्हाड पडली आहे. अशा चिंताग्रस्त आणि दडपण युक्त वातावरणामध्ये छोट्या छोट्या गोष्टी करून किंवा त्याबद्दलचे ज्ञान मिळवून चांगल्या प्रकारचे अर्थार्जन करता येऊ शकते.
आता हायड्रोपोनिक्स ही संकल्पना सगळ्यांना माहिती आहे. नेमके हायड्रोपोनिक्स संकल्पना व तंत्रज्ञान काय असते किंवा त्याचा उपयोग करून आपण आपल्या अर्थार्जन कशा पद्धतीने करू शकतो. हे अजूनही बऱ्याच जणांना माहिती नाहीये. तरी या लेखामध्ये आपण हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भाजीपाल्याचे उत्पादन कसे घेऊ शकतो तेही कुठल्याही मातीविना. वाचून आश्चर्य वाटलं ना. वाटणारच पण हे खरं आहे या लेखामध्ये या बद्दल आपण जाणून घेणार आहोत.
काय आहे हायड्रोपोनिक्स तंत्र
हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती व्यवसाय करण्यासाठी आपल्याकडे अंगण किंवा घराचे छत म्हणजेच गच्ची असणे गरजेचे असते. गच्चीवर केलेल्या शेतीला टेरेस फार्मिंग असेही म्हणतात. सध्या टेरेस फार्मिंग खूप फ्रेंड मध्ये असून यात आपण रोख पैसे कमवू शकता. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करता येणारी शेती ही माती विना केली जाते. मातीचा उपयोग न करता झाडांना आवश्यक असलेली पोषकतत्वे पाण्याच्या साहाय्याने दिले जातात. यालाच हायड्रोपोनिक असे म्हणतात. तंत्रज्ञानामध्ये पिकांच्या वाढीसाठी मुख्यतः पाण्याची आवश्यकता असते. परंतु पिकांना आधार यासाठी माती संख्या भोवती घटकांची आवश्यकता असते.
वनस्पतींची ही गरज पर लाईट कोकोपीट किंवा वाळू सारख्या उदासीन माध्यमांद्वारे पूर्ण केली जाते. व यांच्या साहाय्याने पिकांची वाढ पूर्ण केली जाते. हायड्रोपोनिक्स मध्ये वनस्पती आंनद्राव्यांनी परिपूर्ण असलेल्या द्रावणामध्ये नैसर्गिक रित्या वाढतात. हरितगृह सारख्या संरक्षित शेतीमध्ये भरपूर प्रकाश, नियंत्रित तापमान सहा याचा वापर केला जातो. भारतामध्ये हायड्रोपोनिक्स तंत्राचा प्रथम वापर 1946 मध्ये इंग्रज शास्त्रज्ञ डब्ल्यू. जे. शाल्तो डग्लस यांनी केला होता. हे तंत्र आता आधुनिक शेती पद्धतीचा एक भाग बनून राहिले आहे.
या तंत्राने कोणती पिके घेता येतात
या तंत्राने जागेचा कार्यक्षम वापर करणाऱ्या पिकांची लागवड केली जाते त्यामध्ये टोमॅटो, ढोबळी मिरची, लेट्युस, पालक, काकडी, ब्रोकोली, वाटाणा, लांब दांड्याची फुले औषधी वनस्पती, तिखट मिरची इत्यादी रोपे चांगल्या प्रकारे वाढवता येतात.
हायड्रोपोनिक्स तंत्र च्या पद्धती
-
ऍब अँड फ्लो – गेल्या काही वर्षांमध्ये ही पद्धती लोकप्रिय होत असून, त्यामध्ये पोषक अन्नद्रव्ये युक्त रावणाच्या टाकीवर ट्रे किंवा वाढ कक्षाची रचना केलेली असते. त्यामध्ये पोषक अन्नद्रव्ययुक्त द्रावण उदासीन माध्यमाद्वारे सोडले जाते. त्यातून पिके त्यांच्या आवश्यकतेनुसार उचल करतात. ठराविक काळानंतर त्यांचा निचरा केला जातो.
-
खोल पाण्यामध्ये मुळाची वाढ करणे – पोषक अन्नद्रव्य आणि ऑक्सिजनचे परिपूर्ण असलेल्या पाण्यामध्ये पिकांची मुळे बुडवलेली असतात. ही मुळे सतत पाण्यामध्ये राहून अन्नद्रव्यांचे शोषण करतात.
-
पोषण घटकांचा पातळ थर – ही मातीविरहित पद्धत व्यावसायिक शेतीसाठी लोकप्रिय आहे. सातत्याने प्रवाहित होणाऱ्या पोषक द्रावणामध्ये मुळांची टोके बुडतील कशाप्रकारे रोपे लावली जातात.
-
आद्रता युक्त वातावरणामध्ये मुळांची वाढ ( एरोपोनिक तंत्र )- या तंत्रामध्ये माती किंवा अन्य कोणत्याही माध्यमा शिवाय रोपांच्या मुळांची वाढ ही आद्रता युक्त हवेमध्ये केली जाते. एखाद्या बॉक्स किंवा कक्षामध्ये पिकांच्या तरंगत्या मुळांवर दर काही ठराविक वेळानंतर पोषक अन्नद्रव्ययुक्त पाण्याची फवारणी करण्याची योजना केलेली असते.
-
ठिबक पद्धत – उदासीन माध्यमांमध्ये रोपांची वाढ करताना ठिबकद्वारे पाण्यासोबत पोषक घटकांचा पुरवठा केला जातो. याला ट्रिकल किंवा सूक्ष्म सिंचन पद्धती असे म्हणतात. यामध्ये पंपाने योग्य दाबावर ए मीटरद्वारे पिकांच्या प्रत्येक रोपांच्या मुळांच्या परिसरामध्ये पोषक अन्नद्रव्ये पुरवली जातात.
हायड्रोपोनिक्स तंत्र चे फायदे
-
मातीची आवश्यकता नाही – या तंत्रामध्ये जमिनीचे प्रमाण मर्यादित असलेल्या किंवा प्रदूषित माती किंवा मातीची उपलब्धता च नाही अशा स्थितीमध्ये हायड्रोपोनिक तंत्रज्ञान उपयुक्त ठरते.
-
जागेचा कार्यक्षम वापर करता येतो.
-
हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानासाठी वातावरणातील तापमान, आद्रता आणि प्रकाशाची तीव्रता यांचे पिकांच्या वेगवान वाढीसाठी आवश्यक प्रमाण ठेवले जाते. परिणामी वर्षभर उत्पादन घेणे शक्य होते.
-
जमिनीवर वाढवलेल्या पिकांच्या तुलनेमध्ये हायड्रोपोनिक्स पद्धतीमध्ये पिकांची वाढ केवळ दहा टक्के पाण्यामध्ये करणे शक्य होते. या पद्धतीमध्ये पोषक पाण्याचा पुनर्वापर होतो. वाळवंटी तसेच दुष्काळी पट्ट्यामध्य ही पद्धत उपयुक्त ठरते
-
पाण्यामध्ये पोषक खनिजे कृत्रिमरित्या पिकांसाठी मिसळली जातात. मातीच्या तुलनेत या पाण्याचा पीएच अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित ठेवता येतो. त्याचा परिणाम असा होतो की पिकाद्वारे पोषक अन्नद्रव्यांचे अधिक शोषण होऊन अधिक वाढ होते. मातीतील पिकांच्या तुलनेमध्ये 50 टक्क्यांपर्यंत अधिक वेगाने वाढ होत असल्याचे तज्ञांचे मत आहे.
-
हायड्रोपोनिक्स मध्ये तने, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होत नाही किंवा मर्यादित राहतो
-
मशागत, आंतर मशागत, सिंचन, खुरपणी अशी कामे करावी लागत नाही. परिणामी वेळेची आणि मजुरांची बचत होते.
-
कमीत कमी जागेत होते जागेमध्ये नियंत्रित पद्धती व भरपूर पोषक घटकांच्या उपलब्धतेमुळे भाज्यांचे भरघोस उत्पादन घेता येते.
Share your comments