नगदी पिकामध्ये उसाला महत्वाचे स्थान दिले जाते जे की काळाच्या बदलानुसार सिंचन क्षेत्र वाढ असल्याने उसाचे क्षेत्र सुद्धा मोठ्या प्रमाणत वाढले गेले आहे. महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादनाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे मानले जाते. महाराष्ट्र राज्यात तिन्ही हंगामात उसाचे पीक घेतले जाते.वर्षभर उभा असलेल्या उसाच्या पिकात तनाचा प्रादुर्भाव दिसून येतो. ऊस लागवड केल्यापासून १३ - १४ दिवसात ऊस येण्यास सुरू होते तर ४-५ दिवसात तण येण्यास सुरू होते जे की यामुळे उसाच्या उत्पादनात ४० ते ५० टक्के घट होते. तनाचा बंदोबस्त केल्यास उत्पादनही वाढते शिवाय जमिनीचा दर्जा सुद्धा चांगला राहतो.
ऊसात आढळणारे तण:-
लव्हाळा, हरळी, कुंदा, रेशीमकाटा, गाजरगवत या प्रकारची तने तिन्ही हंगामात दिसतात तर आता चांदवेल आणि खांडकुळी हे तण सर्व ऊस क्षेत्रात दिसून येत आहे.चांदवेल आणि खांडकुळी हे वेलवर्गीय तण असल्यामुळे ते उसाची पाने गुंडळण्यास तसेच त्याच्या उत्पादनावर परिणाम करते. तन नियंत्रण करण्यासाठी पूर्ण कुजलेले शेणखत तसेच कंपोस्ट खत तयार करावे आणि शेतामध्ये पसरावे.
तणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना:-
ऊस लागवड करतेवेळी जेव्हा शेत तयार करायचे आहे त्यावेळी तुम्ही पहिल्यांदा उभी आणि आडवी अशा प्रकारे नांगरणी करावी जे की नांगरणी करतेवेळी लव्हाळ्याच्या गाठी, हळदीच्या काश्या, कुंदाची खोडे व मुळे वेचावी आणि जाळून टाकावी. तने काढताना ती मुळासकट उपटून काढा नाहीतर त्याचा काहीच फायदा होणार नाही. खुरपणी करताना सुद्धा मुळासकट टन काढावे.
आंतरपिकाचे महत्व:-
आंतरपीक घेतल्याने तणांचे नियंत्रण होते तसेच जर तुम्ही द्विदल वर्गातील आंतरपिके घेतली तर जमिनीत नत्राचे प्रमाण स्थिर राहते. बैल किंवा ट्रॅक्टर च्या साहाय्याने आंतरमशागत करून घ्यावी.
रासायनिक पद्धतीने तणनियंत्रण:-
रासायनिक तणनाशकाचा वापर करून तुम्ही तनांचा बंदोबस्त करू शकता त्यासाठी पहिली फवारणी ऊस लागवड केल्यानंतर जमिनीच्या वापश्यावर ३ ते ५ दिवसांनी आणि दुसरी फवारणी पहिली फवारणी झाल्यानंतर बरोबर ३० दिवसांनी करावी.
तणनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी:-
उसाची लागण केल्यानंतर ३ - ५ दिवसांनी ॲट्राटूप हे तणनाशक जमीन वापस्यावर असताना हेक्टरी ५ किलो असे ५०० लिटर पाण्यात टाकून फवारावे. त्यानंतर बांधणीच्यानुसार एक खुरपणी किंवा एक ये दोन कुळपण्या कराव्यात.जर पावसाचे वातावरण असेल तर तणनाशक फवारू नये. तसेच तणनाशक तनांवर फवारावे जे की उसावर फवारू नये ही काळजी घ्यावी. वारे शांत असताना तसेच स्वच्छ सूर्यप्रकाशात फवारणी करावी.
Share your comments