1. कृषीपीडिया

अवर्षण परिस्थितीमध्ये कडधान्य पिकांचे पाणी व्यवस्थापन

खरीप हंगामामध्ये पाऊस पुरेसा न झाल्यावर खरीप कडधान्य पिके मूग, उडीद, चवळी, कुळीथ, मटकी, राजमा इत्यादी पिकाची पेर होऊ शकत नाही. याठिकाणी थोड्या फार ओलीवर पेर होते अशा क्षेत्रावर सुद्धा अतिशय कमी उगवण झालेले पीक पुहा पावसाअभावी सुकू लागते. अशा पिकास त्वरीत कोळपणी करणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोळप्याच्या सहाय्याने पीक 20-25 दिवसाचे असताना पहिली आणि 30-35 दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी केल्याो जमीन भुसभूशीत होऊन जमिनीत हवा खेळती राहते. व त्यायोगे पीक वाढीस पोषक वातावरण तयार होते. तसेच जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओल अधिक काळ टिकण्यास मदत होते. दोन ओळीतील तण काढले जाऊन रोपांना मातीची भर लागते.

KJ Staff
KJ Staff


खरीप हंगामामध्ये पाऊस पुरेसा न झाल्यावर खरीप कडधान्य पिके मूग, उडीद, चवळी, कुळीथ, मटकी, राजमा इत्यादी पिकाची पेर होऊ शकत नाही. याठिकाणी थोड्या फार ओलीवर पेर होते अशा क्षेत्रावर सुद्धा अतिशय कमी उगवण झालेले पीक पुहा पावसाअभावी सुकू लागते. अशा पिकास त्वरीत कोळपणी करणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोळप्याच्या सहाय्याने पीक 20-25 दिवसाचे असताना पहिली आणि 30-35 दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी केल्याो जमीन भुसभूशीत होऊन जमिनीत हवा खेळती राहते. व त्यायोगे पीक वाढीस पोषक वातावरण तयार होते. तसेच जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओल अधिक काळ टिकण्यास मदत होते. दोन ओळीतील तण काढले जाऊन रोपांना मातीची भर लागते.

सद्य परिस्थितीमध्ये आहे ती ओल टिकविण्याकरीता पीक 10 ते 15 दिवसांचे जरी असले तरी कोळपणी करावी. गराजेनुसार पिकास वेळीच खुरपणी द्यावीजुलै अखेर पर्यंत जरी पुरेसा पाऊस झाला अशा वेळेस तुर, चवळी इत्यादी कडधाय पिकाची पेरणी केली तरी चालू शकते. जुलै अखेर तुर पिकाची पेरणी केली तरी उत्पादनामध्ये फारसी घट येत नाही. त्यादृष्टीने तुर हे पिक अशा परिस्थितीमध्ये लागवडीसाठी चांगला पर्याय आहे. मात्र तुरीची पेरणी पुरेसा पाऊस झाल्याांतरच करावीशेतामध्ये अर्धवट ओल असल्यास पेर टाळावी. मूग आणि डीद पिकाची पेरणी मात्र जुुलै महियाच्या दुसर्या पंधरवाड्यात करु नये. तुर लागवडीकरीता आय.सी.पी.एल. 87, विपुला, बी.एस.एम.आर. 736, बी.एस.एम.आर. 853, बी.डी.एन. 708, बी.डी.एन. 711, बी.डी.एन. 716, राजेश्वरी इत्यादी वाणांपैकी निावड करुन पेर करावी. याहीपेक्षा पाऊस पडण्यास अधिक उशिर झाल्यास ऑगस्टमध्ये खरीप कडधान्यांची पेरणी टाळावी आणि शेत रब्बी पिक पेरणीकरीता तयार करावे. अधिक उशिरा पेरलेल्या खरीप कडधायाची वाढ अपेक्षेप्रमाणे होत नाही. त्यादृष्टीने तुर मात्र चांगला पर्याय असून प्राप्त परिस्थितीमध्ये उत्पादनात फारसी घट न येता पीक समाधानकारक येते.

रब्बी हंगामामध्ये मुख्यतः ज्वारी आणि हरभरा ही जिरायतात पिके घेतली जातात. हरभरा पिकाचे राज्यात 19 ते 20 लाख हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये 75% क्षेत्र पूर्णतः जिरायती आहे. याकरिता सप्टेंबर अखेर हस्त नक्षत्रा मध्ये पडलेल्या पावसावर शेतकरी बांधव हरभरा पिकाची पेरणी करतात. हरभरा पेर झालेली आहे अशा उगवून आलेल्या पिकामध्ये कोळपणी करणे अतिशय फायद्याचे ठरते. कोळपणी मुळे जमिनीस पडलेल्या भेगा बुजल्या जाऊन बाष्पीभवनाचा वेग मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि ओल टिकून राहण्यास मदत होते.

  • अवर्षण परिस्थितीमध्ये भारी काळ्या जमिनीमध्ये निश्चितपणे हरभरा पीक इतर पिकापेक्षा फायदेशीर ठरते. यासाठी विजय, फुले विक्रम आणि दिग्विजय या शिफारस केलेल्या वाणांची निवड करावी, कारण या वाणांची पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता अधिक आहे. पिकाची विरळणी करून मर्यादित रोपांची संख्या ठेवल्यास या पिकापासून अल्प का होईना उत्पादन मिळू शकते.
  • ज्या शेतकरी बांधवांना हरभरा पिकास एक सरंक्षीत पाणी देणे शक्य आहे त्यांनी पिकाची पेरणी झाल्यापासून साधारणनपणे 40 ते 45 दिवसांनी पाणी दिल्यास पिकाचे उत्पादन वाढण्यास मोठी मदत होते.
  • ज्या ठिकाणी संरक्षित पाणी देण्याची सोय नसेल त्यांनी 2% युरिया अथवा पोटॅशिअम नायट्रेटची फवारणी करणे फायदेशीर ठरते.
पिक  पाणी व्यवस्थापन 

तूर:
खरीप कडधान्य पिके बहुतांशी पावसाच्या पाण्यावर येते. परंतु पावसाळयात पाऊस कमी झाला असल्यास आणि जमिन मध्यम उथळ असल्यास ओलावा फार काळ टिकून राहत नाही. जमिनीतील ओलावा खुपच कमी झाला आणि फुले लागल्यावर उशीरा पाणी दिल्यास पिकाची मोठया प्रमाणावर फुलगळ होते. हे टाळण्यासाठी मातीतील ओलावा फार कमी होण्यापुर्वीच आणि फुले येण्याच्या सुरुवातीलाच संरक्षीत पाणी द्यावे. अवर्षण प्रवण भागात लवकर येणाऱ्या तुरीच्या पिकास पावसाची शक्यता असेल आणि पाणी देण्याची सोय उपलब्ध असेल तर पहिले पाणी फुलकळी लागताना, दुसरे पाणी पीक फुलोऱ्यात असताना आणि तिसरे शेंगात दाणे भरताना द्यावे. मात्र पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

मूग आणि उडीद:
मूग आणि उडीद ही पिके सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर येणारी पिके आहेत. या पिकांना फुले येताना आणि शेंगा भरताना ओलाव्याची कमतरता भासू लागते. अशा वेळी पाऊस असेल आणि जमिनीत ओलावा खूपच कमी झाला असल्यास, जमिनीच्या प्रकारााुसार पाणी द्यावे. म्हणोच पीक फुलोऱ्याच्या दरम्यान तसेच शेंगात दाणे भरताना पाणी उपलब्ध असल्यास जरुर दयावे. ज्या शेतकरी बांधवाकडे तुषार संच उपलब्ध असल्यास मुग, उडीद पीकांसाठी पाणी देण्याकरीता जरुर उपयोग करावा. त्याचा पीकास उत्पादन वाढीसाठी निश्चितच फायदा होतो. यासाठी शेताची राणबांधणी व्यवस्थीत करावी. सारे पाडून जमिनीच्या उतारानुसार योग्य अंतरावर आडवे पाट टाकावेत म्हणजे पाणी देणे अधिक सोयीचे होते.

हरभरा:
जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे. बागायत हरभरा शेताची राणबाधंणी करताना दोन सर्‍यातील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत करावा. तसेच लांबी सुध्दा जमिानीच्या उतारनुसार कमी ठेवावी म्हणजे पिकाला प्रमाणशीर पाणी देण्यास सोयीचे होते. मध्यम जमिनीत 20 ते 25 दिवसांनी पहिले, 45 ते 50 दिवसांनी दुसरे आणि 65 ते 70 दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. भारी जमिनीकरिता पाण्याच्या दोनच पाळया पुरेशा होतात त्याकरिता 30 - 35 दिवसांनी पहिले व 60-65 दिवसांनी दुसरे पाणी दयावे. हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे 25 सेंमी पाणी लागते. प्रत्येक वेळी पाणी प्रमाणशीर (7 ते 8 से.मी) देणे महत्वाचे असते. जास्त पाणी दिले तर पीक उभळण्याचा धोका असतो. स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळयांमध्ये अंतर ठेवावे. जमिनीस फार मोठया भेगा पडू देऊ नयेत. हरभरा पिकास एक पाणी दिल्यास 30 टक्के, दोन पाणी दिल्यास 60 टक्के आणि तीन पाणी दिल्यास उत्पादनात दुप्पट वाढ होते.


तुषार सिंचन: हरभरा पिकास वरदान

हरभरा पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास आणि सुधारित वाणांची लागवड केल्यास उत्पादाात मोठी वाढ होते. हे पीक पाण्यास अतिशय संवदेनशील असल्याने गराजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पीक उभळते आणि त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते. यासाठी या पिकास तुषार सिंचन अतिशय उत्कृष्ट पध्दत आहे. तुषार सिंचन पध्दतीमुळे पिकास पाहिजे तेवढे आणि आवश्यक त्या वेळेला पाणी देता येते. पिकात तणांचा प्रादुर्भाव नेहमीपेक्षा तुषार सिंचन पध्दतीत कमी होतो आणि असलेले तण काढणे अतिशय सुलभ होते. नेहमीच्या पध्दतीत पिकास अनेकदा प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यामुळे मुळकुजसारखे रोग पिकावर येतात आणि पीक उत्पादन घटते. परंतु तुषार सिंचनाने पाणी प्रमाणात देता येत असल्यामुळे मुुळकुज रोगामुळे होणारे नुकसान टाळता येते


परावर्तकांचा वापर:

केओलिन या बाष्परोधकांचा 6 ते 8% (600 ते 800 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) 15 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी त्यामुळे झाडाचे तापमान कमी होऊन जमिनीत ओल टिकून राहण्यास मदत होईल.

डॉ. नंदकुमार कुटे आणि प्रा. लक्ष्मण म्हसे 
(कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी) 

English Summary: Water management of pulses crops in drought conditions Published on: 07 February 2019, 03:44 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters