बाळापूर (अकोला):- बाळापूर मधील गाव सागद, नागद,मोखा, उरळ खु. तसेच नया अंदुरा येथे कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर, कॉटन कनेक्ट तसेच सुधारित कापूस यंत्रणा (BCI) प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापन शेतकऱ्यांनी कसे करावे याचे प्रशिक्षण दिले.
क्षेत्र प्रवर्तक -सतीश गायकवाड, गौतम तायडे, आशिष सोळे, अमोल लाखे आणि राहुल ठोंबरे यांनी पाणी व्यवस्थापन शेतकऱ्यांनी कसे करावे हे खेळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समजावून सांगितले हा खेळ शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे खेळी-मेळीने खेळून यामधून प्रबोधन सुद्धा केले.
हिरव्या भाज्यांचे दर कडाडले, जाऊन घ्या आजचे बाजार भाव..
तसेच सुधारित कापूस यंत्रणा (BCI) प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर यानचे हक्क,अधिकार तसेच बालमजूर होऊ नाये यासाठी सुद्धा गावोगावी कृषी रथाद्वारे सुद्धा जनजागृती करण्यात आली.
SCO Summit 2022: पंतप्रधान मोदींनी अन्न सुरक्षेचा मुद्दा केला उपस्थित; मोदी म्हणाले...
यावेळी शेतकऱ्यांना प्रकल्पाद्वारे पिक संरक्षण, पाणी व्यवस्थापन, जमिनीचे आरोग्य, जैव विविधता, धाग्याची गुणवत्ता, सामाजिक कार्य, याविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली व या माहितीचा योग्य प्रकारे शेतकरी अवलंब करत आहेत.
कर्मचारी-पेन्शनधारकांची DA वाढण्याची प्रतीक्षा या दिवशी संपणार..!
Share your comments