शेतकऱ्यांनो ! शेतीसाठी उपयुक्त आहे गांडूळ खत

30 August 2020 06:10 PM


सध्या शेतकरी अधिक उत्पादन घेण्यासाठी दिवसेंदिवस रासायनिक खतांचा अतिवापर करत आहे.  त्यामुळे जमिनीचा व एकंदरीत वातावरणाचा समतोल बिघडत चालला आहे.   या सगळ्या प्रकारच्या रासायनिक खते व कीटकनाशकांचा अंश अन्नधान्य व भाजीपाला मध्येही दिसून येतो.  त्यामुळे मनुष्याच्या शरीरात अपाय होऊ शकतो.  म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खताचा वापर उत्पादन वाढीसाठी करणे आवश्यक आहे,  त्यामुळे जमिनीचा पोतही टिकतो व त्यात सुधारणा होऊन पोषणमूल्य भारित अन्नपदार्थ आपल्याला मिळतात.   सेंद्रिय खतांमधील गांडूळ खते पिकांना फायदेशीर व उत्पादन वृद्धी करणारे आहे, त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

    गांडूळ खतात असणारे महत्त्वाचे घटक

गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण हे ४०  ते  ५०  टक्के असते. यस मध्ये ४०  ते ५७ टक्के कार्बन, ४ ते ८ टक्के हायड्रोजन, ३३  ते ५४  टक्के ऑक्सिजन, ०.७  ते पाच टक्के सल्फर व दोन ते पाच टक्के नत्र असते. गांडूळ खतामध्ये मोनोसॅक्रेईडीस, पॉलिसॅकॅराइड्स यासारखी पिष्टमय पदार्थ असतात. अमिनो आम्ले व प्रथिने, स्निग्ध पदार्थ, न्यूक्लिक ॲसिड व ह्युमसचे प्रमाण सर्वाधिक असते व ते पिकांना उपयोगी ठरते.

गांडूळ खतामध्ये  ०.८ टक्के नत्र, ५७ टक्के स्फुरद. १ टक्के पालाश तसेच मॅग्नीज, झिंक, कोपर, बोरॉन यासारखी सूक्ष्म द्रव्य मोठ्या प्रमाणात असतात. गांडूळाच्या विष्टेत नत्राचे प्रमाण व जमिनीच्या पाच पटीने जास्त असते. स्फुरदचे प्रमाण व जमिनीच्या सात पट असते तसेच पालाशचे प्रमाण अकरा पटीने जास्त असते.  वरील घटक सगळ्या प्रकारच्या पिकांना आवश्यक आहे व गांडूळ खताच्या वापरामुळे ते पिकांना सहजासहजी उपलब्ध होतात.

   गांडूळ खत वापराचे फायदे

  •  गांडूळ खत वापरल्यामुळे जमिनीचा पोत चांगला प्रमाणे सुधारतो.
  • मुळ्या अथवा झाडांना कुठल्याही प्रकारची इजा न होता जमिनीची नैसर्गिक मशागत केली जाते.  त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून मुळांची वाढ चांगली होते.
  • जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
  • गांडूळ खत वापरल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन फार कमी प्रमाणात होते.
  • जमिनीचा सामू योग्य पातळीत राखला जातो.
  • गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवितात.
  •  गांडूळ खत वापरामुळे उपयुक्त जिवाणूंच्या संख्येमध्ये वाढ होऊन खते व पाण्याच्या खर्चात बचत होते.
  • झाडाची निरोगी वाढ होऊन किडींना व रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता वाढते.

गांडूळांची विष्ठा उत्तम प्रकारचे खत आहे. गांडूळामुळे वाढीसाठी लागणारे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम व बाकीचे आवश्यक असलेले सूक्ष्म द्रव्य ताबडतोब उपलब्ध होतात. म्हणून अशा सर्वसमावेशक गुण असलेल्या गांडूळ खताचा वापर करणे कधीही फायद्याचे ठरेल. शेती उत्पादनासाठी लागणाऱ्या उत्पादन खर्चातही बचत होऊ शकतो.

vermicompost agriculture Vermicompost गांडूळ खत शेती
English Summary: Vermicompost is useful for agriculture (1)

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.