भारत कृषिप्रधान देश म्हणुन विश्वपटलवर आपले मोलाचे स्थान ठेवतो. भारतातील जवळपास निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेतीशी निगडित आहे. भारतातील ग्रामीण भागात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे आणि इतर व्यवसाय देखील शेतीशी निगडित आहेत. त्यामुळे भारताच्या अर्थाव्यवस्थेवर शेतीचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या परिणाम पडतो आपल्या देशाची अर्थव्यवस्थेला बळकट फक्त शेतीचे क्षेत्रच करू शकते असे भाकीत देखील अनेक अर्थाशास्रचे तज्ज्ञ वेळोवेळी वर्तवत असतात.
शेती म्हटले की हवामान, पाणी, जमीन ह्या गोष्टींचा विचार करणे खुप महत्वाचे ठरते. शेतीमध्ये भाजीपाला पिकांचे खुप मोठे योगदान आहे पण असे असले तरी शास्त्रीय पद्धतीने भाजीपाला पिकांची लागवड करणे खुप महत्वाचे ठरते ह्याच गोष्टींचा विचार करून आज आम्ही आपल्या वाचक शेतकरी मित्रांसाठी कोणत्या महिन्यात कोणत्या भाजीपाला पिकांची लागवड करावी ह्याची माहिती घेऊन आलो आहोत. चला तर मग मित्रांनो जाणुन घेऊया भाजीपाला पिकाविषयीं ही महत्वाची माहिती.
जानेवारी महिन्यात लागवड केले जाणारे भाजीपाला पिक
इंग्रजी महिन्यानुसार वर्षाचा पहिला महिना म्हणजे जानेवारी आणि वर्षाच्या ह्या सुरवातीच्या हंगामात शेतकरी बांधव कोणत्या भाजीपाला पिकांची लागवड करू शकता हे आपण जाणुन घेणार आहोत. वर्षाच्या पहिल्या महिन्यात शेतकरी राजांनी चवळी, शिमला मिरची, मुळा, पालक, वांगी, भोपळा या भाजीपाला पिकांची लागवड करावी अशी शिफारस कृषी वैज्ञानिक करतात. शेतकरी बांधवांनो भाजीपाला पिकांची लागवड करताना त्या भाजीपाला पिकाची सुधारित जातींची लागवड करावी जेणेकरून उत्पादन हे अधिक मिळेल आणि शेतकऱ्यांचा फायदा होईल.
फेब्रुवारी महिन्यात ह्या भाजीपाला पिकांची करा लागवड
फेब्रुवारी महिन्यात चवळी, शिमला मिरची, काकडी, चवळी, भोपळा, खरबूज, टरबूज, पालक, फुलकोबी, वांगी, भेंडी, गवार यांची लागवड करणे अधिक फायदेशीर असल्याचे सांगितले जाते.
मार्च महिन्यात करा ह्या भाजीपाला पिकांची लागवड
शेतकरी मित्रांनो मार्च महिन्यात गवार, काकडी, चवळी, करडई, भोपळा, खरबूज, टरबूज, पालक, भेंडी, यांची लागवड करून शेतकरी बांधव चांगले उत्पन्न कमवू शकतात ह्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो.
एप्रिल महिन्यात करा ह्या भाजीपाला पिकांची लागवड
शेतकरी बांधवांनो अनेक आदर्श शेतकरी व कृषी विषयांचे अभ्यासक एप्रिल महिन्यात राजगिरा आणि मुळा लागवड करण्याची शिफारस करतात. आणि ह्या पिकांची लागवड करून शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
मे महिन्यात करा ह्या भाजीपाला पिकांची लागवड
मे महिन्यात फुलकोबी, वांगी, कांदा, मुळा, मिरचीच्या लागवडीतून चांगले उत्पादन मिळू शकते.
जून महिन्यात करा ह्या भाजीपाला पिकांची लागवड
जून महिन्यात शेतकऱ्यांनी फुलकोबी, काकडी, चवळी, करडई, भोपळा,बीन, भेंडी, टोमॅटो, कांदा, काकडी, इत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी.
जुलै महिन्यात करा ह्या पिकांची लागवड
जुलै महिन्यात काकडी, चवळी, भोपळा, भेंडी, टोमॅटो, राजगिरा, मुळा यांची लागवड करणे अधिक फायदेशीर असते.
ऑगस्ट महिन्यात करा ह्या पिकांची लागवड
ऑगस्ट महिन्यात गाजर, फुलकोबी, बीन, टोमॅटो, काळी मोहरी, पालक, धणे, राजगिरा लागवड करणे चांगले असते.
सप्टेंबर महिन्यात करा ह्याची लागवड
सप्टेंबर महिन्यात गाजर, फुलकोबी, बटाटे, टोमॅटो, काळ्या मोहरी, मुळा, पालक, कोबी, धणे, बडीशेप, ब्रोकोली ह्या भाजीपाला पिकांची लागवड करणे चांगले असते आणि ह्यापासून उत्पादन चांगले घेऊ शकतात.
ऑक्टोबर महिन्यात करा ह्या पिकांची लागवड
ऑक्टोबर महिन्यात गाजर, फुलकोबी, बटाटा, टोमॅटो, काळी मोहरी, मुळा, पालक, कोबी, धणे, बडीशेप, वाटाणा, ब्रोकोली, कांदे, लसूण यांची लागवड करणे फायदेशीर असते.
नोव्हेंबर महिन्यात ह्या भाजीपाला पिकांची लागवड करा
नोव्हेंबर महिन्यात बीटरूट, फुलकोबी, टोमॅटो, काळ्या मोहरी, मुळा, पालक, कोबी, शिमला मिरची, लसूण, कांदा, वाटाणा, धणे पिकांची लागवड केल्यास चांगला फायदा होऊ शकतो.
डिसेंबर महिन्यात करा ह्या पिकांची लागवड
डिसेंबर महिन्यात टोमॅटो, काळ्या मोहरी, मुळा, पालक, कोबी, वांगी, कांदा या पिकांच्या लागवडीतून चांगला नफा मिळू शकतो.
Source-Tractorjunction
Share your comments