1. कृषीपीडिया

खरीप हंगामातील भाजीपाल्यांच्या जाती व जातीनिहाय माहिती

आपल्याला व्यापारी पिके आणि पांरपारिक पिके माहिती आहेत पण तुम्हाला रोजचे चलन देणारी पिके माहिती आहेत?. रोजचा पैसा देणारे पिके म्हणजे भाजीपाला. भाजीपाला शेती आपल्याला रोजचे चलन देत असते. दरम्यान खरीप हंगामात कोणती भाजीपाला पिके घेतली जातात आणि त्यांचे सुधारित वाण कोणते त्याविषयीची माहिती घेणार आहोत.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
भाजीपाला शेती

भाजीपाला शेती

आपल्याला व्यापारी पिके आणि पांरपारिक पिके माहिती आहेत पण तुम्हाला रोजचे चलन देणारी पिके माहिती आहेत?. रोजचा पैसा देणारे पिके म्हणजे भाजीपाला. भाजीपाला शेती आपल्याला रोजचे चलन देत असते. दरम्यान खरीप हंगामात कोणती भाजीपाला पिके घेतली जातात आणि त्यांचे सुधारित वाण कोणते त्याविषयीची माहिती घेणार आहोत.

टोमॅटोचे सुधारित वाणी

महाराष्‍ट्रात लागवडीच्‍या दृष्‍टीने उपयुक्‍त टोमॅटोचे वाण खालीलप्रमाणे आहे.

  • पुसा रूबी : तीनही हंगामात घेता येते. लागवडीनंतर 45 ते 90 दिवसांनी फळे काढणीस येतात. फळे मयम चपटया आकाराची गर्द लाल रंगाची असतात. हेक्‍टरी उत्‍पादन 325 क्विंटल

  • पुसा गौरव : ही जात झुडूप वजा वाढणारी आहे. फळे लांबट गोल पिकल्‍यावर पिवळसर लाल रंगाची होतात. वाहतूकीस योग्‍य आहे. हेक्‍टरी उत्‍पादन 400 क्विंटल

  • पुसा शितल : हिवाळी हंगामासाठी लागवडीस योग्‍य जात असून फळे चपटी गोल लाल रंगाची असतात. हेक्‍टरी उत्‍पादन 350 क्विंटल

  • अर्का गौरव : फळ गडद लाल मांसल व टिकावू असतात. हेक्‍टरी उत्‍पादन 350 क्विंटल पर्यंत

  • रोमा : झाडे लहान व झाुडपाळ असून फळे आकाराने लांबट व जाड साल असल्‍याने वाहतूकीस योग्‍य आहे. हेक्‍टरी उत्‍पादन 25 टन.

  • रूपाली, वैशाली, भाग्‍यश्री, अर्का विकास, पुसा अर्ली डवार्फ इ. जातीची लागवड केली जाते.

  • काशी अमन, काशी विशेष, काशी अमृत आणि संकरित वाण - अर्का रक्षक, अर्का सम्राट, काशी अभिमान, काशी अभय इ.

 

वांग्याच्या प्रमुख जाती

  • मांजरी गोटा :

  • या जातीचे झाड बुटके आणि पसरट असून पाने लहान ते मध्‍यम आकाराची असतात. खोड पाने आणि फळांच्‍या देठावर काटे असतात. फळे जांभळट गुलाबी असून फळांवर पांढरे पटटे असतात. फळांचा आकार मध्‍यमहिन्‍यात ते गोल असतो. या जातीची फळे चविला रूचकर असून काढणीनंतर 4 ते 5 दिवस टिकतात. हेक्‍टरी सरासरी उत्‍पादन 300 ते 400 क्विंटल.

  • वैशाली :

या जातीचे झाड बुटके आणि पसरट असून पाने खोड आणि फळांच्‍या देठावर काटे असतात. फळे आणि फूले झुबक्‍यांनी येतात. फळांचा रंग आकर्षक जांभळा असून त्‍यावर पांढरे सरमिसळ पटटे असतात. फळे मध्‍यम आकाराची अंडाकृती असतात. सरासरी हेक्‍टरी उत्‍पादन 300 क्विंटल.

  • प्रगती :

या जातीचे झाड उंच आणि काटक असून पाने गडद हिरव्‍या रंगाची असतात. पाने फळे आणि फांदयावर काटे असतात. या जातीचे फूले आणि फळे झुबक्‍यांनी येतात. फळे अंडाकृती आकाराची असून फळांच्‍या रंग आकर्षक जांभळा असून पांढ-या रंगाचे पटटे असतात. पिकांच्‍या कालावधी 175 दिवस असून 12 ते 15 तोडे मिळतात. हेक्‍टरी सरासरी उत्‍पादन 250 ते 300 क्विंटल.

अरूणा :

  • या जातीची झाडे मध्‍यम उंचीची असून फळे भरपूर आणि झुबक्‍यात लागतात. फळे मध्‍यम आकाराची आणि अंडाकृती असून त्‍यांचा रंग चमकदार जांभळा असतो. हेक्‍टरी सरासरी उत्‍पादन 300 ते 350 क्विंटल वांग्‍याच्‍या वरील जाती शिवाय कृष्‍णा एम एच बी 10 या अधिक उत्‍पादन देणा-या संकरीत जाती आहेत.

 

महाराष्ट्रातील मिर्चीच्या प्रमुख जाती

  • पुसा ज्‍वाला :

ही जात हिरव्‍या मिरचीसाठी चांगली असून या जातीची झाडे बुटकी व भरपूर फांद्या असलेली असतात. फळे साधारणपणे 10 ते 12 सेमी लांब असून फळांवर आडव्‍या सुरकुत्‍या असतात. फळ वजनदार व खुप तिखट असते. पिकलेली फळे लाल रंगाची असतात.

 

पंत सी - १ :

  • हिरव्‍या व लाल (वाळलेल्‍या ) मिरचीच्‍या उत्‍पादनाला ही जात चांगली आहे. या जातीची फळे उलटी असतात. मिरची पिकल्‍यावर फळांचा आकर्षक लाल रंग येतो. फळे 8 ते 10 सेमी लांब असून साल जाड असते. फळांतील बियांचे प्रमाण अधिक प्रमाणात असून बोकडया रोगास प्रतिकारक आहे.

  • संकेश्‍वरी 32 : या जातीची झाडे उंच असतात. मिरची 20 ते 25 सेमी लांब असून पातळ सालीची असतात. सालीवर सुरकुत्‍या असतात. वाळलेल्‍या मरचीचा रंग गर्द लाल असतो.

  • जी - 2, जी - 3, जी - 4, जी - 5 या जातीची झाडे बुटकी असतात. या मिरचीच्‍या अधिक उत्‍पादन देणा-या चांगल्‍या जाती आहेत. फळाची लांबी 5 ते 8 सेमी असून फळांना रंग गर्द तांबडा असतो.

  • मुसाळवाडी - या जातीची झाडे उंच वाढतात. खरीप हंगामासाठी ही जात चांगली असून बोकडया, भूरी आणि डायबॅक या रोगांना कमी प्रमाणात बळी पडतात.

  • पुसा सदाबहार - या जातीची झाडे उंच असून पाने इतर जातीपेक्षा रूंद असतात. पिकलेली मिरची तेजस्‍वी लाल रंगाची असते. या जाती हिरव्‍या मिरचीचे सरासरी उत्‍पादन साडेसात ते दहा टन व वाळलेल्‍या मिरचीचे दीड ते दोन टन उत्‍पादन मिळते. ही जात मावा कोळी या किडींना तसेच डायबॅक आाणि विषाणूंजन्‍य रोगांना प्रतिकारक आहे.

  • या शिवाय विद्यापीठांनी विकसीत केलेंडर अग्निरेखा, परभणी टॉल , फूले ज्‍योती, कोकणक्रांती, फूले मुक्‍ता फूले सुर्यमुखी, एनपी- 46 या सारख्‍या अधिक उत्‍पादन देणा-या जाती लागवडीयोग्‍य आहेत.

भेंडीच्या प्रमुख जाती

  • पुसा सावनी सीलेक्‍शन 2-2 फूले उत्‍कर्षा, परभणी क्रांती, अर्का अनामिका या सुधारीत जाती लागवडीस योग्‍य आहेत.
English Summary: varieties of kharif vegetables 30 Published on: 30 July 2021, 06:24 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters