महाराष्ट्र मध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते. प्रामुख्याने नाशिक जिल्हा हा कांद्याचे आगार म्हणून प्रसिद्ध आहे.कांद्याच्या साठवणुकीचा विचार केला तरखरीप कांदा च्या तुलनेत रब्बी कांदा साठवण यासाठी योग्य असतो.त्यामुळे
बरेच शेतकरी चाळीमध्ये कांदा साठवतात. परंतु बऱ्याच वेळेला साठवलेला हा कांदा मोठ्या प्रमाणात सडायला लागतो. त्याच्या मागे बरीचशी कारणे असतात. या लेखात आपण शाळेत साठवलेला कांदा सडू नये यासाठी काय उपाय योजना कराव्यात हे सविस्तर जाणून घेऊ.
कांदा साठवणुकीसाठी चे नियोजन
- कांदासुकवणे- कांद्याच्या काढणीनंतर कांदा शेतातच पातीसह सुकू द्यावा. कांद्याच्या ओळी अशा तऱ्हेने शेतात लावाव्यात की जेणेकरून पहिल्या ओळीतील कांदा दुसऱ्या ओळखतील पातीने झाकला जाईल. अशा प्रकारे कांदा शेतात चार दिवस सुख दिल्यानंतर चार सेंटीमीटर लांब मान ठेवून पात कापावे. कांद्याचे वर्गीकरण करून त्यामधील चिंगळी,डेंगळे तसेच जोड कांदे वेगळे काढावेत.राहिलेला चांगला कांदा सावलीत ढीग करून पंधरा दिवस सुकवावा. या काळात कांद्याच्या माना वाळून पिरघळतात वरचा पापुद्रा वाळून कांद्यांना घट्ट चिकटतो.अशाप्रकारे वाळलेला कांदा अधिक काळ चांगला टिकतो.
- चाळीतील वातावरण- कांद्याच्या चांगल्या साठवणीसाठी साठवण गृहात 65 ते 70 टक्के आद्रता तसेच तापमान 25 ते 30 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असावे. नैसर्गिक वायुविजन याचा वापर करून साठवण गृहाची रचना केली तर तापमान व आर्द्रता काही अंशी मर्यादित ठेवून साठवणुकीतील नुकसान कमी करता येते.
- साठवण गृहाची रचना-चाळीची रचना करताना नैसर्गिक वायू वजनाचा वापर करून उभारलेले साठवण गृह आणि विद्युत ऊर्जेचा वापर करून बनवलेले शीतगृह असे दोन प्रकार पडतात. नैसर्गिक वायुविजन वर आधारित चाळ एक पाखी आणि दोन पाखीया दोन प्रकारच्या असतात. एक पाखी चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर करावी. दोन पाकी चाळी ची उभारणी पूर्व-पश्चिम करावी. चाळीची लांबी 50 फुटांपेक्षा जास्त असू नये. तिच्या तळाशी हवा खेळती असावी तसेच बाजूच्या भिंती देखील लाकडाच्या किंवा बांबूच्या असावेत व त्यांना फटी असावेत.चाळीसाठी उंचावरची व पाणी न साठणारी जागा निवडावी. चाळी भोवतीची जागा स्वच्छ असावी. तळाशी मुरूम आणि वाळूचा थर द्यावा. त्यानंतर चाळीची उभारणी करावी. तळाशी एक फूटची मोकळी जागा ठेवावी. सिमेंट किंवा पन्हाळी पत्रांनी चाळीत उष्णता वाढते. सिमेंट पत्रे व त्यावर उसाच्या पाचटाचे आच्छादन केले तर तापमान कमी होण्यास मदत होते.चाळीचे छप्पर उतरते असावे. ते उभ्या भिंतीच्या तीन फूट पुढे असावे त्यामुळे पावसाचे ओसाडे कांदा न पर्यंत पोहोचत नाहीत व कांदा खराब होत नाही.
- साठवलेल्या कांद्याची उंची व रुंदी-चाळीतील कांद्याची उंची चार ते पाच फुटांपेक्षा जास्त असू नये. उंची वाढल्यामुळे तळातील कांद्यावर वजन वाढते वहवा खेळती राहत नाही.पाकीची रुंदी देखील चार ते साडेचार फुटांपेक्षा जास्त असू नये. रुंदी वाढली तर वायुविजन नीट होत नाही. थरातील मध्यावरील कांदे सडतात. कांदा साठवण या आधी एक दिवस अगोदर चाळीत बुरशीनाशकाची फवारणी करून निर्जंतुक करावी तसेच कांदे टाकताना जास्त उंचावरून टाकू नये.
- लागवडीअगोदर जातींची निवड देखील फायद्याचे ठरते- खरीपात तयार होणाऱ्या जातीचा कांदा एक महिन्यापेक्षा जास्त टिकत नाही परंतु रब्बी हंगामात तयार होणाऱ्या जातीचे खाल्ले योग्य पद्धतीने साठविल्यास जातीपरत्वे पाच महिन्यांपर्यंत टिकतात. ॲग्री फाउंड लाईट रेड किंवा अर्का निकेतन, एन 2-4-1 या जाती सहा महिने साठवणीत विशेष घट न होता चांगल्या टिकू शकतात.
- भीमा किरण, भीमा शक्ती या नवीन जाती देखील साठवणीसाठी चांगल्या दिसतात. त्यामुळे योग्य जातींची निवड देखील कांदा साठवणुकीसाठी महत्त्वाची ठरते. दुसरे म्हणजे कांदा पिकाला नत्रयुक्त खते लागवडीनंतर 60 दिवसांच्या आतच द्यावेत.जर नत्रयुक्त खतांची मात्रा उशिरा दिली तर कांद्याच्या माना जाड होतात व कांदा टिकत नाही. तसेच पालाश या मुख्य अन्नद्रव्याचा व्यवस्थित व संतुलित पाणीपुरवठा केल्यास फायदा होतो कारण पालाश मुळे कांद्याची साठवणक्षमता वाढते.तसेच लागवडीपूर्वी कंद का साठी गंधकयुक्त खते देणे महत्त्वाचे असते त्याच्यामुळे देखील साठवण चांगली होते.
( संदर्भ- मराठी पेपर)
Share your comments