तण हे पिकांच्या वाढीमधील सगळ्यात मोठी आणि प्रमुख समस्या आहे. तणे हे पिकांसोबत वाढीसाठी स्पर्धा करून पिकांची वाढ घटविण्याचे काम करतात.त्यामुळे तणनियंत्रण करणे फार महत्त्वाचे असते. आपण या लेखामध्ये तन उगवण्यापूर्वी चे किंवा रोखण्याचे काही उपाय पाहणार आहोत.
तन उगवण्यापूर्वी किंवा वाढ रोखण्याचे उपाय
- जास्त वेगाने वाढणारे पिकाची वाण निवडणे.
- खाते टाकताना ती टीका जवळ पडतील मधील रिकाम्या जागेत पडणार नाहीत याची काळजी घेणे.
- पाणी व्यवस्थापन पिकाची वाढ जोमदार होईल असे ठेवणे.
- पिकांची योग्य पद्धतीने फेरपालट करणे.
- पिकांची संख्या योग्य प्रमाणात ठेवणे.
- पिकाऊ व पडिक रानात तनाचे बी तयार होणार नाही याची काळजी घेणे.
- तणांच्या बियांची बाहेरून आवक होणार नाही याची काळजी घेणे. त्यासाठी तणमुक्त बियांचा वापर महत्त्वाचा असतो.
- आपल्या रानातील बी जपत असताना त्यात तणांचे बी राहू नये, यासाठी बीजोत्पादनाचा रानातील तणनियंत्रणासाठी अधिक काळजी घ्यावी लागते.
- बियांचा आकार, वजन, घनता यानुसार भेसळ वेगळी करणारी यंत्रे बाजारात उपलब्ध झाली आहेत. त्यांचा वापर करणे, मळणीच्या वेळी त्या स्थानि शिवाय यंत्रामध्ये अन्य बी येणार नाही याकडे लक्ष देणे.
- प्रामुख्याने तणाचे बी कालव्याचे काठ,चाऱ्या इत्यादी जवळ तयार होते. शेतकरी रान स्वच्छ ठेवत असला तरी अशा ठिकाणी स्वच्छ केली जात नाही. त्यामुळे पाण्यातून शेतामध्ये तणाचे बी मोठ्या प्रमाणात शिरकाव करू शकतात.
Share your comments