1. कृषीपीडिया

करडई लागवडीसाठी करा सुधारित जातींचा वापर

महाराष्ट्र राज्यामध्ये रब्बी हंगामातील करडई हे महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. या पिकाच्या मुळ्या जमिनीत 140 ते 150 सेंटिमीटर खोलवर जाऊन ओलावा शोषून घेतात. त्यामुळे पाण्याचा ताण काही प्रमाणात हे पीक सहन करू शकते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
करडई लागवडीसाठी करा सुधारित जातींचा वापर

करडई लागवडीसाठी करा सुधारित जातींचा वापर

करडईच्या पिकास मध्यम ते भारी खोल जमीन वापरावी. साठ सेंटिमीटरपेक्षा जास्त खोल जमिनीत करडईचे पीक चांगले येते. त्याचप्रमाणे जमीन पाण्याचा निचरा होणारी आणि ओलावा टिकवून ठेवणारी असावी. पाणी साचून राहिल्यास करडईच्या पिकास अपाय होतो. थोड्याफार चोपण जमिनीतही हे पीक येऊ शकते.

 

खोल नांगरट करून कुळवाच्या 3-4 पाळ्या द्याव्यात. खरीप हंगामात 6 बाय× 6 मीटर अथवा 10 बाय× 10 मीटर आकाराचे सपाट वाफे किंवा सरी वरंबे तयार करून मूलस्थानी जलसंधारण करावे. शेवटच्या पाळीअगोदर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्‍टरी 6.25 टन (12 ते 13 गाड्या) मिसळून घ्यावे.

करडईची पेरणी सप्टेंबरचा दुसरा पंधरवडा ते ऑक्‍टोबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत करण्याची शिफारस आहे.

पेरणीसाठी करडईचे 10 किलो बी प्रतिहेक्‍टरी वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास 2 ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी. त्यानंतर ऍझोटोबॅक्‍टर या जिवाणू संवर्धकाची 25 ग्रॅम/ किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी.

करडई पिकाचे दोन ओळींमधील अंतर 45 सें. मी. आणि दोन रोपांमधील अंतर 20 सें. मी. ठेवावे.

खतांच्या मात्रा

कोरडवाहू पिकास 50 किलो नत्र (110 किलो युरिया) आणि 25 किलो स्फुरद (156 किलो सिंगल सुपर फॉस्फेट) प्रति हेक्‍टरी देणे आवश्‍यक आहे. काही प्रमाणात पाण्याची सोय असलेल्या पिकास 75 किलो नत्र (163 किलो युरिया) व 37.50 किलो स्फुरद (235 किलो सिंगल सुपर फॉस्फेट) प्रति हेक्‍टरी द्यावे.

 

सुधारित वाणअ.क्र. +सरळ/संकरित वाण +तयार होण्याचा कालावधी (दिवस) +उत्पादन (क्विं./हे.) +विशेष गुणधर्म 

 

+भीमा +120-130 +12-14 +कोरडवाहू क्षेत्रास योग्य, अवर्षणास प्रतिकारक्षम, मावा व पानावरील ठिपके रोगास मध्यम प्रतिकारक, महाराष्ट्र राज्यासाठी शिफारस

+फुले कुसुमा +125-140 +जिरायती 12-15 बागायती 20-22 +कोरडवाहू, तसेच संरक्षित पाण्याच्या ठिकाणी योग्य. अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस

+एस.एस.एफ. 658 +115-120 +11-13 +बिगर काटेरी वाण, पाकळ्यांसाठी योग्य, अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस

+एस.एस.एफ. 708 +115-120 +जिरायती 13-16 बागायती 20-24 +कोरडवाहू आणि बागायतीसाठी उपयुक्त, माव्यास मध्यम प्रतिकारक, महाराष्ट्र राज्यासाठी लागवडीसाठी

+फुले करडई एस.एस.एफ.-733 +120-125 +13-16 +अधिक उत्पादनासाठी पांढऱ्या फुलांचा काटेरी वाण, माव्यास मध्यम प्रतिकारक, अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस

+परभणी कुसुम +135-137 +12-15 +मावा किडीस सहनशील, मराठवाड्यासाठी अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस

+पी.बी.एन.एस.-40 +118-128 +12-13 +बिगर काटेरी पाकळ्यांसाठी अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस

+ए.के.एस.-207 +125-135 +12-14 +विदर्भासाठी. माव्यास मध्यम प्रतिकारक

+नारी-6 +130-135 +10-12 +बिगर काटेरी, पाकळ्यांसाठी संरक्षित पाण्याखालील लागवडीस. अखिल भारतीय स्तरावर

लागवडीसाठी शिफारस

+फुले चंद्रभागा (एस.एस.एफ.-748) +125-140 +जिरायती 13-16 बागायती 20-25 +कोरडवाहू आणि बागायतीसाठी, उत्तम काटेरी वाण, माव्यास मध्यम प्रतिकारक, अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस

संकरित वाण

नारी एन.एच.-1 +130-135 +12-14 +संकरित बिगर काटेरी वाण, पाकळ्यांसाठी संरक्षित पाण्याखाली. अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस

+नारी एन.एच.-15 +130-135 +20-23 +माव्यास सहनशील, बागायतीसाठी. अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस

+डी.सी.एच.-185 +130-140 +जिरायती 14-16 बागायती 20-25 +मावा किडीस मध्यम प्रतिकारक, मर रोगास प्रतिकारक, अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस

 

 - विनोद धोंगडे नैनपुर

   VDN AGRO TECH

 

English Summary: Use improved varieties for safflower cultivation Published on: 09 October 2021, 06:56 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters