नमस्कार मंडळी पुन्हा आपल्या सेवेत थोडं पण महत्वाचं आपल्या शेतकऱ्यांचा शेती हा व्यवसाय आहे पण हा व्यवसाय आव्हानात्मक आहे.
महत्वाचं म्हणजे आपल्या शेतीला समाजात दुय्यम स्थान आहे
थोडं वेगळं सांगायच म्हणजे शेतकर्यांच्या मुलांचं लग्न ही लवकर होत नाही महत्वाचं म्हणजे शेतकरी च शेतकर्याच्या मुलाला मुलगी देतच नाही.त्या मधे दुसरं की शेती करणारा मुलांची लवकर लग्न होतच नाहीत.ही एक शोकांतिका आहे.साध्या भाषेत सांगायचे तर
शेती हा बेभरवशाचा व्यवसाय वाटतो.खुद्द शेतकरीसुद्धा नोकरीवाला किंवा वेगळा व्यवसाय करणारा जावई शोधत असतात.तुम्हा सांगतो की आपल्या शेतीकडे पाहण्याचा शहरी भागातील लोकांचा दृष्टीकोन ही वेगळाच आहे. गावाकडील तरुण पिढीची ही शेती मधे कष्ट करण्याची तयारीच नाही. स्वताच भवितव्य सुधारल पाहीजे याचा विचार करून शेती मधे काम करणारी मुलेही कमी पगाराची का होईना तरी मजुरी करण्यासाठी शहराचा रस्त्याची धाव घेतअसतात हे मि तुम्हाला घडलेल्या घटना सांगत आहे.
कोणी कोणी या गोष्टी अपवाद सुद्धा आहे.शेतीमधे काही नविन प्रयोगशील करण्यासाठी शिकलेले युवा मुलं शेतीत उतरवीण्याची तयारी दर्शवीत आहेत. या शेती मधे त्यांच्या अपेक्षा थोड्या वेगळ्या आहेत. काहीं नाइलाज म्हणून करतात तर काहींनी आव्हान म्हणून शेती व्यवसाय स्वीकारतात.अनेक शेतकरी यांनी आपल्या शेती मध्ये नव नवे प्रयोग केले ते यशस्वीच झाले.
त्याची भुमिका ही सकारात्मक असतात आपल्यासोबत इतरांच ही भल व्हावे असे वाटत असते .अशा युवा शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचताना समाधान वाटते. आपली शेती आणि शेतकरी बदलत आहे!कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे.वेगळं चित्र निर्माण होते. युवा शेतकऱ्यांच्या यशोगाथा जशा इतरांसाठी स्फूर्तीदायी आहेत.शेती मधे नव्याने धाडस पाहणाऱ्यांच्या मनात वेगळं चित्र निर्माण झाले पाहिजे आहेत.
यासाठी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आपन मोठ्या उमेदीची आस लाऊन बसतो कि पुन्हा शेतीकडे आलेल्या नवयुवक हतबल होण्याची वेळ येण्यास केवळ निसर्ग हा घटक जबाबदार नाही. शेतीला पोषक वातावरण आणि प्रतिष्ठा आपण अद्याप देऊ शकलो नाही यासाठी मुळाशी जाऊन नेमके काय करायला हवे याचा विचार केला, तर आतापर्यंत झालेले अनेक उपाय कसे वरवरचे आहेत, हे लक्षात येते.त्या
याचाच अर्थ शेतीसाठीआपण पोषक आणि आश्वासक वातावरण निर्माण करू शकलेलो नाही. येथे संर्घष केला तर नक्की फळ मिळेल, अशी शाश्वती तरुणांना वाटत असावी. त्यामुळे केवळ मदतीच्या घोषणा करण्यापेक्षा तरुणांची शेतीसाठीची उमेद कशी टिकविता येईल.याचा विचार केला पाहिजे.
धन्यवाद
मिलिंद जि गोदे
milindgode111@gmail.com
9423361185
Save the soil
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:दिलासादायक बातमी! खाद्यतेलाच्या किमती पुढील पंधरवड्यापासून कमी होण्यास होईल सुरुवात
Published on: 19 May 2022, 06:14 IST