सध्या काही भागात हळदीची पाने पिवळे पडण्याची समस्या दिसून येत आहे. याची लक्षणे तपासून योग्य उपाययोजना कराव्यात. वाढीच्या काळात अन्नद्रव्य व्यवस्थापन गरजेचे आहे.हळदीची पाने पिवळी पडण्याची कारणे हळदीच्या शेंड्याकडील पाने पिवळी पडून वाढ खुंटते. परिणामी पानांवर कायम स्वरूपी पिवळसरपणा दिसून येतो.
अशा जमिनीत हवा-पाणी खेळण्याचे प्रमाण व्यस्त राहते.In such soil, the air-water balance remains busy.जमिनीची घनता वाढते म्हणजेच जमीन घट्ट बनते.जमिनीमध्ये नत्र, मॅग्नेशिअम आणि लोहाच्या कमतरतेमुळे पाने पिवळी पडतात.
हे ही वाचा - राज्यात पावसाचा जोर ओसरला, आज 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
अन्नद्रव्यांची कमतरता - जमिनीतील अन्नद्रव्ये जसे नत्र, मॅग्नेशिअम आणि लोह यांची कमतरता असल्याने पाने पिवळी पडतात.ढगाळ वातावरणामुळे अपुरे प्रकाश संश्लेषण - सतत
ढगाळ वातावरण राहिल्यास अपुऱ्या सूर्यप्रकाशामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. परिणामी पाने स्वतःचे अन्न (हरित द्रव्य) तयार करू शकत नाही, यामुळे पाने पिवळी पडतात.उपाययोजना - हळदीला (पावडरला) गर्द पिवळा रंग येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कुरकुमीन घटकाची योग्य प्रमाणात वाढ होण्यासाठी गंधक हे आवश्यक असते.
पाने लोहाच्या कमतरतेमुळे पिवळी पडल्यास पानांवर ५० ग्रॅम फेरस अमोनिअम सल्फेट किंवा फेरस सल्फेट प्रति १० लिटर पाण्यात मिसळून ३ ते ४ वेळा फवारणी करावी.फवारणीसाठी लागणारी सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते चीलेटेड स्वरूपात असल्यास उपलब्धता वाढते.फवारणी करताना जमिनीत ओलावा असणे गरजेचे असते. चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्यांचे फवारणीचे प्रमाण
१० ते २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी असे ठेवावे. फवारणीसाठी शासन प्रमाणित सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड-२ लिब्रेल चिलीमिक्स काॅबी, प्रिवी मायक्रोन्यूट्रीन, रानडे मिकनेल्फ ३२.या पैकी एक माती परीक्षण अहवाला नुसार खत घ्यावी जमिनीमध्ये लोह आणि जस्ताची कमतरता असल्यास शिफारशीत खत मात्रे बरोबर शिफारशीत प्रमाणात सुक्ष्म अन्नद्रव्ये हे रासायनिक खते तसेच शेणखतात मिसळून द्यावीत.
Share your comments