शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (Agricultural Produce Market Committee) तुरीला चांगला बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील (Market Committee) बाजारभावानुसार तुरीला सर्वाधिक 8700 रुपयांचा कमाल दर मिळालेला आहे. हा दर उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला आहे.
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल संध्याकाळपर्यंत 115 क्विंटल तुरीची (tur) आवक झाली. याकरिता किमान भाव 8200, कमाल भाव 8700 आणि सर्वसाधारण भाव 8450 इतका मिळाला. तसेच हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल तुरीची 2128 क्विंटल इतकी आवक झाली.
शेतकऱ्यांना 'ही' शेती ठरतेय अत्यंत फायदेशीर; कमी गुंतवणुकीत घेतायत लाखोंची कमाई
याकरिता किमान भाव (minimum price) 7000 कमाल भाव 8700 आणि सर्वसाधारण भाव 7625 इतका मिळाला आहे. तुरीच्या आवकेमध्ये घट असली तरी तुरीला चांगला भाव मिळतो आहे. सर्वाधिक आवक ही हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही आवक 2128 क्विंटल इतकी आहे.
महत्वाच्या बातम्या
Ration Card: रेशन कार्ड मिळविण्यासाठी नवीन सुविधा सुरू; आता असा अर्ज करावा लागणार
आधार धारकांसाठी UIDAI ने दिली महत्वाची माहिती; काही मिनिटांत होणार मोठा फायदा, जाणून घ्या...
Electric Tractor: शेतकरी मित्रांनो देशात लाँच होणार इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; 'या' कंपनीने केली घोषणा
Share your comments