भारतात पारंपारिक पिक पद्धतीला फाटा देत आता शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत आहेत आणि फळबाग तसेच आयुर्वेदिक प्लांटची लागवड करून चांगली कमाई करत आहेत. जगात मेडिसिनल प्लांटची मागणी ही डे-बाय-डे चांगलीच वाढत आहे. त्यामुळे मेडिसिनल प्लांटची शेती करून अनेक शेतकरी आपले उत्पन्न वाढवीत आहेत. अशाच एका मेडिसिनल प्लांट पैकी एक आहे
तुळशी, तुळशीची लागवड करून शेतकरी बांधव चांगले उत्पन्न कमवू शकतो. तुळशीची शेती ही करार पद्धत्तीने देखील करता येते. भारतात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या तुळशी शेती साठी शेतकऱ्यांसमवेत करार करतात. शेतकरी बांधव अशा कंपनीसोबत करार करून देखील चांगली कमाई करू शकतात.
तुळशीची मागणी ही बाजारात सदैव बनलेली असते. त्यामुळे ह्याची लागवड फायदेशीर ठरू शकते. तुळशी धार्मिक दृष्ट्या खुप महत्वपूर्ण आहे. सनातनी वैदिक हिंदू धर्मात तुळशीची पूजा केली जाते शिवाय तिच्या आयुर्वेदिक गुणांमुळे आयुर्वेदात तिला अणण्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. तुळशीचे अनेक प्रकार आहेत ज्यामध्ये युजिनोल आणि मिथाईल सिनामेंट हे घटक असतात त्यामुळे तुळशीचा वापर हा कॅन्सर सारख्या महाभयंकर आजारात औषध बनवण्यासाठी केला जातो.
त्यामुळे तुळशीचा वापर हा कॅन्सर सारख्या महाभयंकर आजारात औषध बनवण्यासाठी केला जातो.
प्रशिक्षण घेऊन आपण तुळशी लागवड केली तर ह्याची शेती आपल्यासाठी फायद्याचा सौदा ठरू शकते. जर आपल्यालाही ज्याप्रमाणे तुळशी आपल्या आरोग्यासाठी आणि धार्मिक कार्यासाठी महत्वपूर्ण आहे त्याप्रमाणे तुळशीची लागवड ही शेतकऱ्यांसाठी देखील खुप महत्वाची ठरू शकते आणि ह्यातून शेतकरी बांधव चांगली कमाई करू शकतो. मित्रांनो तुळशी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तुळशी लागवड करण्यासाठी हेक्टरी जवळपास 15 हजार रुपयांचा खर्च येतो आणि हेक्टरी 3 लाख रुपयापर्यंत कमाई होऊ शकते. तुळशीचे पिक हे साधारणता तीन महिन्यांनी काढणीसाठी तयार होते म्हणजे शेतकरी बांधव तीन महिन्यात 3 लाख रुपयांची कमाई ह्या पिकातून करू शकतात. त्यामुळे आता अनेक शेतकरी तुळशी लागवड करताना दिसत आहेत.
भारतात अनेक आयुर्वेदिक कंपन्या शेतकऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग अनुसार करार पद्धतीने तुळशी लागवड करायला देत आहेत. पतंजली, डाबर, वैद्यनाथ ह्यासारख्या अनेक कंपन्या शेतकऱ्यांसमवेत करार करत आहेत. ह्या कंपन्यांशी जुळून सुद्धा आपण तुळशी पिकातून लाखों रुपये कमवू शकतात. तुळशीच्या बिया आणि तेलला खुप मोठा बाजार आहे त्यामुळे ह्या आयुर्वेदिक कंपनी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कच्चा माल खरेदी देखील करत आहेत.
जर आपल्यालाही तुळशी शेती करायची असेल तर आपल्याला ट्रैनिंगची आवश्यकता भासेल. जर योग्य तुळशी शेतीसाठी प्रशिक्षण हवं असेल तर उत्तर प्रदेश राज्यात तुळशी शेतीसाठी प्रशिक्षण दिले जाते. लखनऊ मध्ये असलेल्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड ऐरोमिक प्लांट नावाची संस्था तुळशी शेतीसाठी प्रशिक्षण देते तिथे जाऊन आपण तुळशी शेतीच्या बारीक सारीक गोष्टी शिकू शकतात. हिच संस्था तुम्हाला औषधे बनवणाऱ्या कंपनीशी करार करण्यासाठी मदत करेल त्यामुळे तुम्हाला इकडे तिकडे शोधाशोध करावी लागणार नाही.
माहिती न्युज18
Share your comments