आपल्याला सगळ्यांना माहीत तर आहेच आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो.यामध्ये निम्या पेक्षा जास्त लोक हे शेतीवर अवलंबून असतात.शेतावर वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन चालू असते किंवा शेती कशा प्रकारे करावे; आधुनिक पद्धतीने करावी की अजून कोणत्या पद्धतीने करावी यावर देखील अनेक संशोधकांचे संशोधन चालू आहे आणि यावर मोठ मोठ्या इन्स्टिट्यूट देखील उभारले गेल्या आहे.त्यातूनच लागलेला एक शोध म्हणजे मल्टी लेअर फार्मिंग.
मल्टी लेयर फार्मिंग म्हणजे नक्की काय:
मल्टी लेअर फार्मिंग म्हणजे बहू स्तरीय पीक म्हणजेच एकाच वेळेस अनेक पिकांची लागवड करणे. यामध्ये शेतकऱ्यांना कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त नफा मिळत आहे त्यामुळे बहुतांश शेतकरी या पद्धतीचा वापर करतात.मल्टी लेअर फार्मिंग मुळे नुसतच पाणी,वीज,श्रम,खर्च कमीच होत नाही तर जास्तीत जास्त नफा देखील शेतकऱ्यांना होतो म्हणून शेतकरी मल्टी लेअर फार्मिंग करतात.
हेही वाचा:जिप्सम म्हणजे काय? जाणून घ्या काय होतो याचा फायदा
मल्टी लेअर फार्मिंग साठी अगोदर तीन चार पिकांची निवड करावी लागते. शेतकरी जास्त कालावधीचे पीक घेतात जसे की ऊस,डाळिंब, सिताफळ यांसारख्या फळांची लागवड करणे त्यातूनच त्यामध्ये भाजीपाला लावणे जशी की मेथी,कोथिंबीर यांसारख्या पालेभाज्यांची निवड करणे यामुळे लोकांना दुप्पट-तिप्पट घेऊन चांगला फायदा होतो.श्रम पाणी खर्च यासाठी डबल डबल करावा लागत नाही किंवा सारखा सारखा करावा लागत नाही हे जास्त कालावधीचे पीक घेतले त्यामध्ये आपण कालांतराने कमी कालावधीचे पिकामध्ये बदल करू शकतो. यालाच आपण मल्टी लेअर फार्मिंग असं म्हणू शकतो.
एकाच वेळी चार पिके घेतल्यामुळे जमीनही वाचली आणि प्रत्येक पिकाला वेगवेगळे पाणी द्यावे लागत नाही यामुळे पाणीही वाचते.तुम्ही जर मनापासून व्यवस्थित मल्टी लेअर फार्मिंग केली तर तुम्हाला नियमित नफ्या पेक्षा चार ते आठ पट नफा जास्त मिळू शकतो.मल्टी लेयर फार्म मुळे कमी खर्च आणि नफा हा कायम जास्त ठरतो. यामुळे एका पिकाला जर आपण व्यवस्थित पोषक दिले तर तेच पोषण दुसऱ्या पिकालाही मिळते त्यामुळे आपल्याला दुसऱ्या पिकासाठी खास अशी काळजी करावी लागत नाही.
Share your comments