1. कृषीपीडिया

द्राक्ष बागेतील खोड अळी.

साधारणतः ३-६-९-१२ हा तिचा वर्षभर असणारा खोडतील प्रवास (नुकसानदायक)(३.६.९.१२ म्हणजे मार्च, जून, सप्टेंबर, डिसेंबर) टप्पा नुसार *१.अंडी २.अळी.३ कोष ४. प्रौढ* अशा ४ अवस्था असतात.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
द्राक्ष बागेतील खोड अळी.

द्राक्ष बागेतील खोड अळी.

खोड अळीचे नावे पुढीलप्रमाणे

१. celosterna scabrate

२. stromasium barbatan

३. lepidopteran stem borer.

अळीचे नुकसान करण्याची पद्धत

प्रथमता मार्च, मे या महिन्यात प्रौढ किडे हे खोडातून बाहेर येतात. त्यानंतर मे, जुलै या महिन्यात हे किडे (मिर्गी किडा) खोडाच्या सालीच्या आत अंडी घालतात पुढील काळात अंड्यातून अळी बाहेर पडल्यावर साधारणतः जुलै, सप्टेंबर हि आळी झाडावरील खोडावरचा zylam चा संपूर्ण भाग खात जाते xylem मुळे झाडाला जमिनीतून मूळावाटे उचलले जाणारे

अन्नरस संपूर्णरित्या हि अळी खात असते त्यानंतर पुढील अवस्थेत हि आळी आता खोडात जाण्यास सर्वात करते. त्यानंतर ती ऑगस्ट, ऑक्टोंबर दरम्यान ती खोड पोखरण्यास सर्वात करते तेंव्हा भुस्सा बाहेर पडतो आपल्या निदर्शनास येते की खोड अळीची लागण आपल्या प्लॉटला झालेली आहे.

उपाय

साधारणतः प्रथम अवस्थेत या किडीचा अटकाव करणे सोपे आहे खरड छाटणी होतच साधारणतः मार्च एप्रिल मे (विभाग नुसार) खोडावरील जुनी साल काढून घेणे जेणेकरून किडा हा खोडावर साल नसल्यामुळे अंडी घालू शकणार नाही. साल हा एकमेव आधार आहे त्यानंतर खोड धुवून घेणे.

१)रेकॉर्ड + इमिडा

२)karate + नुवान

३)nimark + nuvan imida

वरील स्प्रे साधारणतः एप्रिल, जुलै प्रत्येकी १५ दिवसांनी प्रयोगात आणणे ज्यामुळे अंड्याचा प्रथम अवस्थेत अटकाव करणे फायदेशीर ठरते (milibag साठी हि फायदा होतो )

अळी अवस्थेतील अटकाव करण्यासाठी एप्रिल सप्टेंबर दरम्यान अडमायेर किंवा dentatsu याची drinching करणे ( एकरी २५० gm)

गोडीबहर दरम्यान दिसल्यास सरळ actra १ kg/एकर drip irrigation करणे.

वरील उपाय प्रथम अवस्थेत केल्यास खूप छान फायदा होईल.

संकलन - प्रवीण सरवदे, कराड

English Summary: Trunk larvae in the vineyard. Published on: 19 November 2021, 07:59 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters