ट्रायकोग्रामा हे परजीवी किटक असून ते पतंगवर्गीय किडींची अंडी शोधून त्यात आपली अंडी घालतात. त्यामुळे किडीचा अंडी अवस्थेमध्येच नाश होतो. ट्रायकोग्रामा वापराने त्याचा वातावरणात व इतर मित्र किटकांवर विपरीत परिणाम होत नाही. ट्रायकोग्रामा प्रौढ स्वतः हानिकारक किडींची अंडी शोधून नष्ट करतो. त्याचबरोबर स्वतःची पुढची पिढी त्या जागेवर वाढवितो त्यामुळे ही पद्धत स्वयंप्रसारित व स्वयंउत्पादीत आहे. ट्रायकोग्रामाच्या वापराने किटकनाशकाच्या तुलनेत पिक संरक्षणावर कमी खर्च होतो. हानिकारक किडींचे प्रभावी नियंत्रण होते.
ट्रायकोकार्डचा वापर ऊस, कापूस, मका, सूर्यफूल, भात, टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी व इतर भाजीपाला पिकांमध्ये करता येतो. सद्या काही प्रमाणात सदरील ट्रायकोकार्ड हे परोपजिवी किटक संशोधन योजना, किटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे प्रती कार्ड रु. 100/- प्रमाणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कार्डचा वापर प्रती एकरी पिकानुसार 2 ते 3 या प्रमाणात लावावेत.
Share your comments