
groundnut crop
भारतात तेलबिया पिकांची लागवड हि मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रात देखील तेलबियाच्या लागवडिखालील क्षेत्र हे लक्षणीय आहे. ह्याच तेलबिया पिकांपैकी प्रमुख पिक म्हणजे भुईमूग. भुईमूग एक प्रमुख तेलबिया पिकांपैकी एक आहे. भारतात याची लागवड हि सर्वत्र थोड्या बहू प्रमाणात केली जाते. भुईमूगांची लागवड हि राजस्थान, गुजरात, हरियाणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक राज्यात मोठया प्रमाणात केली जाते. भुईमूगांची लागवड हि महाराष्ट्रात देखील उल्लेखनीय आहे.
महाराष्ट्रात जवळपास अडीच लाख हेक्टर क्षेत्र हे भुईमूग पिकाच्या लागवडिखालील आहे. महाराष्ट्रात या एवढ्या मोठ्या क्षेत्रात जवळपास 11 क्विंटल प्रति हेक्टर एवढे उत्पादन हे भुईमूग पिकातून शेतकरी बांधव काढत आहेत. भुईमूगच्या शेंगा अर्थात शेंगदाणे हे आपल्या शरीरासाठी पौष्टिक असल्याचे सांगितलं जाते. यामध्ये प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, आणि व्हिटॅमिन बी, सी, कॅलसिअम, मॅग्नेशियम इत्यादी मोठ्या प्रमाणात आढळते त्यामुळे शेंगदाणे सेवन करणे मानवी आरोग्यासाठी लाभदायी असते आणि असा सल्ला आपल्याला डॉक्टर देखील देत असतात. त्यामुळे शेंगदाण्याला खुप मोठा बाजार आहे आणि याची लागवड करून शेतकरी बांधव चांगली कमाई करत आहेत. त्यामुळे आज आपण ह्या महत्वाच्या तेलबिया पिकांची अर्थात भुईमूग पिकांची लागवडिविषयी जाणुन घेणार आहोत.
भुईमूगासाठी उपयुक्त जमीन
भुईमूग पिकाच्या चांगल्या वाढीसाठी जमीन निवडतांना काळजी घेणे आवश्यक आहे. जमीन हि पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी, जमीन हि सुपीक वाळूमिश्रित चिकनमाती असलेली मध्यम पोत असलेली निवडावी. लागवडिपूर्वी जर माती परीक्षण केले तर उत्तम, जमिनीत चुना आणि कार्बन पदार्थ चांगल्या प्रमाणात असणे आवश्यक असते. पूर्वमशागत उरकताच चांगल्या क्वालिटीचे कंपोस्ट अथवा शेणखत शेतात टाकावे यामुळे उत्पादनात वाढ होते.
पेरणी कशी करणार
शेतकरी मित्रांनो भुईमूग पिकासाठी दोन बिदमधील अंतर 30 सें.मी. असावे तसेच दोन भुईमूगाच्या रोपांमधील अंतर 10 सेमी असावे.
भुईमूग पिकावर सर्व्यात जास्त धोका असतो पाने खाणार्या अळ्या आणि पानांवर फिरणाऱ्या अळ्यांचा यावर नियंत्रण मिळवण्यासाठी 10 लिटर पाण्यात 10 मिली किंवा 8 मिली डिमॅटोन 15 टक्के याचे द्रावण करून फवारणी करावी यामुळे अळी आटोक्यात येतात. याशिवाय सायपरमेथ्रीन 20 ईसीचे 4 मिली किंवा डेकामेथ्रीन 28 ईसीचे 10 मिली किंवा किनोस्फॉस 25 इत्यादी आपण फवारू शकता, 20 मिलीला 10 लिटर पाण्याचे प्रमाण घ्यावे. टिक्का व तांबेरा रोग पिकावर दिसू लागल्यास 25 ग्रॅम मॅन्कोझेब (डायटिन एम-45) 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
Share your comments