
ग्रामीण भागात शाश्वत शेती आणि शेतकरी-केंद्रित दृष्टिकोनाचे प्रतीक ठरलेला महालक्ष्मी गूळ उद्योग यंदाही गोड सुरुवात करत 2025-26 या गाळप हंगामाला उत्साहात प्रारंभ झाला.
संस्थापक अध्यक्ष: श्री. हरिचंद्र आप्पा बहिर
2019 पासून नित्यनियमाने सुरू असलेल्या या गूळ कारखान्याचा शुभारंभ यंदा दिनांक 3 जुलै 2025 रोजी पारंपरिक घरगुती पद्धतीने क्रशरमध्ये उसाची पहिली मोळी टाकून करण्यात आला.
या क्षणाला साक्षीदार असलेले प्रत्येकजण भारावून गेले. गोडवा केवळ गुळात नाही, तर त्या परंपरेत, त्या नात्यात आणि त्या श्रमात दडलेला असतो याची ही जाणीव होती.
अध्यक्ष हरिचंद्र बहिर यांचे विचार-
“2019 पासून आमचा गूळ कारखाना नियमितपणे सुरू आहे. ऊस वेळेवर गाळपासाठी गेल्यामुळे शेतकरी इतर हंगामी पिकांची लागवड करू शकतात. यामुळे मेहनतीचं नियोजन चांगल्या पद्धतीने होतं, उत्पादन वाढतं आणि काटा पेमेंट वेळेवर मिळाल्यामुळे आर्थिक अडचणी कमी होतात. आम्ही शक्य तितका चांगला भाव देण्याचा नेहमी प्रयत्न करतो.”
दरवर्षी सरासरी 30 मेट्रिक टन उसाचे गाळप या लघुउद्योगातून केले जाते.
उद्योग छोटा असला तरी त्यामागील ध्येय मोठं आहे –
"शेतकऱ्याच्या ऊसाला न्याय देणे, योग्य दर देणे, आणि त्याचे श्रम सन्मानाने स्वीकारणे."

उसाच्या भाववाढीसाठी विशेष प्रयत्न:
बाजारातील चढ-उतार लक्षात घेऊनही, महालक्ष्मी गूळ उद्योग शेतकऱ्याला जास्तीत जास्त दर मिळावा यासाठी वर्षभर नियोजन करतो.
स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा उद्योग:
हा उद्योग केवळ गाळप केंद्र नाही, तर तो शेतकऱ्यांचा आधारवड आणि गुणवत्तेच्या आधारावर निर्माण झालेला लोकविश्वास आहे.
नैसर्गिक, रासायनमुक्त गोडवा:
इथे तयार होणारा गूळ कोणत्याही रासायनिक प्रक्रिया न वापरता पारंपरिक पद्धतीने बनवला जातो, त्यामुळे तो आरोग्यदायी आणि ग्राहकप्रिय आहे.
"गोडवा गुळातच नाही, तर वेळेवर मिळणाऱ्या विश्वासात आहे!"
नितीन रा. पिसाळ
फार्मर द जर्नलिस्ट- कृषी जागरण
Share your comments