भाजीपाला लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हातात कायम पैसा खेळता राहतो. त्यातल्या त्यात कमी खर्चात आणि कमी कालावधीत येणाऱ्या भाजीपाला वर्गीय पिकांमुळे चांगला फायदा होतो. कमी खर्चात आणि कमीत कमी कालावधीत येणारी भाजीपाला पीक म्हणजे मेथी आणि पालक यांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना कमी वेळात चांगला नफा मिळू शकतो.
परंतु कुठल्याही पिकाचे लागवड करण्यापूर्वी संबंधित पिकाची योग्य वानाची निवड करणे हे तितकेच महत्त्वाचे असते. या लेखात आपण मेथी आणि पालक यापालेभाज्या वर्गीय पिकांच्या उत्तम अशा वाणाविषयी माहिती घेणार आहोत.
पालकच्या विविध अशा उत्तम जाति
- ऑलग्रीन- पालकाची ही जात भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथे विकसित करण्यात आली आहे. या जातीची पाने सारख्या आकाराची कोवळी हिरवी असतात.या जातीचे उत्पादन हेक्टरी 12.5इतके होते. हिवाळी हंगामातील लागवडीत 15 ते 18 दिवसांच्या अंतराने तीन ते सात वेळा कापणी करता येऊ शकते.
- पुसा ज्योती- पालकाचीही नवीन जात निवड पद्धतीने भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथे विकसित करण्यात आली आहे. या जातीची पाने मोठी जाड कोवळी असून पोटॅशियम, लोह, कॅल्शियम,सोडियम आणि क जीवनसत्त्व चे प्रमान ऑल ग्रीन या जाती पेक्षा जास्त आढळते. महाराष्ट्रात ही जात चांगल्या प्रकारे येते.या जातीचे उत्पादन हेक्टरी 15 टनांपर्यंत मिळते.
- पुसा हरित-ही जात भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथे विकसित करण्यात आली आहे.ही जात जोमदार वाढते तसेच या जातीची पाने हिरवी आणि जाड असून भरपूर मोठ्या प्रमाणात येतात. या जातीच्या पानांच्या तीन ते चार कापण्या मिळतात.ही जात लवकर फुलावर येत नाही.या जातीची लागवड सप्टेंबर पासून फेब्रुवारीपर्यंत केव्हाही करता येते.या जातीचे उत्पादन हेक्टरी दहा टनांपर्यंत मिळते.
मेथीच्या चांगल्या उत्पन्न देणाऱ्या जाती
- कसुरी मेथी-या मेथीची पाने लहान गोलसर असून तिची वाढ सुरुवातीला फार सावकाश होते. या मेथीची फुले आकर्षक पिवळ्या रंगाची,लांब दांडा वर येणारी असून शेंगा लहान कोवळ्या व बाकदार असतात.
- तर बिया नेहमीच्या मेथी पेक्षा बारीक असतात. कसूरी मेथी अधिक सुगंधित आणि स्वादिष्ट लागते.ही जात उशिरा येणारे असली तरी तिचे अनेक तोडे घेता येतात. ही जात परसबागेत लावण्यासाठी फारच उपयुक्त आहे.
- नेहमीचीमेथी-ही जात लवकर वाढते. या जातीला भरपूर फांद्या येतात आणि वाढीची सवय उघड असते. या मेथीची पाने लंबगोल किंवा गोलसर असतात. या मेथीच्या शेंगा लांब आणि मोठ्या असतात. त्यामध्ये पू सारली ही सुधारित जात महाराष्ट्रात मेथी नंबर 47 विकसित करण्यात आली आहे.बऱ्याच ठिकाणी स्थानिक वाणाची लागवड केली जाते.
Share your comments