भारतात मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मिरची प्रमुख मसाला पिकांपैकी एक आहे ह्याची मागणी भारतात खुप मोठ्या प्रमाणात आहे म्हणुन मिरची लागवड ही शेतकऱ्यांसाठी एक फायद्याचा सौदा ठरत आहे. मिरची लागवड आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात केली जाते पण जर मिरची लागवडीतुन चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर सर्व्यात महत्वाची गोष्ट ठरते ती मिरचीच्या जातीची, जर सुधारित मिरचीच्या जातीची लागवड केली तर मिरची लागवडीतून चांगले उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. आज आपण आपल्या वाचक शेतकरी मित्रांसाठी मिरचीच्या टॉपच्या जातींविषयी माहिती घेऊन आलो आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणुन घेऊया मिरचीच्या टॉपच्या जाती.
अर्का मेघना
अर्का मेघना ही एक मिर्चीची सुधारित वाण आहे. ह्या जातीच्या मिरचीची झाडे थोडी उंच, जोमदार आणि गडद रंगाची असतात. ह्या जातीच्या मिरच्याची लांबी ही जवळपास 10 सें.मी. पर्यंत असते आणि मिरचीचा रंग हा गडद हिरवा असतो. ह्या जातीच्या मिरच्या ह्या 150 ते 160 दिवसांनी काढणीसाठी तयार होतात. ही वाण हिरव्या आणि लाल अशा दोन्ही मिरचीसाठी योग्य असल्याचे सांगितलं जाते. ही जात पावडरी बुरशी आणि विषाणूंना चांगल्या प्रकारे प्रतिकार करते ह्या जातीची रोगप्रतिकारक शक्ती ही चांगली आहे.
अर्का मेघना ही एक उच्च उत्पादन देणारी सुधारित वाण आहे ह्याची लागवड करून शेतकरी चांगली कमाई करू शकतात. मिरचीच्या या जातीपासून 30-35 टन हेक्टरी हिरव्या मिरच्याचे उत्पादन मिळू शकते.
अर्का श्वेता
अर्का श्वेता ही देखील एक उच्च उत्पन्न देणारी सुधारित वाण आहे. मिरचीच्या या जातीच्या मिरचीची लांबी सुमारे 13 सें.मी. पर्यंत असते आणि ह्या मिरचीची जाडी 1.2 ते 1.5 सेमी पर्यंत असते. ही जात विषाणूजन्य रोगापासुन संरक्षित असते. ह्या जातीची रोगप्रतिकारक शक्ती ही चांगली मजबूत असते. या जातीपासून प्रति हेक्टर 28-30 टन उत्पादन मिळू शकते. ह्या जातीची लागवड मिरची उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरेलं.
काशी सुर्ख
या जातीची झाडे 70 ते 100 सें.मी उंचीपर्यंत वाढतात. ह्या जातींच्या मिरचीचे झाड हे थोडे जाड उंच आणि सरळ असते. ह्या जातीच्या मिरच्या 10 ते 12 सें.मी. एवढ्या लांब असतात. ह्या जातीच्या मिरचीचा रंग हा हलका हिरवा असतो. मिरच्या ह्या सरळ दिसतात. ह्या जातीच्या मिरचीचा पहिला तोडा हा मिरची लागवडीनंतर 50 ते 55 दिवसांनी तयार होतो.
ही जात कोरड्या आणि हिरव्या अशा दोन्ही प्रकारांसाठी सर्वोत्तम असल्याचे शेतकरी सांगतात. काशी सुर्ख ही एक सुधारित वाण आहे. या जातीपासून मिरचीचे उत्पादन हे हेक्टरी 20 ते 25 टन एवढे येते.
माहितीस्रोत ट्रॅक्टरजंकशन
Share your comments