डॉ.आदिनाथ ताकटे, डॉ.अनिल राजगुरू
तूर हे खरीप हंगामातील अत्यंत महत्वाचे पीक. राज्यात सर्वसाधारपणे १२ ते १३ लाख हेक्टर क्षेत्रावर अति लवकर, मध्यम लवकर आणि मध्यम ते उशिरा कालावधीच्या वाणांची निर्मिती राज्यातील कृषि विद्यापीठांनी केली आहे. तुरीच्या अधिक उत्पादनासाठी पाऊसमान आणि जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन योग्य वाणांची पेरणी करणे फायदेशीर ठरते.
तुरीच्या वाणाची निवड करताना जमिनीच्या प्रकारानुसार करणे गरजेचे असते. कारण भारी जमिनीत अधिक उत्पादन देणारे तुरीचे वाण हे मध्यम ते हलक्या जमिनीत तितकेच उत्पादन देतील असे नाही. मध्यम प्रकारच्या जमिनीकरिता कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या वाणांची निवड करावी. लट भारी जमीन असेल तर मध्यम ते उशिरा कालावधीत परिपक्व होणाऱ्या वाणाची निवड करावी.
बी डी एन ७११ :
मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात कोरडवाहू लागवडीसाठी,हलक्या व मध्यम जमिनीत पेरता येणारा १५० ते १५५ दिवसात तयार होणारा ,एकाच वेळी पक्व होणारा,यांत्रिक पद्धतीने काढता येणारा शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेला वाण .
पांढऱ्या दाण्याचे वाण : बी डी एन ७११ ,गोदावरी ,बी एस एम आर ८५३
लाल/तांबड्या /तपकिरी/फिकट तपकिरी दाण्याचे वाण :फुले राजेश्वरी ,फुले तृप्ती ,फुले पल्लवी ,बी डी एन ७०८, बी डी एन ७१६, रेणुका, बी एस एम आर ७३६,,आय सी पी एल ८७, आय सी पी एल ८७११९, पी.के.व्ही तारा, पी.डी. के.व्ही .आश्लेषा,ए के.टी ८८११ .
अ.नं.परिपक्वता कालावधी- दिवस
१.अति लवकर परिपक्व होणारे वाण-१२५ ते १३०
२.लवकर परिपक्व होणारे वाण-१३१ ते १५०
३.मध्यम लवकर परिपक्व होणारे वाण- १५० ते १६५
४.मध्यम परिपक्व होणारे वाण-१६६ ते १८५
५.उशिरा परिपक्व होणारे वाण-१८६ ते २००
महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी विकसित वाण
फुले पल्लवी (फुले तूर १२-१९-२)
प्रसारण वर्ष :२०२४ ,महाराष्ट्र ,मध्यप्रदेश ,छत्तीसगड,गुजरात आणि राजस्थान या राज्याकरिता प्रसारित
पिकाचा कालावधी:१५५-१६० दिवस
वैशिष्टे:मध्यम पक्वता कालावधी ,दाणे टपोरे फिकट तपकिरी ,मर व वांझ या रोगास मध्यम प्रतिकारक्षम शेंगा पोखरणारी अळी,शेग माशी या किडींना कमी बळी
हेक्टरी उत्पादन:२१.४५ क्विं/हे.
फुले तृप्ती
प्रसारण वर्ष :२०२२, महाराष्ट्र ,गुजरात,मध्यप्रदेश , छत्तीसगड या राज्यासाठी प्रसारित
पिकाचा कालावधी:१६०-१७० दिवस
वैशिष्टे:दाणे आकाराने टपोरे ,दाण्याचा रंग फिक्कट तपकिरी मार व वांझ रोगास मध्यम प्रतिकारक्षम
शेंगा पोखरणारी अळी आणि शेंगमाशी या किडीचा प्रादुर्भाव कमी
हेक्टरी उत्पादन:२२-२३ क्विं/हे.
फुले राजेश्वरी
प्रसारण वर्ष :२०१२, महाराष्ट्र ,मध्यप्रदेश व गुजरात राज्याकरिता प्रसारित
पिकाचा कालावधी:१४०-१५० दिवस
वैशिष्टे:तांबड्या रंगाचे टपोरे दाणे , मर व वांझ रोगास प्रतिकारक्षम
हेक्टरी उत्पादन: २८-३० क्विं/हे.
पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ ,राहुरी विकसित वाण
पी.के .व्ही.तारा
प्रसारण वर्ष :२०१३
पिकाचा कालावधी:१७८-१८० दिवस
वैशिष्टे:दाण्याचा रंग लाल ,मर व वांझ रोगास प्रतिकारक्षम
हेक्टरी उत्पादन:१९-२० क्विं/हे.
पी.डी. के.व्ही .आश्लेषा
प्रसारण वर्ष :२०२२ ,महाराष्ट्र ,गुजरात ,मध्यप्रदेश ,छत्तीसगड या राज्याकरिता प्रसारित
पिकाचा कालावधी:१७५-१८० दिवस
वैशिष्टे:दाणे टपोरे आणि लाल रंगाचे,मर,वांझ ,करपा आणि पानावरील ठिपके या रोगांना मध्यम प्रतिकारक्षम, जिरायत लागवडीसाठी योग्य
हेक्टरी उत्पादन :१९-२० क्विं/हे.
ए के टी ८८११
प्रसारण वर्ष :१९९५ ,विदर्भासाठी प्रसारित
पिकाचा कालावधी:१३०-१४० दिवस
वैशिष्टे:दाण्याच रंग लाल,मध्यम टपोरे दाणे,,मर रोगास मध्यम प्रतिकारक्षम
हेक्टरी उत्पादन: १०-११ क्विं/हे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ ,परभणी
बी डी एन पी एच-१८-५
प्रसारण वर्ष :२०२४ भारतातील मध्य विभाग करिता प्रसारित
पिकाचा कालावधी:१५५-१७० दिवस
वैशिष्टे:राज्यातील पहिला संकरित वाण,दाण्याचा रंग पांढरा,मर व वांझ रोगास मध्यम प्रतिकारक्षम
हेक्टरी उत्पादन:१८ -२२ क्विंटल /हेक्टर
बी डी. एन ७०८ (अमोल)
प्रसारण वर्ष :२००४ मराठवाडाकरिता प्रसारित
पिकाचा कालावधी:१६०-१६५ दिवस
वैशिष्टे:शेंगा गर्द लाल,दाणे चमकदार लाल रंगाचे,मध्यम आकाराचे,शेंगा पोखरणाऱ्या किडीस सहनक्षम
हेक्टरी उत्पादन:१६-१८ क्विंटल /हेक्टर
बी.डी. एन ७११
प्रसारण वर्ष :२०११,मराठवाडा ,पश्चिम महाराष्ट्रात कोरडवाहू लागवडीसाठी शिफारस
पिकाचा कालावधी:१५०-१५५ दिवस
वैशिष्टे:दाणा पांढरा, हलक्या व मध्यम जमिनीस योग्य,शेंगा एकाच वेळी पक्व, यांत्रिक पद्धतीने काढता येतात,लवकर पक्व होत असल्याने रब्बीत दुबार पीक घेणे शक्य
हेक्टरी उत्पादन:१६-२३ क्विंटल /हेक्टर
बी.डी. एन ७१६
प्रसारण वर्ष :२०१६, महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित
पिकाचा कालावधी:१६५-१७० दिवस
वैशिष्टे:दाणे लाल व टपोरे , मर व वांझ रोगास प्रतिकारक्षम ,उत्तम प्रतीची डाळ
पावसावर आधारित ठराविक क्षेत्रात वेळेत पेरणीसाठी योग्य
हेक्टरी उत्पादन: १८-२० क्विंटल /हेक्टर
गोदावरी (बी.डी.एन. २०१३ – ४१)
प्रसारण वर्ष :२०२१
पिकाचा कालावधी:१६०-१६५ दिवस
वैशिष्टे:पांढऱ्या रंगाचे दाणे, वाढीचा काळ निमपसरट,मर व वांझ रोगास प्रतिकारक्षम
हेक्टरी उत्पादन:१९-२४ क्विंटल /हेक्टर
रेणुका
प्रसारण वर्ष :२०२२ महाराष्ट्र ,गुजरात ,मध्यप्रदेश ,छत्तीसगड या राज्याकरिता प्रसारित
पिकाचा कालावधी:१६५-१७० दिवस
वैशिष्टे:मर व वांझ रोगास प्रतिकारक्षम
हेक्टरी उत्पादन: १९-२२ क्विंटल /हेक्टर
बी.एस एम आर. ७३६
प्रसारण वर्ष :१९९४
पिकाचा कालावधी:१८०-१९० दिवस
वैशिष्टे:दाण्याच रंग लाल, मर व वांझ रोग प्रतिकारक्षम
हेक्टरी उत्पादन :१५-१६ क्विंटल /हेक्टर
बी.एस एम आर ८५३
प्रसारण वर्ष :२००१
पिकाचा कालावधी:१७८-१८० दिवस
वैशिष्टे:पांढरे दाणे , मर व वांझ रोग प्रतिकारक्षम
हेक्टरी उत्पादन :१५-१६ क्विंटल /हेक्टर
इक्रीसॅट,हैद्राबाद विकसित वाण
आय सी पी एल ८७ ( प्रगती)
प्रसारण वर्ष :१९८६
पिकाचा कालावधी:१२५-१३५
वैशिष्टे:दाणे,मध्यम टपोरे ,लाल रंगाचे, दुबार पीक पद्धतीस योग्य,पहिल्या भराच्या शेंगा तोडून दुसरा बहार घेता येतो,सर्व फुले एकाच वेळी येतात.
हेक्टरी उत्पादन :९-१० क्विंटल /हेक्टर
आय सी पी एल ८७११९ (आशा)
प्रसारण वर्ष :१९९२
पिकाचा कालावधी:१८०- २०० दिवस
वैशिष्टे:भारी जमिनीत लागवडीस योग्य ,उशिरा तयार होणारे वाण, दाण्याचा रंग लाल, मर व वांझ रोग प्रतिकारक्षम ,अर्ध रब्बी तुरीच्या लागवडीसाठी शिफारशीत
हेक्टरी उत्पादन: १२-१४ क्विंटल /हेक्टर
वरील नमूद तुरीच्या वाणाच्या बियाण्याच्या उपलब्धते संबंधित कृषी विद्यापीठ, शेतकऱ्यांच्या बीजोत्पादन कंपनी, महाबीज किंवा शासनाच्या इतर मान्यताप्राप्त कंपन्या यांच्याशी आपण संपर्क करू शकता. या संदर्भामध्ये अधिक माहिती संबंधितांकडून प्राप्त होऊ शकते.
तुरीच्या वाणाची निवड करताना घ्यावयाची महत्वाची काळजी.
•जमिनीचा प्रकार, संरक्षित ओलिताची सोय , वाणाचा परिपक्वता कालावधी व मर व वांझ रोगाचा होणारा प्रादुर्भाव या सर्व बाबी लक्षात घेऊन तुरीच्या वाणाची निवड करावी.
•कोरडवाहू क्षेत्रात तुरीच्या वाणाची निवड करताना कमी कालावधीत येणारे, अवर्षण प्रतिकारक्षम,कीड व रोगांना कमी बळी पडणारे वाण निवडावेत.
•काही महत्वाच्या तूर वाणाची वैशिष्ट्ये वर निर्देशीत केली असली तरीही अधिक उत्पादनाकरिता केवळ वाणावर विसंबून न राहता एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्राचा अवलंब करून उत्पादनात वाढ करणे शक्य आहे.
•तुरीच्या वाणाची निवड करताना,कृषी विद्यापीठानी, संबंधित विभागाकरिता शिफारशीत केलेले वाण तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली निवडावे.
लेखक - डॉ.आदिनाथ ताकटे,मृद शास्रज्ञ एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषि विद्यापीठ ,राहुरी, मो.९४०४०३२३८९
डॉ.अनिल राजगुरू,सहाय्यक प्राध्यापक, कृषि वनस्पतीशास्त्र विभाग कृषि महाविद्यालय ,पुणे
Share your comments