1. कृषीपीडिया

टोमॅटो रोपवाटिका व्यवस्थापन तंत्र आणि टोमॅटोच्या काही महत्वपूर्ण वाण

टोमॅटोची लागवड महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी केली जाते. नाशिक जिल्ह्यात तर टोमॅटो मोठ्या प्रमाणात लावला जातो. कुठल्याही पिकाच्या लागवडीत निरोगी रोपांची निर्मिती ही फार महत्वाची असते. कारण रोपे निरोगी असतील तर मिळणारे उत्पादन ही चांगले मिळते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
tommato nursury

tommato nursury

टोमॅटोची लागवड महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी केली जाते. नाशिक जिल्ह्यात तर टोमॅटो मोठ्या प्रमाणात लावला जातो. कुठल्याही पिकाच्या लागवडीत निरोगी रोपांची निर्मिती ही फार महत्वाची असते. कारण रोपे निरोगी असतील तर मिळणारे उत्पादन ही चांगले मिळते.

याच प्रकारे टोमॅटो पिकाच्या लागवडी आधी रोपवाटिका तयार करताना जर योग्य व्यवस्थापन केले तर पुढे येणारे पीक चांगले येते.

 तसेच चांगल्या उत्पादनासाठी पिकाचे चांगले व सुधारित वाणही तितकेच महत्त्वाचे आहेत. या लेखात आपण टोमॅटोचे रोपवाटिका व्यवस्थापन आणि  टोमॅटोच्या काही वाणाविषयी माहिती घेऊ.

 टोमॅटोचे फायदेशीर वाण

  • भाग्यश्री-या जातीच्या फळात लायकोपीन या रंगद्रव्य चे प्रमाण जास्त असून बियांचे प्रमाण कमी आहे. फळे लाल गर्द रंगाची भरपूर गर असलेली असतात. या फळांचा उपयोग प्रक्रिया उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. या जातीपासून सरासरी हेक्‍टरी 75 ते 80 टन उत्पादन मिळते.

धनश्री-या जातीची फळे मध्यम गोल आकाराचीनारंगी रंगाचे असतात. या जातीचे सरासरी उत्पादन व्हायरस 80 ते 90 टन प्रति हेक्‍टरी मिळते. ही जात लीप कर्ल  व्हायरस या विषाणूजन्य रोगास कमी प्रमाणात बळी पडते.

  • राजश्री- फळे नारंगी लाल रंगाची असतात व या संकरित वाणाचे उत्पादन 80 ते 90टन प्रति हेक्‍टरी मिळते.ही संकरित जात लीप कर्ल व्हायरस या विषाणूजन्य रोगास कमी बळी पडते.
  • फुले राजा फुले नारंगी लाल रंगाची असतात. ही संकरित जात लीप कर्ल व्हायरस या विषाणूजन्य रोगास कमी बळी पडते. उत्पादन 55 ते 60 टन प्रति हेक्‍टरी मिळते.

रोपेकसे तयार करतात?

  • एक हेक्टर क्षेत्रासाठी तीन गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका करावी.टोमॅटोच्या संकरित वाणांसाठी 125 ग्रॅम बियाणे एक हेक्‍टर क्षेत्रासाठी पुरेसे असते.
  • रोपवाटिकेची जमीन दोन वेळा उभी- आडवी नांगरून व कुळवून घ्यावी.
  • एक मीटर बाय तीन मीटर बाय 15 सेंटीमीटर आकाराचे गादी वाफे तयार करावेत.
  • गादी वाक्यांमध्ये पाच किलो कुजलेले शेणखत 80 ग्राम19:19:19किंवा 100 ग्रॅम 15:15:15 चांगले सारखे मिसळावे.

 बीजप्रक्रिया

  • थायरम तीन ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा अडीच ग्रॅम प्रति किलो आणि त्यानंतर ऍझोटोबॅक्टर अडीच ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे. त्यामुळे मर,रोपे कोलमडणे कॉलर कुजहे रोग नियंत्रणात राहतात
  • यानंतर हाताने दहा सेंटीमीटर अंतराने रेषा ओढून त्यामध्ये एक सेंटिमीटर अंतर एक एक बी पेरावे. झारीने हलकेच पाणी द्यावे. त्यानंतर गादी वाफे आच्छादनाने झाकून घ्यावेत. साधारणपणे पाच ते आठ दिवसांत बी उगवते. बी उगवल्यानंतर आच्छादने काढून टाकावेत.
  • जमिनीच्या मगदुरानुसार पाणी द्यावे.रोपे उगवल्यावर नायलॉनच्या जाळीने ती झाकून घ्यावीत.त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • रोपे चार ते सहा पानांवर आल्यावर म्हणजेच 25 ते 30 दिवसांनंतर उपटून उपटून त्यांची पुनर्लागवड करावी.रोपे काढण्यापूर्वी त्यांना आदल्या दिवशी पाणी द्यावे.

 रोपे तयार करण्यासाठीची ट्रे पद्धत

 रोपेनिर्मितीसाठी 98 कप्पे असलेला प्रो ट्रे वापरावा. एक ट्रे भरण्यासाठी किमान 1.25 किलो कोकोपीट लागते.कोकोपीटने  भरलेल्या ट्रेमध्ये एका कप्प्यात एक बी याप्रमाणे बी पेरावे. या पद्धतीत बी वाया जात नाही.तसेच प्रत्येक रोपाची सशक्त वाढ होते आणि ट्रे पद्धत रोपांच्या वाहतुकीसाठी सोयीस्कर आहे.

  • एक मीटर बाय तीन मीटर बाय 15 सेंटीमीटर आकाराचे गादी वाफे तयार करावेत.
  • गादीवाफे मध्ये पाच किलो कुजलेले शेणखत 80 ग्राम 19:19:19 किंवा 100 ग्रॅम 15:15:15 चांगले सारखे मिसळावे.
English Summary: tommato nursury masnagement and benificial veriety of tommato Published on: 04 February 2022, 07:55 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters