2 बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे।
- लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट
( इकोजंण्ट ड्रिप 2 लिटर/एकर )
ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते
- वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये।
- फुल धारणेच्या वेळी 12:61 किंवा 00:52:34 वापरावे।
- तोडे चालू झाल्यास 00:52:34, पोटॅशियम सोनेट, 13:40:13, आणि 00:00:50 आलटून पालटून वापरावे।
- फुल धारणे पासून कॅल्शियम नायट्रेट दर 10 ते 12 दिवसांनी द्यायचा। कॅल्शियम ची कमतरता असल्यास फळाच्या बुडाला काळा डाग येत असतो।
- कॅल्शियम दिल्यानंतर पुढच्या पाण्यात बोरान नक्की देणे। तसा केल्यास कॅल्शियम अपटेक मध्ये पण मदत होते व फुलगळ पण थांबते।
- मॅग्निशियंम दर 10 ते 12 दिवसांनी दिल्यास रोग प्रतिकारक क्षमता वाढते आणि पानातील हिरवेपणा मध्ये पण वाढ होते।
- दर 20 ते 25 दिवसांनी मायकोरायझा ( VAM ) 100 ग्राम/एकर सोडल्यास पांढऱ्या मुळींची वाढ चांगली होते।
- दर अमावस्येला प्रति एकर निमास्टीन 1 किलो + ट्रायकोडरमा 1 लिटर + गूळात वेगवेगळे रात्रभर भिजत ठेऊन दुसऱ्या दिवशी एकत्र करून ड्रीप मधून द्यावे, त्याने निमातोड ,मर व जमिनीतील हानिकारक बुरशी वर चांगला नियंत्रण मिळते।
- लागवडी च्या दुसऱ्या आठवड्या पासून प्रति एकर सुडोमोनास( सोल्जर 1लिटर) आणि
बॅसिल्लस( रिवो 1 लिटर) आलटून पालटून दर आठवड्याला देत राहिला तर सर्व बुरशीं पासून चांगला सौंरक्षण मिळते व फवारणीचे खर्च पण मोठ्या प्रमाणात वाचतो। हे पद्धत अवलंबत असाल तर ड्रीप मधून बुरशीनाशक देणे टाळावे।
- मिक्स मायक्रोन्यूट्रिएन्ट
( नेक्टर ड्रिप 2.5 लिटर/एकर) दर 20 ते 25 दिवसांनी द्यावे
- भुरी चे नियंत्रण साठी स्कोर -0.5 मिली/लिटर व रिवो-5 मिली/लिटर ची फवारणी घेतल्यास उत्तम नियंत्रण मिळेल
- लागवडीचे अंतर ज्यास्त ठेवल्यास हवा खेळती राहून करपा आणि अळी चा प्रादुर्भाव कमी होतो।
- झाडात पोटॅश चा प्रमाण व्यवस्तीत असल्यास भुरी चा प्रादुर्भाव कमी होतो व लाल कोळी असल्यास नियंत्रण सोपा जाते।
- फुलगळ थांबवायचा असल्यास ड्रीप मधून स्फुरद द्यावे आणि फवारणी मध्ये चिलेटेडे कॅल्शियम व बोरान चा वापर करावा।
- टोमॅटो मध्ये शेंडा खुडने (टॉपिंग) टाळावे। ते केल्यास व्हायरस वाढायची शक्यता ज्यास्त होते।
- व्हायरस चे लक्षण दिसताच व्हायरस च्या औषध सोबत ताक वापरावे। ताकातील प्रोटीन व्हायरस सोबत मिक्स होऊन त्यांची उत्पत्ती नियंत्रनात येते.
Share your comments