1. कृषीपीडिया

गहू पिकातील पीक संरक्षणाकरिता महत्वाच्या टिप्स

शेतकरी बंधूंनो गहू पिकात पेरणीपासून साधारणता तीस ते पस्तीस दिवसाचे आत तणाचे प्रमाण लक्षात घेऊन एक किंवा दोन वेळा आवश्यकतेनुसार निंदन करून शेत तणविरहित ठेवावे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
गहू पिकातील पीक संरक्षणाकरिता महत्वाच्या टिप्स

गहू पिकातील पीक संरक्षणाकरिता महत्वाच्या टिप्स

शेतकरी बंधूंनो गहू पिकात अरुंद आणि रुंद पाणी तणांचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आवश्यकता असेल तर गहू पिकाचे वय पंचवीस ते तीस दिवसाचे दरम्यान असताना तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली लेबल क्लेम शिफारशीत योग्य तन नाशक निवडून स्वतंत्र पंप वापरून गहू पिकातील रुंद व अरुंद पाणी ताणाचे व्यवस्थापन करावे. तणनाशकाचा वापर करण्यापूर्वी प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊनच लेबल क्‍लेम शिफारशीप्रमाणे तणनाशकाचा वापर शिफारशीत कालावधीतच करावा.

२) गहू पीक ओंबीवर असताना बऱ्याच वेळा खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. गहू पिकावरील खोड किडीच्या अळ्या रोपट्यांच्या गाभ्यात शिरून गाभा पोखरतात परिणामी रोपट्यांचा वरील भाग वाळतो.

या किडीच्या व्यवस्थापनासाठी गहू पिकात रासायनिक खताचा वापर माती परीक्षणाच्या आधारावर संतुलित रित्या करणे गरजेचे आहे तसेच पिकाच्या वाढीच्या अवस्थांमध्ये गहू पिकास पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. गहू पिकात बऱ्याच वेळा पिवळसर अथवा काळपट तिळाच्या आकाराची मावा या किडीची पिल्ले व प्रौढ पानाच्या मागच्या बाजूने राहून रस शोषण करताना आढळतात त्यामुळे पाने पिवळसर रोगट बनतात व नंतर ही मावा कीड आपल्या शरीरातून गहू पिकावर चिकट स्त्राव बाहेर टाकते त्यामुळे गहू पिकावर काळजी काही बुरशी वाढून पाने काळी पडतात प्रकाशसंश्‍लेषण बंद होऊन गव्हाचे रोपटे मरू शकते. गहू पिकावरील मावा किडीच्या व्यवस्थापनासाठी खालील पैकी कोणत्या एका कीटकनाशकाची प्रादुर्भाव लक्षात घेऊन गरजेनुसार योग्य निदान करून निर्देशीत प्रमाणात तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यकतेनुसार फवारणी करावी.

Thiamethoxam 25 % WG 1 ते 2 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी  किंवा

क्विनॉलफॉस 25% प्रवाही 20 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची गरजेनुसार योग्य निदान करून फवारणी करावी.

३)शेतकरी बंधूंनो गहू पिकात पानावरील करपा या रोगाच्या व्यवस्थापनाकरिता प्रादुर्भाव लक्षात घेऊन योग्य निदान करून गरजेनुसार Mancozeb 75 % WP 20 ते 25 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आवश्यकतेनुसार फवारणी करावी. तसेच गहू पिकात तांबेरा रोगाची लक्षणे आढळून आल्यास म्हणजे पानावर, खोडावर व ओंब्यावर विखुरलेले नारिंगी रंगाचे फोड आढळून आल्यास ताबडतोब तज्ञांचा सल्ला घ्यावा व योग्य निदान करून घ्यावे व गरजेनुसार तांबेरा रोगाची लक्षणे आढळल्यास Propiconazole 25 %EC 20 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन योग्य निदान करुन गरजेनुसार तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली फवारणी करावी.

४) शेतकरी बंधूंनो बऱ्याच वेळा उंदीर गव्हाचे फुटवे व ओंब्या तोडून खाऊन नुकसान करतात.

मंदिराचा प्रादुर्भाव असल्यास उंदीराच्या व्यवस्थापन करण्याकरिता धान्याचा भरडा 49 भाग, 1भाग गोडेतेल व 1 भाग Bromadiaolone 0.25 सीबी या प्रमाणात एकत्र मिसळून आमिष तयार करावे व व चमचाभर आमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बीळा मध्ये हे टाकावे किंवा बीळा जवळ ठेवावे. हे विषारी आमिष वापरतांना अत्यंत काळजीपूर्वक कुणालाही इतरांना विषबाधा होणार नाही याची काळजी घेऊन वापरणे गरजेचे आहे.

टीप :१) रसायने वापरण्यापूर्वी लेबल क्‍लेम शिफारशीची शहानिशा करून लेबल क्‍लेम शिफारशीप्रमाणेच रसायनाचा वापर करावा

२)अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करून फवारणी टाळावी तसेच प्रमाण पाळावे.

३) रसायने फवारताना सुरक्षित कीडनाशक वापर तंत्राचा तसेच सुरक्षा किटस वापर करावा.

 

लेखक - राजेश डवरे 

कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.

प्रतिनिधी - गोपाल उगले

English Summary: tips for wheat crop protection Published on: 26 September 2021, 10:55 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters