ऊस या पिकाला जवळपास २० ते ३० डिग्री तापमान तसेच ८० ते ९० टक्के आद्रता व सूर्यप्रकाश लागतो आणि या सोबतच सर्वात महत्वाचे म्हणजे पाण्याची आवश्यकता असते. कडक उन्हाळा तसेच पावसाच्या हंगामात कमी जास्त पाऊस पाण्यामुळे सुद्धा ऊस व्यवस्थापण, ऊस वाढीवर परिणाम होतो.आपण ज्यावेळी ऊस या पिकाचे व्यवस्थापन करतो त्यावेळी उसाच्या खोडावर तसेच त्यात तयार होणाऱ्या रसावर परिणाम होऊन बाष्पीवन चा वेग वाढतो आणि त्यातील पेशींच्या आतमध्ये पाण्याचा ताण वाढायला सुरू होते त्याबरोबर प्रकाश संश्लेषण ची क्रिया सुद्धा कमी होते.जर तुम्ही या काळात जे ऊस पिकाचे चांगले नियोजन नाही केले तर उसाच्या उत्पादनात जवळपास १५ ते २५ टक्के पर्यंत घट होते.
आपत्कालीन परिस्तिथीमध्ये जर उसावर दुष्परिणाम टाळायचा असेल तर त्यासाठी उपाय खालीलप्रमाणे -
१. रासायनिक बेणे प्रक्रिया -
२. जैविक बेणे प्रक्रिया -
जर ऊस उत्पादनात घट आणणाऱ्या ज्या रोग किंवा किडींचे प्रमाण नियंत्रणात आणायचे असेल तर त्यास बेणे प्रक्रिया करणे खूप गरजेचे आहे. पाहायला गेले तर अत्ता बाजारात रासायनिक खंताच्या किमती मध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे.तसेच काही वेळा रासायनिक खते वेळेवर सुद्धा उपलब्ध होत नाहीत. या परिस्थिती मध्ये ऊस पिकासाठी स्फुरद व ऍसेटोबॅक्टर विघटक जिवाणूंची जर तुम्ही प्रक्रिया केली तर रायायनिक खताची बचत करता येईल.ऊस पिकासाठी जर तुम्ही शुद्ध तसेच चांगल्या बेण्याचा वापर केला तर उसाच्या उत्पादनात १० ते १५ टक्के ने वाढ होते.
हेही वाचा :लवंग पिकाची लागवड करायचीय, जाणून घ्या कोणत्या पद्धतीने करावी
उसाच्या उत्पादनात घट येण्याची जी प्रमुख कारणे आहेत ती म्हणजे शुद्ध, निरोगी तसेच चांगल्या बेण्याचा अभाव असणे.काही शेतकरी जुने झालेले अशुद्ध, रोगट, किडके तसेच खोडवा पिकातील बेणे वापरतात फ्यामुळे उसाची उगवण सुद्धा कमी होते आणि पीक चांगल्या प्रकारे वाढत नाही आणि याच सर्व कारणांमुळे ऊसावर रोग व किडींचा प्रभाव लवकर पडतो. त्यामुळे उसाचे उत्पादन घट नियंत्रणात आणण्यासाठी चांगल्या प्रकारचे बेणे वापरणे खूप गरजेचे आहे.
ऊस पिकासाठी खते देताना घ्यावयाची काळजी:
आपण जी उसास रासायनिक खते देतो त्यामध्ये २० ते ३० टक्के नत्र, १५ ते २५ टक्के स्फुरद तसेच ५० ते ५५ टक्के पालाश ऊस पिकास उपलब्ध होते. या रासायनिक खतांची संतुलन करावे त्यामुळे ऊस पिकाचे नुकसान होणार नाही.
Share your comments