देशात अनेक लोक शेतीला घाट्याचा सौदा समजतात, अनेक शेतकऱ्यांना शेती परवडत नाही, पण शेतीमध्ये जर आपण पारंपरिक पिकांऐवजी नगदी तसेच औषधी वनस्पतीची लागवड केली तर आपण त्यातून लाखोंचे नाहीतर करोडोचे उत्पन्न घेऊ शकता. औषधी वनस्पतीसाठी कमी क्षेत्राची गरज भासते शिवाय यांची खुप मोठी डिमांड देखील आहे अशाच औषधी वनस्पतीपैकी एक आहे चंदन आज आपण चंदन लागवड करून कसे करोडोचे उत्पन्न अर्जित केले जाऊ शकते याविषयीं जाणुन घेणार आहोत.
चंदनची मागणी संपूर्ण विश्वात आहे, आणि चंदनचे हल्लीचे उत्पादन हे मागणी पूर्ण करू शकत नाही. चंदनच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण झाल्याने याचे भाव हे गगनाला भिडले आहेत. आपण चंदन लागवडीसाठी जेवढा खर्च करणार त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने यातून उत्पन्न अर्जित केले जाऊ शकते. चंदनचे झाड आधुनिक पद्धतीने लागवड केले तर त्यापासून 15 वर्षात उत्पन्न मिळायला सुरवात होते.
चंदनच्या झाडावर अनेक जनावर, रानटी पशु हल्ला करू शकतात, त्यामुळे या झाडांचे रानटी पशुपासून संरक्षण करणे गरजेचे असते. चंदन लागवड हि फक्त वाळवंटी व बर्फ पडणाऱ्या भागात केली जाऊ शकत नाही, इतर सर्व भागात यांची लागवड केली जाऊ शकते आणि चांगली कमाई करता येऊ शकते. चंदनचा उपयोग अत्तर, कॉस्मेटिक, व आयुर्वेदिक औषधी बनवण्यासाठी प्रामुख्याने केला जातो. शिवाय हिंदु धर्मात चंदनला खुप महत्व प्राप्त आहे.
केव्हा मिळते चंदनपासून उत्पादन
चंदन लागवड केल्यापासून 8 वर्षानंतर चंदनचे हार्ड वूड बनायला सुरवात होते आणि रोपे लागवड केल्यापासून 15 वर्षानंतर ह्याचे लाकूड उत्पादणासाठी अर्थात काढणीसाठी तयार होते. चंदनचे झाड जेव्हा पूर्ण विकसित होते तेव्हा याच्या झाडापासून 20 किलोपर्यंत लाकूड मिळते. चंदनचे लाकूड बाजारात जवळपास 7 हजार रुपये किलोपर्यंत विकले जाते. काहीवेळा दहा हजारपर्यंत सुद्धा भाव मिळतो. जर आपण एक हेक्टर वर चंदन लागवड केली तर चंदनच्या एका हंगामासाठी म्हणजे 25 वर्षासाठी जवळपास 25 लाख रुपये खर्च येऊ शकतो आणि यातून जवळपास सव्वा ते दिड करोड रुपयाची इनकम होऊ शकते.
चंदनची कुठे विक्री केली जाते
मित्रांनो आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, सरकारने सर्वसामान्यांना चंदन खरेदी-विक्रीवर बंदी घातली आहे. परंतु कोणताही शेतकरी चंदनाची लागवड करू शकतो. मग प्रश्न पडतो की विकायचे कुणाला? चिंता करू नका चंदनचे लाकूड सरकार स्वतः विकत घेते. चंदन लागवड हि रोप लावून केली जाते, आपल्याला रोपे विकत घ्यावे लागतील. आणि चंदनाची एका रोपाची किंमत हि जवळपास 100 ते 150 रुपयादरम्यान असू शकते.
Share your comments