प्रत्येक वर्षी खरीप हंगामात सोयाबीनच्या बियाणांची टंचाई ही ठरलेली असते. बियाणांची होणाऱ्या टंचाईमुळे शेतकऱ्यांची होणारी धावपळ आणि बोगस बियाणांमुळे उत्पादनावर होणारा परिणाम यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. यंदा उन्हाळ्यात बीजोत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल हा वाढलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला महाबीजने राज्यात सुमारे १२ हजार हेक्टरवर बीजोत्पादनाचा कार्यक्रम घेतला आहे. महामंडळाला दीड ते दोन लाख क्विंटल कच्चे बियाणे मिळेल अशी अपेक्षा आहे. यंदाच्या वर्षी राज्यात शेतकऱ्यांनी ४८ हजार हेक्टरवर पेरा केला आहे ज्यामुळे बियाणांचा प्रश्न तर मिटला आहेच तसेच शेतकऱ्यांच्या पदरी उत्पन्न देखील पडणार आहे.
खरिपात नुकसान उन्हाळी हंगामावर ताण :-
निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचे नुकसान होत आहे त्यामुळे बियाणांचा प्रश्न निर्माण होतो एवढेच नव्हे तर बियाणांचा दर्जा देखील ढासळतो. यंदा उन्हाळी हंगामात सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. महाबीजने तर १२ हजार हेक्टर क्षेत्रावर बियाणांचे उत्पादन घेतले आहे जे की यामुळे बियाणांची टंचाई निर्माण होणार नाही. सध्या राज्यात बियाणांची अवस्था काय आहे याची पाहणी कृषितज्ञ करीत आहेत.
पायाभूत तसेच प्रमाणित बियाणे :-
यंदा उन्हाळ्यात सोयाबीन ला मुबलक प्रमाणात पाणी आणि पोषक वातावरण भेटल्यामुळे सोयाबीन चांगल्या प्रकारे बहरत आहे. खरीप हंगामात जशी सोयाबीन ची योग्य प्रकारे वाढ जाते त्याप्रकारे उन्हाळी हंगामात सुद्धा सोयाबीन ची अधिक प्रमाणत वाढ होते. उन्हाळी हंगामात सोयाबीन चा अधिक उतारा निघत नाही असे सांगितले जाते मात्र हा अंदाज मोडीत निघतो की काय अशी अवस्था झालेली आहे. महाबीज विविध भागात उत्पादनाची शक्यता पाहून बियाणांचा अंदाज घेते. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा प्रमाणित आणि पायाभूत बियाणे मिळणार आहेत.
शेतकऱ्यांकडून पीक पध्दतीमध्ये बदल :-
यंदा पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी पिकबदल करून उन्हाळ्यात सोयाबीन चा पेरा केलेला आहे. राज्यात प्रथमच १२ हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीन चा पेरा घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. बियाणांचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे शेतकऱ्यांना आता दर्जदार बियाणे मिळणार आहे. महाबीजने यासाठी पुढाकार घेतलेला आहे. आता उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांच्या पदरी चांगले उत्पन्न पडणार आहे.
Share your comments