शेती क्षेत्रामध्ये आणि वनस्पती या संशोधनामध्ये दिवसेंदिवस वेगवेगळ्या संशोधन होऊननवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी क्षेत्राच्या उत्पादनात वाढ होत आहे. कृषी क्षेत्रामध्ये कृषी विद्यापीठे, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सारख्या संस्थांनी विविध तंत्रज्ञान विकसित करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.भारतीय कृषी संशोधन परिषद अर्थात आयसीएआरने ब्रिमॅटोयानावाचे नवीन वनस्पतीचा शोध लावलाआहे. या बद्दल या लेखात माहिती घेऊ.
भाज्यांची उत्पादकता वाढवणे
भाजीपाल्याचे उत्पादन वाढवण्यासाठी कलम करणे हे तंत्रज्ञान पुढे आले आहे.यामध्ये एकाच वनस्पती मध्ये दोन भाज्यांची रोपे कलम केले जातात.यामधूनएकच वनस्पती पासून दोन फळे मिळतील.या तंत्रज्ञानामुळे कमी जागेत कमी वेळात भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाऊ शकत नाही.
याबाबतीत आयसीएआर ने केलेले संशोधन
या संशोधनामध्ये आयसीएआर आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्च या दोन संस्थांनी बटाटा टोमॅटो यांचे कलमी पद्धतीने यशस्वी उत्पादन घेतल्यानंतर आता विविध प्रकारचे ब्रिमेटोविकसित केले आहेत. आयसीएआर नुसार एगप्लांटचेवान 25 ते 30 दिवसांचे असताना आणि टोमॅटो चेवाण22 ते 25 दिवसांचे असताना कलम केले गेले.
आय सी एआर ने कलम करताना कोणत्या प्रकारे काळजी घेतली?
वांग्याच्या विविधते मध्ये पाच टक्के प्रमाण असे आहे जे कलम करण्याची प्रक्रिया करता येऊ शकते. यानुसार बाजू किंवा विभाजन पद्धती नुसार कलम करण्यात आले आहे. मूळ आणि स्कोन या दोन्ही ठिकाणी पाच ते सात मी मी तिरके काप केले गेले. कलम केल्यानंतर लगेच लागवड केलेला प्रकल्प नियंत्रित वातावरणीय स्थितीत ठेवण्यात आला. ज्या मध्ये तापमान, आद्रता आणि प्रकाश पहिले पाच ते सात दिवस समप्रमाणात संतुलित ठेवली गेले. नंतर पुढील पाच ते सात दिवस अर्धवट ठेवून आणि अर्धवट सावलीत ठेवण्यात आले.
या तंत्रज्ञानाचे व्यावसायिक उत्पादनाच्या दृष्टीने संशोधन प्रगतीपथावर
लागवडीनंतर सुमारे 60 ते 70 दिवसांनी टोमॅटो आणि वांग्याची दोन्ही रूपातून फळे बाहेर पडू लागतात. त्या झाडाला 2.383 किलो टोमॅटो आणि 2.64 किलो वांगी उत्पादन मिळाले.शास्त्रज्ञांच्या मते कलम तंत्रज्ञान शहरी भागासाठी खूप फायदेशीर आहे कारण एका भांड्यात एकाच वनस्पतीपासून दोन भाजीपाला पिके मिळवता येऊ शकतात.वाराणसी स्थित आयसीएआर – आयबीआर येथे ब्रिमे टोच्या व्यवसाय उत्पादनवर संशोधन चालू आहे.
Share your comments