भारतात गहु लागवडीला विशेष महत्व आहे. गहु हे भारतातील एक प्रमुख पिक आहे याची लागवड करून शेतकरी बांधव चांगली कमाई करत आहेत. आपल्याकडे गव्हाची लागवड हि रब्बी हंगामात केली जाते. देशात रब्बी हंगामाच्या पेरणीला काही ठिकाणी सुरवात देखील झाली आहे तर काही ठिकाणी रब्बीची पूर्वमशागत हि पूर्ण झाली आहे आणि येत्या काही दिवसात त्या ठिकाणी रब्बीची पेरणी सुरु होईल.
गव्हाची पेरणी देखील येत्या काही दिवसात सुरु होईल, शेतकरी बांधव जर गव्हाच्या सुधारित वाणांची पेरणी करतील तर त्यांना गहु लागवडीतून बक्कळ कमाई हि होऊ शकते. शिवाय सुधारित जातीच्या बियाण्याच्या पेरणीमुळे रोग आणि किड नियंत्रणासाठी कमी पैसा खर्च होईल आणि त्यामुळे साहजिक शेतकरी बांधवांचे उत्पन्न हे दुपट्ट होण्यास मदत होईल.
नेटकाच दिवाळी पाडवाचा सन मोठ्या उत्साहात साजरी झाला, आणि आपल्याकडे दिवाळीनंतर गव्हाच्या पेरणीची लगबग करताना शेतकरी बांधव हे दिसतात. काही भागात गव्हाची पेरणी सुरु झाली आहे तर काही भागात शेतकरी बांधव हि गहु पेरणीसाठी पूर्वमशागत करत आहेत. आणि म्हणुनच कृषी जागरण शेतकरी मित्रांसाठी गव्हाच्या प्रमुख सुधारित जातीची माहिती घेऊन आले आहे. चला तर मग जाणुन घेऊया गहुच्या जातीविषयी
DBW-222
शेतकरी मित्रांनो DBW-222 ह्या जातीला करण नरेंद्र असे देखील म्हणतात. गव्हाची हि एक सुधारित जात आहे. या जातीपासून एका हेक्टरमध्ये सरासरी 62 क्विंटल एवढे दर्जेदार उत्पादन हे मिळते. या जातीपासून जास्तीत जास्त 83 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंत उत्पादन हे मिळू शकते. नोव्हेंबर महिन्यात म्हणजे रब्बी हंगामात पेरणीसाठी ही एक उत्तम जात मानली जाते. हि वाण 143 दिवसात काढणीसाठी तयार होते.
DBW-187 NWPZ
DBW-187 NWPZ ही भारतात लागवड केली जाणाऱ्या प्रमुख सुधारित जातीपैकी एक गव्हाची सुधारित जात आहे. ह्या जातीला शेतकरी बांधव करण वंदना असे देखील म्हणतात. गव्हाची हि जात 148 दिवसांत तयार होते म्हणजे काढणीसाठी येते.
गव्हाच्या या जातीपासून 25 ते 40 क्विंटल प्रति एकरी उत्पादन मिळू शकते. हि एक रोगप्रतिरोधी वाण आहे त्यामुळे याची लागवड करून शेतकरी बांधव चांगली कमाई करू शकतात.
DBW-187 NEPZ
शेतकरी मित्रांनो आता आपण जाणुन घेणार आहोत DBW-187NEPZ या जातीविषयी. हि एक भारतातील प्रमुख सुधारित वाण आहे. या जातीला करण वंदनेचे दुसरे रूप मानले जाते. गव्हाची हि सुधारित जात 120 दिवसांत काढणीसाठी सज्ज होते. या जातीची पेरणी करून शेतकरी बांधव एका एकरात 20 ते 28 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळवू शकतात.
Share your comments